Uddhav Thackeray Visit Sindhudurg esakal
कोकण

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे आज सिंधुदुर्गात; कणकवलीत धडाडणार ठाकरेंची तोफ, कोणावर साधणार निशाणा?

‘जनसंवाद’ यात्रेनिमित्त शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आज (ता. ४) सिंधुदुर्ग दौऱ्या‍वर येत आहेत.

सकाळ डिजिटल टीम

जनसंवाद यात्रेनिमित्त ते सध्या कोकण दौऱ्या‍वर आहेत. या पार्श्‍वभूमीवर आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.

कणकवली/कुडाळ : ‘जनसंवाद’ यात्रेनिमित्त शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आज (ता. ४) सिंधुदुर्ग दौऱ्या‍वर येत आहेत. तिन्ही विधानसभा मतदारसंघांतील कार्यकर्त्यांशी ते विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून संवाद साधणार आहेत. त्यांची जाहीर सभा कणकवलीत उपजिल्हा रुग्णालयासमोर सायंकाळी पाचला आहे.

जनसंवाद यात्रेनिमित्त ते सध्या कोकण दौऱ्या‍वर आहेत. या पार्श्‍वभूमीवर आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. आजच्या दौऱ्याची शिवसेनेने (Shiv Sena) जय्यत तयारी केली आहे. खासदार विनायक राऊत (Vinayak Raut), आमदार वैभव नाईक, शिवसेना उपनेते अरुण दुधवडकर, जिल्हाप्रमुख संदेश पारकर, विधानसभाप्रमुख सतीश सावंत, विधानसभा संपर्कप्रमुख अतुल रावराणे, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, युवासेना तालुकाप्रमुख उत्तम लोके, कन्हैया पारकर आदी दौऱ्याचे नियोजन करीत आहेत.

राऊत म्हणाले, ‘कणकवलीत होणारी जाहीर सभा म्हणजे लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले जाणार असल्याचे मानले जात आहे. जाहीर सभेमुळे शिवसैनिकांत उत्साह आहे. उध्दव ठाकरे दुपारी साडेबारा वाजता गांधी चौक-सावंतवाडी आणि कुडाळ-जिजामाता चौक येथे कॉर्नर सभा घेऊन जनतेशी संवाद साधतील. दुपारी तीनला सिंधुदुर्ग किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज मंदिरातील सिंहासन आणि मंदिर नूतनीकरणाचे शिवप्रेमींना लोकार्पण करणार आहेत.

त्यानंतर पाचला आंगणेवाडी भराडी देवीचे दर्शन घेऊन सायंकाळी सहाला कणकवली उपजिल्हा रुग्णालयासमोर जाहीर सभेत संबोधित करणार आहेत. दरम्यान, कुडाळातही शिवसेनेने जय्यत तयारी केली आहे. या पार्श्वभूमीवर आमदार नाईक यांनी तयारीचा आढावा घेतला. जिल्हा पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांनीही पाहणी करून वाहतूक व्यवस्था व सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला. शहरातील जिजामाता चौक येथे सभेसाठी स्टेज उभारण्यात आले आहे.

उद्या रत्नागिरीत येणार

उद्धव ठाकरे सोमवारी (ता. ५) रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. राजापूर धूतपापेश्वर मंदिरात दर्शन घेऊन रत्नागिरी आठवडा बाजार ठिकाणी जनतेशी संवाद साधणार आहेत. त्यानंतर मुंबई-गोवा महामार्गाच्या दुरवस्थेची पाहणी करणार आहेत व सायंकाळी चिपळूण येथे जनतेशी संवाद साधणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT