alibag sakal
कोकण

श्रावण विशेष : श्री राधाकृष्ण मंदिर अलिबागकरांचे आराध्य दैवत

गवळीवाडीमध्ये राधाकृष्ण मंदिर उभारण्याची संकल्पना येथील तरुणांनी आखली

प्रमोद जाधव

अलिबाग शहरापासून काही अंतरावर असलेले गवळी वाडीतील श्री राधाकृष्ण मंदिर भाविकांसाठी श्रद्धास्थान आहे. या मंदिरात स्थानिकांसह वेगवेगळ्या गावांसह शहरांतील भाविक दर्शनासाठी येतात. त्यामुळे राधाकृष्ण मंदिराची ख्‍याती सर्वदूर पसरली आहे.

गवळीवाडीमध्ये मोठ्या प्रमाणात गवळी समाज आहे. राधाकृष्ण मंदिर या ठिकाणी उभारण्याची संकल्पना येथील तरुणांनी आखली. ही संकल्पना अखेर प्रत्यक्षात उतरली. तरुणांनी एकत्र येऊन एक चांगले मंदिर या ठिकाणी उभारण्यासाठी मेहनत घेतली. काहींनी मंदिरासाठी लागणारे साहित्य, वस्तू आणल्या. काहींनी पैसे दिले; तर काहींनी राधा-कृष्णाची मूर्ती भेट देऊन लोकसहभागातून एक चांगले मंदिर उभारण्यात आले.

गेल्या अनेक वर्षांपासून उभे असलेले राधाकृष्णाचे मंदिर आबालवृद्धांचे श्रद्धास्थान ठरले आहे. दर वर्षी कृष्ण जन्माष्टमी येथे मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. महिला, पुरुष व लहान मुले एकत्र येऊन पाळण्याची सजावट करतात. मंदिराला फुलांनी सजवले जाते. त्यानंतर रात्री बारा वाजता पाळणा हलवून कृष्ण जन्माष्टमीचा सण साजरा केला जातो. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मंदिरासमोर दहीहंडी उभारली जाते. दुपारी सांस्कृतिक कार्यक्रम झाल्यावर दहीहंडी फोडण्याचा कार्यक्रम साजरा केला जातो. दहीहंडी फोडण्यामध्ये पुरुषांबरोबरच महिलादेखील सहभाग घेतात. मंदिरात राधाकृष्ण मूर्तीसह गणपतीची मूर्ती आहे. सभामंडपात कासवाची मूर्ती असून दर गुरुवारी रात्री या मंदिरात आरती केली जाते. ही परंपरा आजही गवळीवाडीमध्ये कायम आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Education : विधान परिषदेत शिपायाच्या कंत्राटी पदावरून पेच; सत्ताधारी शिक्षक, पदवीधर आमदारांनीच केला सभात्याग

Ashadhi Ekadashi 2025: मुखात तुझे नाव, डोळ्यात तुझे गाव;डिगडोहमध्ये ‘विठ्ठल रखुमाईचा दर्शन सोहळा, माऊली ग्रुपचा उपक्रम

Ahilyanagar: 'श्रीरामपूरकरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्वागत'; ढोल-ताशांच्या गजरात, फटाक्यांच्या आतषबाजीत जल्लोष

Pune Crime : सोसायट्यांच्या सुरक्षेचा प्रश्‍न पुन्हा ऐरणीवर, कोंढव्यातील घटनेनंतर भीती; सीसीटीव्ही कॅमेरे, सुरक्षा यंत्रणेवरही प्रश्‍नचिन्ह

Ashadhi Wari 2025:'वरुणराजाच्या साक्षीने संत भेटीचा सोहळा'; बोंडले येथे संत तुकाराम महाराज व संत सोपानदेव महाराज यांची भेट

SCROLL FOR NEXT