shiv sena leader ramdas kadam speech in ratnagiri
shiv sena leader ramdas kadam speech in ratnagiri 
कोकण

भाजप नेत्यांच्या दौर्‍याने कोरोना होत नाही का? ; रामदास कदम

सकाळ वृत्तसेवा

खेड (रत्नागिरी) : विधासभेच्या निवडणुकशिवाय कधीही तोंड न उघडले माजी आमदार नातू आता निवडणूका नसताना बोलायला लागले. हे आश्‍चर्य नव्हे, तर मोठा विनोदच म्हणायला हवा. नातू यांना नेमके काय झोंबले हे कळेनासे झाले , अशी उपरोधिक टीका शिवसेना नेते रामदास कदम यांनी केली. 


गेल्या आठवड्यात कदम यांच्या दौर्‍यावर माजी आमदार नातू यांनी टीका केली होती. त्याचा समाचार घेताना  रामदास कदम म्हणाले, माझ्या दौर्‍यामध्ये मी कुठेही सामाजिक अंतराचा नियम तोडलेला नव्हता. तहसील कार्यालयामध्ये जी बैठक घेतली, त्या बैठकीला जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी व इतर वरिष्ठ अधिकारी होते. त्या बैठकीमध्ये जिल्ह्यात कोरोनासाठी काय उपाययोजना केल्या आहेत, यापुढील नियोजन कसे करणार आहेत, त्याचा आढावा घेतला. या बैठकीमध्ये 7 ते 8 फुट अंतर ठेवून आसन व्यवस्था होती. कुठेही नियमांचा भंग होऊ दिला नाही. मी सुद्धा माझी स्वत:ची, माझ्या अंगरक्षकांची, माझ्या वाहनचालकांची तपासणी करून सोबत वैद्यकीय अधिकार्‍यांचा दाखला घेऊल आलो होतो. त्याची प्रत मुद्दाम नातू यांच्याकडे माहितीसाठी पाठवित आहे. तसेच जिल्ह्यामध्ये येण्यासाठी काढलेल्या परवानगीची प्रत सोबत जोडत आहे.

नातू यांना नेमके काय झोंबले तेच कळले नाही

कशेडी घाट हे रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रवेशद्वार असल्यामुळे 5 ते 6 तास लोकांना तपासणीसाठी थांबावे लागत होते. म्हणून मी जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदार यांच्यासह कशेडी येथे भेट दिली. त्यामुळे तिथे चाललेल्या वेळ काढूपणावर सूचना देऊन 15 ते 20 मिनिटांपर्यंत सर्व गाड्या तेथून निघून जातील अशी व्यवस्था केली. तिथेही अंतर ठेवण्याच्या नियमाची अंमलबजावणी केली गेली. तसेच लवेल येथील हॉस्पिटलमध्ये 200 ते 250 पर्यंत लोकांना ठेवले जात होते. त्याबाबतही हॉटेल व लॉजेस भाड्याने घेऊन लोकांची योग्य ती व्यवस्था करण्याचा निर्णय झाला. जिल्ह्याच्या जनतेच्या हिताचे अनेक निर्णय त्या बैठकीमध्ये झाले. मात्र विनय नातू यांना अचानक असे काय झाले की कोणतीही शहानिशा न करता माझ्यावर तुटून पडले. आहे, असे कदम यांनी सांगितले. 


भाजप नेत्यांच्या दौर्‍याने कोरोना होत नाही का?

पक्ष बघून किंवा पुढारी बघून कोरोना होत नाही हे नातुकडून शिकण्याची आवश्यकता नाही. मात्र प्रवीण दरेकर मुंबईतून रत्नागिरीत आलेले आपल्याला कसे चालले, फक्त भाजपाच्या नेत्याच्या दौर्‍याने कोरोना होत नाही असे आहे की काय, असा चिमटाही कदम यांनी काढला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Health Insurance: विमा घेऊनही चिंता कायम! 43 टक्के पॉलिसी धारकांना मिळत नाही क्लेम; धक्कादायक अहवाल समोर

Water Crisis: देशासमोर पाण्याचे संकट, 150 प्रमुख जलाशयांमधील पाण्याची पातळी घसरली

लग्न झालेलं असो किंवा नसो, स्वेच्छेने ठेवलेल्या लैंगिक संबंधांना चुकीचं म्हणता येणार नाही- हायकोर्ट

Panchayat 3 Release Date Out: प्रतीक्षा संपली! 'पंचायत-3' ची रिलीज डेट जाहीर, 'या' दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला येणार सीरिज

Latest Marathi News Live Update : दिल्लीच्या रस्त्यावर थरार, पोलीस गुंडांमध्ये चकमक

SCROLL FOR NEXT