second case the month cow and cow baby secured kokan marathi news 
कोकण

अखेर 'त्या' माय लेकराची झाली भेट ; पंधरा फुट उंचीच्या विहीरीतून तिला काढले बाहेर

एकनाथ पवार

वैभववाडी (सिंधुदुर्ग) : एडगाव वायबोंशी येथील विहीरीत पडलेल्या गवा मादीला वनविभाग आणि स्थानिक ग्रामस्थांनी तासभराच्या प्रयत्नानंतर सुरक्षित बाहेर काढले.याशिवाय वस्तीत आलेल्या तिच्या वासराला देखील तिच्यासोबत जंगलात सोडले आहे.परंतु सायंकाळी उशिरापर्यत मादी आणि ते वासरू यांच्यात मिलन झाले नव्हते.वासरावर वनविभगाचे कर्मचारी लक्ष ठेवुन आहेत.हा प्रकार आज ता.१८ सकाळी घडला दरम्यान विहीरीत गवा पडण्याची महिनाभरातील दुसरी घटना आहे.

एडगाव वायबोंशी येथे वस्तीत आज पहाटे एक गव्याचे गोंडस वासरू दिसुन आले.ते वासरू एकटेच असल्यामुळे एक स्थानिक त्याला घेवुन घरी आला. त्यानंतर त्यांनी ही माहीती वनविभागाच्या अधिकाऱ्यांना दिली. वनपाल ,एस.एस.वागरे,पी.डी.पाटील,एम.एस.पाटीलअमित काकतीकर आदी घटनास्थळी पोहोचले.त्यांनी त्या वासराची स्थिती पाहील्यानंतर दुध आणुन पाजले.त्यानंतर ज्या ठिकाणी ते वासरू आढळुन आले त्या ठिकाणी त्याला सोडण्यासाठी ते जात होते.याचवेळी त्यांना एका विहीरीत आवाज आला.

विहीरीत डोकावुन पाहील्यानंतर त्यांना गवा मादी असल्याचे दिसुन आली.वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने त्या मादीला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले.  दहा ते पंधरा फुट उंचीची विहीर असल्यामुळे मादीला सहज बाहेर काढणे शक्य नव्हते.अखेर जेसीबीच्या सहाय्याने मादीला बाहेर येण्यासाठी भराव करण्यात आला.त्यानंतर तिच्या समोर विहीरीबाहेर वासरू ठेवण्यात आले.वासराला बघुन ती मादी चुटकीसरशी बाहेर आली अन्‌ जंगलाच्या दिशेने निघुन गेली.परंतु वासरू दोन ते तीन दिवसांचे असल्यामुळे ते पळत जाऊ शकले नाही.त्यामुळे वनविभागाच्या अधिकाऱ्यानी त्या वासराला मादी ज्या जंगलात गेली तेथे त्याला नेऊन सोडले आहे.

सांयकांळी उशिरापर्यत मादी आणि त्या वासराचे मिलन झाले नव्हते.त्या वासरावर वनविभागाचे अधिकारी लक्ष ठेवुन आहेत.दरम्यान गवा विहीरीत पडण्याचा हा महिना भरातील दुसरा प्रकार आहे. यापुर्वी १५ फेब्रुवारीला एडगाव घाडीवाडी  येथील विहीरीत गवारेडा पडला होता.तत्त्याला बाहेर काढताना वनविभाग आणि ग्रामस्थांची दमछाक उडाली होती.गेल्यावर्षी देखील एडगाव वायबोंशी येथे गवा विहीरीत पडला होता.

 काजु बागांचे अतोनात नुकसान

करूळ,एडगाव,नावळे,सडुरे,खांबाळे,सांगुळवाडी,वाभवे ,कोकिसरे या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात गवे आहेत.या गावांमध्ये गेल्या काही वर्षात शेकडो हेक्टर क्षेत्रावर शेतकऱ्यांनी काजु लागवड केली आहे.परंतु गव्यांकडुन या काजु बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.त्यामुळे गव्यांच्या वाढत्या उपद्रवामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे.


संपादन- अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

युद्धामुळे कंडोम तुटवड्याचा धोका, इंडस्ट्रीला कच्चा माल मिळेना; उत्पादन घटले

Maharashtra property ready reckoner rates unchanged: मालमत्ता व्यवहारांना दिलासा: रेडी रेकनर दर स्थिर, पण जाचक तळटीपा कायमच

Baramati News : साडेसहा हजार मृत मतदार बारामती तालुक्यात वगळले; मतदारयादी अचूक करण्यासाठी मोहीम

Ashok Kharat खरातचा महिलांवर अत्याचार, एकही गर्भवती नाही? कुठली औषधं द्यायचा? डॉक्टर पोलिसांच्या रडारवर

PBKS vs RR Live : युझवेंद्र चहलने घेतली शुभमन गिलची 'फिरकी'! अर्शदीप सिंगची १२ चेंडूंची ओव्हर, सारेच चक्रावले

SCROLL FOR NEXT