By sharing with the public ratnagiri kokan marathi news 
कोकण

एका रात्रीत 'यांनी' मारले 22 पांढरे पट्टे....

सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी : प्रवास सुखकर व्हावा, अपघाताचे प्रमाण कमी होण्यासाठी अनुलोम प्रेरित गोळपच्या जनसेवा सामाजिक मंडळाच्या कार्यकर्त्यांनी लोकसहभागातून चांदोर (दोन आंबा), निरुळ ते गोळपच्या मुकुल माधव हायस्कूलपर्यंत 15 किलोमीटरच्या रस्त्यावरील 22 गतिरोधकांवर पांढरे पट्टे रंगवले. या उपक्रमाचे प्रवाशांकडून कौतुक होत आहे. 

या मार्गावर अवजड वाहतूक, पर्यटक आणि स्थानिकांची वर्दळ असते. रस्त्यावरील गतिरोधक दिवसा व रात्रीच्या वेळी वाहनचालकांना पटकन दिसत नाहीत. मोकाट गुरांमुळे बऱ्याच वेळा अपघात होतात. हे प्रमाण कमी होण्यासाठी सामाजिक बांधिलकीतून अनुलोमचे निरुळ स्थानमित्र संजय पाथरे व वस्तीमित्र अविनाश काळे, जनसेवा सामाजिक मंडळाच्या सदस्यांनी पुढाकार घेतला.

एका रात्रीत 15 किलोमीटर

रात्री 9 ते पहाटे 4 या वेळेत चांदोर दोन आंबा ते मुकुल माधव विद्यालय या रस्त्यावर पांढरे पट्टे मारले. रंगाचा खर्च मंडळाने केला. गेल्या वर्षी असाच उपक्रम अनुलोमने भाट्ये ते फणसोप या रस्त्यावर राबवला होता. फणसोप, कोळंबे, गोळप, निरुळ व चांदोर येथील 20 जण व अनुलोम भागजनसेवक रवींद्र भोवड, विजय निकम, महेश पालकर, दत्ताराम तरळ, मारुती फुटक, प्रकाश संते, रुपेश गार्डी, महेश विचारे, अजित हातीसकर, दत्ताराम तरळ, राजाराम तरळ, दिलीप बारगुडे, सूर्यकांत बारगुडे, संतोष मेस्त्री उपस्थित होते. अनुलोमचे कोकण विभागप्रमुख सदाशिव चव्हाण, उपविभाग जनसेवक स्वप्निल सावंत यांनी या आगळ्या उपक्रमाचे अभिनंदन केले. 

"गतिरोधकांवर पांढरे पट्टे मारण्याचे काम आम्ही लोकसहभागातून केले. अशा सामुदायिक हिताच्या बाबतीत सामान्य नागरिकांनी मोठा सहभाग घेतला पाहिजे तर भ्रष्टाचार न होता अनेक विकासाचे प्रश्‍न मार्गी लागतील.'' 
- संजय पाथरे, निरुळ स्थानमित्र, अनुलोम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: पुण्यात एकाच वेळी दोघांनी संपवले जीवन, तरुण-तरुणीचे मृतदेह सापडले, घटनेने खळबळ

Latest Marathi News Updates : विजेचा धक्का लागून शेतकऱ्यासह दोन बैलांचा मृत्यू

Mumbai Politics: पलावात आमदारांनी घर घ्यावे, म्हणजे उठलं की जाता येईल, ठाकरे गटाचा शिंदेसेनेच्या आमदारांना टोला

"माझ्या नवऱ्याचे विवाहबाह्य संबंध" पंचायत फेम अभिनेत्यावर पत्नीने केलेले गंभीर आरोप

Demat Account: शेअर बाजाराची क्रेझ कमी होत आहे का? डीमॅट अकाउंट बंद करण्याचे प्रमाण वाढले, काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT