मुशी मासा 
कोकण

समुद्रातील अन्न साखळी अडचणीत

.

शिवप्रसाद देसाई

मांसाहारी माशांचे प्रमाण घटले; अतिमासेमारीचा परिणाम
सावंतवाडी - कोकणात अतिमासेमारीमुळे समुद्रातील अन्नसाखळी अडचणीत आली आहे. मांसाहारी माशांची संख्या घटत असून, तारली, बांगडा अशा शाकाहारी माशांची संख्या वाढली आहे. सागरी इको सिस्टिमच्या दृष्टीने ही धोक्‍याची घंटा मानली जात आहे. त्यावर वेळीच नियंत्रण न आणल्यास काही माशांच्या जाती लुप्त होण्याची शक्‍यता आहे.

समुद्र ही परिसंस्था मानल्यास जंगलांप्रमाणेच येथेही मजबूत अन्न साखळी कार्यरत असते. त्याचे प्रमुख तीन स्तर मानले जातात. प्राथमिक पातळीवर वनस्पतीजन्य व प्राणीजन्य प्लवंग, दुसऱ्या टप्प्यात त्यावर अवलंबून शाकाहारी मासे आणि तिसऱ्या टप्प्यात या माशांना खाणारे मांसाहारी मासे असतात. या अन्न साखळीत माणूस या बाह्यघटकाचा हस्तक्षेप वाढल्याने समुद्राची "इको सिस्टिम' अडचणीत आली आहे.

समुद्रातील मासेमारीसाठी काळानुरूप तंत्रज्ञानाचा वापर वाढला. त्यामध्ये तीव्रतेने व्यावसायिकता आली. मासे खाणाऱ्यांची संख्या वाढली. त्यासाठी वेगवान ट्रॉलर्स, कमी आसाची मोठी पर्ससीनसारखी जाळी, माशांना शोधणाऱ्या सॅटेलाइटवर आधारित यंत्रणेचा वापर वाढला आणि ओव्हर फिशिंग वाढले. यामध्ये प्रामुख्याने मांसाहारी माशांना चांगली चव असल्याने त्यांना मागणी वाढली. अशा माशांना पकडण्यासाठी वेगळी जाळी, वेगळे तंत्र विकसित झाले. त्यामुळे असे मासे समुद्रातून अक्षरशः गाळून काढले जात आहेत. कोकण किनाऱ्यावर घोळ, बळा, करवत, ताकट, मुशी हे चवदार मांसाहारी मासे अलीकडे अभावाने दिसू लागले आहेत. सुरमईचा आकार कमी झाला आहे.

मांसाहारी माशांचे प्रमाण घटल्याने त्यांचे खाद्य असलेल्या तारली, बांगडा अशा माशांची कोकणातील समुद्रात संख्या वाढली आहे.
येत्या आठ-दहा वर्षांत माशांच्या काही प्रजाती कोकणातील समुद्रातून नष्ट होण्याची भीती व्यक्त होत असून. त्याचा थेट परिणाम कोकणात मासेमारीवर अवलंबून हजारो कुटुंबावर होणार आहे.

कोकणात मासेमारी नौकांची संख्या ज्या प्रमाणात वाढली, त्या तुलनेत उत्पादनात वाढ झालेली नाही. माशांची प्रजातीवार वाढ व त्याचा दर पाहिल्यास सागरी अन्न साखळीवर मोठा परिणाम झाल्याचे दिसत आहे.
- डॉ. केतन चौधरी, मत्स्य अभ्यासक

दृष्टिक्षेपात
संख्या वाढलेले शाकाहारी मासे -
बांगडा, तारली

संख्या कमी झालेले मांसाहारी मासे - शेंगटी, शेंगाळे, कर्ली, मोडुसा, शिवड, घोळ, करवत, बळा

आकार कमी जाणवणारे मासे - सुरमई, म्हाकूल, बांगडा, मोरी, सरंगा, पापलेट.

महाराष्ट्रातील रेड लिस्टेड मासे - मुशी, करवत किंवा नाली, कानमुशी किंवा कनार, गोलाड किंवा वाकटी, कोंबडा, सोनमुसा, वागबीर, लांज किंवा लाजा, मिगला किंवा वाघोल, शिंग पाकट, वागली, सुंभा किंवा टोळ, घोडा मासा, गोब्रा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat : 'मी महादेवाचा अवतार, तुला चांगलं करिअर घडवायचं असेल तर..'; वासनांध खरातचा शिक्षण घेणाऱ्या युवतीवर अत्याचार, कॅप्टनविरोधात सातवा गुन्हा

IPL 2026 Marathi News: चेन्नई सुपर किंग्सचं चाहत्यांसाठी मोठं सरप्राईज... ऋतुराजने सांगितली ओपनिंग जोडी, आता धमाल येणार

Akkalkot News: तीर्थक्षेत्र अक्कलकोटमध्ये दर गुरुवारी मांस विक्री बंद; नगराध्यक्ष मिलन कल्याणशेट्टींचा घोषणा; आजपासून अंमलबजावणी!

Vaibhavwadi Kolhapur Railway Project : वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा ‘डीपीआर’ तयार : रेल्वेमंत्री अश्विन वैष्णव यांची माहिती

Bangladesh Bus Accident : प्रवाशांनी खचाखच भरलेली बस नदीत उलटली, २३ जणांचा मृत्यू, थरारक अपघाताचा व्हिडिओ समोर

SCROLL FOR NEXT