sindhdudurg esakal
कोकण

शिवसेना नेते सतीश सावंतांच्या निकटवर्तीवर धारदार शस्त्राने हल्ला

जिल्हा बँक निवडणुकीचे पडघम

सकाळ वृत्तसेवा

कणकवली : जिल्हा बँकेचे अध्यक्ष तथा शिवसेना नेते सतीश सावंत (Satish Sawant) यांचे निकटवर्ती असलेले करंजे (Karanje) गावचे माजी सरपंच शिवसैनिक संतोष परब (Santosh Parab) यांच्यावर आज सकाळी अज्ञात दोन जणांनी चाकू हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केले आहे. सिंधुदुर्ग जिल्हा बँक (Sindhdudurg Bank)निवडणुकीत परब यांचा थेट सहभाग असल्याने त्यांच्यावर हा हल्ला झाल्याचे बोलले जात आहे. पोलिसांनी जागोजागी नाकाबंदी केली असून, संशयित आरोपी हे कनेडी पर्यंत पसार झाल्याचे आतापर्यंत स्पष्ट झाले आहे.

याबाबत माहिती अशी, संतोष परब हे कणकवली शहरातील कनक नगर येथे साक्षी अपार्टमेंटमध्ये राहतात. आज सकाळी साडे दहाच्या सुमारास शहरातून मोटरसायकलने घराकडे जात असताना घरापासून काही अंतरावर नरडवे रस्त्यावर सिल्वर कलरच्या इनोव्हा गाडीतून अज्ञात आणि त्यांना त्यांच्या दुचाकीला धडक दिली. ते खाली पडल्यानंतर गाडीतून उतरलेल्या दोघांनी त्यांच्या छातीत धारदार हत्याराने हल्ला केला. या घटनेनंतर जखमी परब यांना येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी शिवसेना नेते सतीश सावंत यांच्यासह नगरसेवक कन्हैया पारकर सुशांत नाईक, राजू शेट्टी राजू राठोड भास्कर राणे, बेनी डिसोजा व अन्य शिवसेनेचे कार्यकर्ते दाखल झाले.

पोलिस निरीक्षक सचिन हुंदळेकर तसे पोलीस पथक आरोपीचा शोध घेत आहेत. पोलिस उपविभागीय अधिकारी नितीन कटेकर ही घटनास्थळाची पाहणी करून उपजिल्हा रुग्णालयात दाखल झाले होते. या घटनेचे गांभीर्य वाढले असून, जिल्हा बँक निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर हा हल्ला झाल्याचे बोलले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC विद्यार्थ्यांचं आंदोलन मागे, चौकशी पूर्ण होईपर्यंत अध्यक्ष सक्तीच्या रजेवर; मध्यरात्री घडामोडी, पुण्यात आंदोलकांचा जल्लोष

IND vs WI, 3rd T20I: "विंडीजला हलक्यात घेऊ नका...", विजयानंतरही श्रेयस अय्यरची चिंता मिटेना; काय म्हणाला, वाचा

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

Maharashtra Weather : राज्यात ऑक्टोबर हिटचा तडाखा कायम! उन्हाचा चटका वाढणार; जाणून घ्या तुमच्या जिल्ह्यात कसे असेल हवामान?

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

SCROLL FOR NEXT