shiv sena mla bhaskar jadhav criticism on collector political marathi kokan news 
कोकण

"चार दिवसानंतर पुन्हा नवीन आदेश ; जिल्ह्यात संभ्रमावस्था'' 

मुझफ्फर खान

चिपळूण :  शिमगोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हाधिकारी दर चार दिवसानंतर वेगळा आदेश काढत आहेत. त्यामुळे लोकांमध्ये संभ्रमावस्था आहे. जिल्हाधिकार्‍यांच्या अशा वागण्यामुळे गावोगावी आणि भावाभावांमध्ये भांडणे होण्याची शक्यता आहे. शिमगोत्सवातील रूढी - परंपरांची माहिती घेवून जिल्हाधिकार्‍यांनी निर्णय घ्यावा असा सल्ला त्यांना शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यानी आज पत्रकार परिषदेत दिला.

ते म्हणाले, कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर शिमगोत्स कसा साजरा करावा याबाबत जिल्हाधिकारी आदेश काढतात. तो जिल्ह्यातील शासकीय कार्यालयात पोहचेपर्यंत जिल्हाधिकार्‍यांचा आदेश बदललेला असतो. कोरोना महामारीच्या काळात गावोगावातील लोकांनी वाद, तंटे मिटवले.शासनाच्या प्रत्येक नियमांचे पालन करून लोक एकोप्याने राहण्याचा आणि कोरोनावर मात करण्याचा प्रयत्न करीत आहेत. आपसातील मतभेद विसरून अनेक गावांमध्ये लोक शांततेने शिमगोत्सव साजरा करत आहेत. मात्र जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा दोन ते चार दिवसानंतर वेगळा आदेश काढत आहेत. 

जिल्हाधिकार्‍यांचा आदेश गावात पोहचल्यानंतर लोकांमध्ये मतभेद तयार होऊन आपसात भांडणे होण्याची वेळ आली आहे. एकाच्या हातात एक आदेश आहे तर दुसर्‍याच्या हातात दुसराच आदेश असतो. काही गावातील लोकांमध्ये मतभेद तयार झाले. आपसात भांडण नको म्हणून लोक माझ्याकडे येवून मार्ग काढण्याची मागणी करत आहेत. जिल्हाधिकारी कोणाच्या सल्ल्याने वेगवेगळे आदेश काढतात मला माहित नाही पण जिल्हाधिकारी पूर्वी रत्नागिरी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी होते.

जिल्हाधिकारी म्हणून काम करताना त्यांना कोकणातील सण, उत्सव, रुढी परंपरा त्यांना माहित असायला पाहिजे. जर त्यांना माहित नसतील तर त्यांनी माहिती करून घेतली पाहिजे. एखादा निर्णय घेण्यापूर्वी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींशी त्यांनी चर्चा केली पाहिजे म्हणजे त्यांचा कोणताही निर्णय चुकीचा होणार नाही. असे आमदार जाधव यांनी सांगितले. 

संपादन - अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Devendra Fadnavis : फडणवीस-शिंदे वेगळे लढणार! भाजपच्या मंत्र्यांनीच दिला मोठा इशारा

Thane News: कल्याणमध्ये मंगळवारी पाणीबाणी! ९ तास पाणीपुरवठा बंद

Indian Destinations: भारतातील 'ही' 5 ठिकाणे परदेशापेक्षाही आहेत सुंदर, आयुष्यात एकदा तरी नक्की भेट द्या

Shocking Crime : संतापजनक ! आईच्या प्रियकराचा ८ वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार, नशेच्या गोळ्या दिल्या अन्...

Dmart Sale : डीमार्ट तुम्हाला लुटतंय? DMart बाहेर आईस्क्रीम,पॉपकॉर्न विकणारे कोण असतात माहितीये? हे सिक्रेट पाहा नाहीतर खिसा होईल रिकामा

SCROLL FOR NEXT