Short Film Based On Corona Who Produced Sindhudurg Marathi News 
कोकण

कोरोनावर आधार लघुचित्रपट, कोणाची निर्मिती ? काय साकारलयं ?  

अजय सावंत

कुडाळ ( सिंधुदुर्ग ) - कोरोना म्हणजे आज जगासमोर उभा राहिलेला आरोग्यविषयक महाभयंकर प्रश्न. या समस्येने जीवितहानी घडवली. त्यात अनेक निरपराध व्यक्ती बळी पडण्याच्या बातम्या आज रोज आपण ऐकतो, पाहतो. हे "आधार' या लघुपटातून साकारण्याचा प्रयत्न केला आहे. कुटुंबाचा आधार गेल्यावर काय संकट उभे राहते? याचे वास्तव चित्रण यातून दिसते. 

स्नेहांश एंटरटेनमेंट आणि हेल्पिंग हॅंड यांच्या समन्वयातून तसेच श्रीगणेश साहित्यकला मंच व अक्षरसिंधु साहित्यकला मंच कणकवली यांच्या सहयोगाने निर्मिती केला गेलेला "आधार' हा नवीन लघुचित्रपट सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. मुंबईतून कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्याची संख्या वाढत आहे. सुरक्षिततेच्या उद्देशाने अनेक चाकरमानी आपापल्या गावी जाण्याचा प्रयत्न करतात; परंतु कोरोना सर्वत्र पसरू नये यासाठी तो पसरण्यापूर्वीपासूनच सेवा बजावणाऱ्या पोलिस दल, आरोग्यसेवा अशा विभागात काम करणाऱ्या लोकांनाही आपल्या गावी जाण्याची व सुरक्षित राहण्याची गरज पूर्ण करता येत नाही. अशावेळी एका सेवा महत्त्वाची मानून गावी जाणे टाळत मुंबईतच सेवा बजावणाऱ्या कर्तव्यदक्ष पोलिस कर्मचाऱ्यावर आलेले कोरोनाचे संकट गावी निघून गेलेल्या त्याच्या वडिलांना समजते तेव्हा होणारी त्यांची घालमेल, वडील व नवऱ्याच्या काळजीने व्याकुळ झालेल्या बायका, मुलांचं मन मांडण्याचा प्रयत्न या लघुचित्रपटात केला आहे.

यामध्ये दीपक परब, ऍड. संजय राणे, प्रणाली चव्हाण, रुद्राली परब, सृष्टी देसाई, सिद्धेश खटावकर, प्रमोद तांबे आदी कलाकारांनी भूमिका साकारल्या आहेत. "आधार' हा लघुचित्रपट एका वेगळ्या मात्र सद्यस्थितीत महत्त्वाच्या विषयावर भाष्य करणारा ठरत आहे. "खांदो' या लेखक महेश गोसावी यांच्या मूळ कथेवर आधारित या लघुचित्रपटाची संकल्पना, संवादलेखन व दिग्दर्शन प्रा. शेखर गवस, छायांकन नितेश चिंदरकर व साहिल राणे, संकलन रविकिरण शिरवलकर यांची असून निर्मिती मयूर चव्हाण यांनी केली आहे. या कलाकृतीसाठी रामचंद्र कुबल, अमोलिक मांगले, वैशाली मांगले, चेतन तेंडुलकर, रमेश झेमणे, सागर नांदगावकर, अजय फोंडेकर, दयानंद कसालकर, आनंद जाधव, सत्यवान गावकर, विठ्ठल चव्हाण, शशांक परब, मनेश चिंदरकर इत्यादींचे सहकार्य लाभले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Local Accident: रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचे बळी प्रवासी ठरले! मुंबई लोकलवरील अपघातात ३ जणांचा मृत्यू

Manchar Leopard : मंचर परिसरात तब्बल २० बिबट्यांचा वावर, पेठ येथे पोलट्रीवर बिबट्याची बैठक!

WPL 2025 Retention: मुंबई इंडियन्सने 5 खेळाडूंना केले रिटेन, बाकीच्या 4 संघाचं काय? बघा कोणाकडे लिलावासाठी किती पैसे राहिले शिल्लक

CSMT Protest: रेल्वे कर्मचाऱ्यांचे आंदोलन; मुंबई लोकलची सेवा विस्कळीत, ट्रेन तब्बल १ तास उशीराने, संपूर्ण प्रकरण काय?

Latest Marathi Live Update News : राज ठाकरेंना सोबत घेण्यास काँग्रेसचा विरोध

SCROLL FOR NEXT