Shiv Sena MLA Bhaskar Jadhav video taking on the role of a supporter refinery project is currently going viral on social media 
कोकण

प्रकल्प पुन्हा एकदा चर्चेत : व्हिडीओ व्हायरल , रिफायनरी समर्थकाना आमदार जाधवांचे बळ...

सकाळ वृत्तसेवा

राजापूर (रत्नागिरी) :  शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी रिफायनरी प्रकल्पाच्या समर्थनाची भूमिका घेतल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. त्यामुळे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर काहीसा मागे राहिलेला प्रस्तावित रिफायनरी प्रकल्प पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. जाधव यांनी रिफायनरी समर्थनाची भूमिका घेतल्याने प्रकल्प समर्थकांना चांगलेच बळ मिळाले आहे. कोकणच्या विकासासाठी कोकणातील सर्व लोकप्रतिनिधींनी भूमिका घ्यावी असे आवाहन प्रकल्प समर्थकांतून करण्यात येत आहे.  


तालुक्यातील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पाला विरोध केला जात आहे. या विरोधाला शिवसेनेसह अन्य राजकीय पक्षांनी पाठबळही दिले. मात्र, गेल्या दीड वर्षापासून प्रकल्पाचे समर्थन करणार्‍या कोकण जनकल्याण प्रतिष्ठानला प्रकल्प विरोधाची धार कमी करण्यात कमालीचे यश आले आहे. साडेआठ हजार एकरपेक्षा अधिक जमीन मालकांनी प्रकल्पासाठी आपली जमीन देण्याचे मान्य केले असून तशी संमतीपत्रेही जनकल्याण प्रतिष्ठानकडे दिली आहेत. प्रकल्पाला विरोध करणारी आंदोलने झाली तशी प्रकल्प राजापूरातच व्हावा यासाठी आंदोलने झाली आहेत.

कोरोनामुळे केलेल्या लॉकडाऊनमुळे उद्योग व्यवसाय ठप्प झाले. अनेकांवर बेरोजगारीची कुर्‍हाड कोसळली आहे. अशा स्थितीमध्ये कोकणातील तरूणांना रोजगाव हवा असेल तर, रिफायनरी प्रकल्प होणे गरजेचे असल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यामध्ये सेनेचे आमदार जाधव यांनी रिफायनरी प्रकल्पाच्या केलेल्या समर्थनाचे पाठबळ मिळाले आहे.   


व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये आमदार जाधव यांनी कोकणात येणार्‍या सर्वच प्रकल्पांना आपण विरोध करत राहीलो, तर, येथील तरूणांच्या हाताला काम कोठून देणार ? असा सवाल उपस्थित केला आहे. कोकण विकासाला चालना देणार्‍या रिफायनरीसह अन्य प्रकल्पांचे स्वागत करीत असल्याचे वक्तव्य त्यानी केले आहे.

शिवसेनेच्या भूमिकेकडे लक्ष

रिफायनरी प्रकल्पाचे समर्थन करणार्‍या सागवे विभागातील शिवसैनिकांवर शिवसेनेने कारवाई केली होती. सागवे येथे झालेल्या जाहीर मेळाव्यामध्ये खासदार विनायक राऊत यांनी प्रकल्पाचे समर्थन करणार्‍या शिवसैनिकांना चप्पलेने मारा असे वक्तव्य केले होते. असे असताना शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी रिफायनरी समर्थनाची भूमिका घेतल्याने सेना नेतृत्वाची रिफायनरीबाबत आता कोणती भूमिका राहणार , याकडे सार्‍यांचे लक्ष लागले आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cigarette Price: सिगारेट ओढणाऱ्यांना मोठा झटका! १८ रुपयांची सिगारेट थेट ७२ रुपयांवर पोहोचणार? नेटकरी म्हणाले- आता सर्व...

Gold Rate Today : सोन्याचा नवा उच्चांक ! आठवड्यात ७ हजार रुपयांनी महागले, चांदीतही ३७००० ची वाढ; जाणून घ्या आजचा ताजा भाव

नोरा फतेही पुन्हा प्रेमात? फुटबॉलपटूला डेटिंग करत असल्याची अफवा, दुबई आणि मोरोक्कोमध्ये गाठीभेटी सुरु

PCMC Election : पिंपरीतील तीन जागांवर युती काढणार तोडगा; नेत्यांकडून बैठकांचा सपाटा

U19 IND vs SA: १४ वर्षांचा वैभव सूर्यवंशी झाला टीम इंडियाचा कर्णधार; द. आफ्रिकेत नेतृत्व करताना घडवणार इतिहास

SCROLL FOR NEXT