guhagar sakal
कोकण

कुणबी समाजाच्या प्रश्नांविषयी शरद पवारांची भेट - संदीप राजपुरे

कुणबी समाजाला शरद पवारांनी राजकीय सुवर्णकाळ दिला होता.

चंद्रशेखर जोशी

दाभोळ  : कोकणातल्या कुणबी समाजावर शरद पवार यांनी प्रचंड प्रेम केले आहे. २५ वर्षापूर्वी राजकीय सुवर्णकाळ कुणबी समाजाला कोणी दिला असेल तर तो पवार साहेबांनी दिला होता. मात्र मधली  २५ वर्षे आम्ही शब्दश: राजकीय वेठबिगारीच  केली आणि आमचा संपूर्ण राजकीय सुवर्णकाळ निघून गेला, आज प्रत्येक पदाला व अधिकाराला आम्हाला झगडावे लागत आहे,  आणि या माध्यमातूनच आम्ही शरद पवार व आपली (अजित पवार) यांची भेट घेतली असल्याचे मनोगत कुणबी नेते व शिवसेनेचे  दापोली विधानसभा क्षेत्राध्यक्ष संदीप राजपुरे यांनी मुंबई येथे बोलताना व्यक्त केले.  

कुणबी समाजोन्नती संघाला विद्यार्थी वसतिगृह इमारत बांधण्यासाठी ५ कोटीचा धनादेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे हस्ते देण्यात आला.  समाजाच्या इतिहासातील हा सुवर्णक्षण असून गेली २५ वर्षांहून अधिक काळ समाजाचे पदाधिकारी समाजाचे वसतिगृहासाठी  इमारत व्हावी यासाठी प्रयत्न करत होते.  यासाठी अनेक राजकीय नेत्यांचे उंबरठेहि त्यांनी झिजवले होते पण त्याला म्हणावे तसे यश येत नव्हते, समाधानकारक उत्तरे राजकीय नेत्यांकडून मिळत नव्हती.

ते म्हणाले यानंतर आम्ही कुणबी समाजोन्नती संघाच्या पदाधिकाऱ्यांसमवेत रायगडचे खासदार सुनील तटकरे यांचेशी संपर्क साधला त्यांची प्रत्यक्ष भेट घेतली व त्यांना सगळा इतिहास सांगितला व आमची राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचेशी भेट घालून द्या अशी मागणी त्यांचेकडे केली, त्यांनीही ती मानली व आमची पवार यांचेशी भेट घालून दिली. शरद पवार यांचे कोकणातील कुणबी समाजावर प्रचंड प्रेम असून २५  वर्षांपूर्वी जो राजकीय सुवर्णकाळ कोकणातील कुणबी समाजाचा होता तो पवार यांचेमुळे होता, आम्ही पवार यांची भेट घेतली त्यांचा सर्व परिस्थिती सांगितली व विद्यार्थी वसतिगृहाच्या इमारत बांधकामासाठी शासकीय निधी मिळावा अशी मागणी केली होती, त्यांनी तत्काळ होकारही दिला होता व ५० कोटी श्यामराव पेजे आर्थिक विकास महामंडळाला देतो असेही सांगितले होते.

लगतच्या विधिमंडळ अधिवेशनात मांडण्यात येणाऱ्या राज्याच्या अर्थसंकल्पात यासाठी तरतूदही करण्यात येईल असा शब्द आम्हाला दिला होता. त्यानुसार अर्थसंकल्पात अर्थमंत्री अजित पवार यांनी तरतूदही केली होती. त्याचा शासन निर्णयही निघाला होता मात्र  काही विघ्नसंतोषी मंडळींनी शासन निर्णयातील एक वाक्य अधोरेखित करून शासनाकडून मिळालेला ५ कोटीचा निधी शासन परत घेईल असे  समाजमाध्यमांवर प्रसारित केले.

मात्र त्यांच्या प्रयत्नांना यश आले नाही अजित पवार यांनी दिलेल्या निधीतील एक पैसाही शासन परत घेणार नाही हा माझा शब्द आहे असे या कार्यक्रमात  सांगितल्याने विघ्नसंतोषी मंडळींचे प्रयत्न फसले असून  हा आमच्यासाठी सुवर्णक्षण असल्याचे  राजपुरे यांनी सांगितले.  महाविकास  विकास आघाडीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पाटील, मंत्रीमंडळातील सर्व सदस्य, खा. सुनील तटकरे यांचे समाजातर्फे आपण धन्यवाद देत असल्याचे राजपुरे म्हणाले.

श्यामराव पेजे आर्थिक विकास महामंडळाच्या नावाची चर्चाच आजपर्यत होत होती  मात्र आता या महामंडळासाठी ५० कोटी रुपयांची तरतूद केल्याने कोकणातील कुणबी समाजाच्या युवकाला उद्योग उभारणे शक्य होणार आहे. जे प्रेम २५ वर्षापूर्वी पवार साहेबांनी आमच्यावर दाखविले होते मधल्या काळात त्यांनीही कोकणाकडे दुर्लक्ष केले किंबहुना आमच्या समाजाकडे दुर्लक्ष केले. कोकणामध्ये ६५ टक्के कुणबी समाज असून जे समाज ठरवेल तेच राजकीय अस्तित्व कोकणात टिकू शकते. समाज निर्णय घेईल तोच पक्ष कोकणात टिकू शकेल असा आजवरचा इतिहास आहे असे राजपुरे यांनी आपल्या मनोगतात सांगितले.  जे प्रेम पवार साहेबांनी समाजाला  दिले तेच प्रेम तुम्ही आम्हाला द्या असे राजपुरे यांनी अजित पवार यांना सांगितले.या सर्व मनोगतामुळे शिवसेनेचे दापोली विधानसभा क्षेत्राध्यक्ष व  कुणबी नेते संदीप राजपुरे यांची शिवसेनेमध्ये घुसमट होत असल्याचे  दिसून येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ: Virat Kohli त्याचे सामनावीर ट्रॉफी कुठे ठेवतो? न्यूझीलंडविरुद्ध पुरस्कार जिंकल्यानंतर सांगून टाकलं

WPL 2026, DC vs GG: १ बॉल अन् ५ धावा... गुजरात जायंट्सने मिळवला थरारक विजय, जेमिमाच्या दिल्लीचा सलग दुसरा पराभव

२०१४पासून अदानीकरण! हे बघून भीती वाटली नाही तर निवडणूक न लढलेली बरी; राज ठाकरेंनी दाखवले VIDEO

Bigg Boss Marathi 6: ९० दिवस, १७ स्पर्धक; पाहा 'बिग बॉस मराठी ६' च्या घरातील स्पर्धकांची यादी

अजित पवारांना लाथ मारून हाकला किंवा माफी मागा, गाडीभर पुरावे कोर्टात द्या; भ्रष्टाचारावरून ठाकरे बंधूंनी फडणवीसांना घेरलं

SCROLL FOR NEXT