कोकण

सामंत, केसरकर आयत्या बिळावर नागोबा: विनायक राऊत

ज्यांनी सेनेतून बंडखाेरी केली त्यांचा हिशाेब जनताच करेल, विनायक राऊतांचा इशारा

मुझफ्फर खान

ज्यांनी सेनेतून बंडखाेरी केली त्यांचा हिशाेब जनताच करेल, विनायक राऊतांचा इशारा

चिपळूण : आमदार उदय सामंत आणि दीपक केसरकर म्हणजे आयत्या बिळातील नागोबा असल्याने त्यांना शिवसेनेत आहे असे म्हणण्याचा नैतिक अधिकार नाही, अशी टीका रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे खासदार विनायक राऊत यांनी आज चिपळूण येथे बंडखोर आमदार उदय सामंत आणि केसरकर यांच्यावर केली.

परशुराम घाटाची पाहणी केल्यानंतर त्यांनी विश्राम गृहावर पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, रत्नागिरी मध्ये उदय सामंत यांनी शिवसेना वाढविली नाही तर शिवसेनेने उदय सामंत यांना वाढविले. बंडखोरी नंतरही शिवसेना पक्ष मजबूतीने उभा आहे. आमदार पक्ष सोडून गेले. मतदार आणि कार्यकर्ते पक्षाबरोबर आहेत. जे आमदार खरेदी विक्रीच्या बाजारत विकले गेले त्याची आम्हाला अजिबात चिंता नाही.

आताची शिवसेना ही 1966 कालावधीतील शिवसेना आहे. हे गृहित धरुन आम्ही पुन्हा शिवसेनेची उभारणी करणार आहाेत. मध्यावधी निवडणुका झाल्यास पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली जनता शिवसेनेचे शंभर आमदार निवडून देतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. खासदार राऊत म्हणाले रत्नागिरी जिल्ह्यातील शिवसेना ही पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची शिवसेना आहे. ज्यांनी सेनेतून बंडखाेरी केली त्यांचा हिशाेब जनताच करेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fake Acid Attack Case : धक्कादायक! दिल्लीत विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ल्याचं प्रकरण बनावट असल्याचे निष्पन्न!

दिवाळीपूर्वी मदत देण्याची घोषणा, तरी..! निम्मा सोलापूर जिल्हा अतिवृष्टीच्या मदतीपासून दूर; 3.95 लाख शेतकऱ्यांना मिळाली नाही भरपाई, तालुकानिहाय संख्या...

सायबर फ्रॉडपासून बचावासाठी ‘ही’ पंचसूत्री लक्षात ठेवाच! अनोळखी लिंकवर क्लिक करू नका, नाहीतर रिकामे होईल बॅंक खाते; सोलापूर शहर सायबर पोलिस म्हणतात...

Uddhav Thackeray Statement : ''मुंबईत अ‍ॅनाकोंडा येऊन गेला अन् भूमिपूजन करून गेला, त्याला मुंबई गिळायची'' ; उद्धव ठाकरेंचं विधान!

Swargate News : एसटीला ‘लाडकी बहिणच’ नकोशी! बससेवेत महिला आणि ज्येष्ठ नागरिकांवर भेदभाव

SCROLL FOR NEXT