Elephant
Elephant 
कोकण

त्याला पकडायचे की नाही, याबाबत वनविभागाकडून शेतकऱ्यांची स्वाक्षरी मोहिम...कुठे आणि कुणाला ते वाचा

सकाळ वृत्तसेवा

साटेली भेडशी (जि. सिंधुदुर्ग) : हत्ती पकड मोहीम राबवावी की नको, याबाबत हत्तीबाधित क्षेत्रातील शेतकऱ्यांची मते आजमावण्याचे काम वनविभागाने सुरू केले आहे. त्यासाठी शेतकऱ्यांच्या सह्या घेण्याची मोहीम कोनाळ वनविभागाच्या वतीने सुरू झाली आहे. 

तिलारी खोऱ्यातील आयनोडे हेवाळे, घाटीवडे, बांबर्डे, केर भेकुर्ली, मोर्ले, सोनावल आदी गावात हत्तींचा वावर आहे. पाच ते सहा हत्तींचा कळप तिलारी परिसरात असला तरी एक टस्कर एकटाच फिरतो. त्याने आजूबाजूची अनेक गावे पादाक्रांत केली आहेत. शिवाय तो निर्धास्तपणे मानवी वस्तीकडे येतो. मोर्लेत तो मंदिराजवळ आला होता. अनेकांच्या अंगणातही त्याने धडक दिली आहे. सगळया गावकऱ्यांवर त्याची दहशत आहे. त्याचा अगडबंब देह, त्याचा थेट चाल करुन येण्याचा स्वभाव यामुळे अनेकांच्या मनात धडकी भरते.

त्याला वस्तीत येण्यापासून रोखावा आणि त्याला पकडून नैसर्गिक अधिवासात सोडावा अशी गावकरी मागणी करत आहे. त्यामुळे हत्तीला पकडून आंबोली नांगरतास जवळील घाटकरवाडीतील नियोजित हत्ती कॅम्पमध्ये ठेवण्याचा विचार वनविभाग करत आहे. त्याला तेथील गावकरी आणि ग्रामपंचायतीचा विरोध असला तरी हत्ती पकड मोहीम राबवण्याची पूर्वतयारी म्हणून वनविभाग सह्यांची मोहीम राबवून मत आजमावण्याचा प्रयत्न करत आहे. हत्ती पकड मोहीम राबवावी आणि राबवू नये, अशा दोन मतांच्या आधारावर सह्या घेण्यात येत आहेत. त्यानंतर हत्ती पकड मोहीम राबवण्याबाबतचा निर्णय होणार आहे. 

हत्तींना पकडू नका; सांभाळा 
दोडामार्ग तालुक्‍यातील अनेक शेतकरी, जिल्ह्यातील अनेक पर्यावरणप्रेमी आणि निसर्ग अभ्यासकांना हत्तीला पकडण्याऐवजी त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था राखीव क्षेत्रात करुन त्याचे संगोपन करावे. हत्ती वस्तीकडे येऊ नयेत म्हणून आवश्‍यक उपाययोजना कराव्यात, शेतकऱ्यांना नुकसानभरपाई वाढवून द्यावी; पण हत्तींना तिलारी राखीव क्षेत्रातच ठेवावे असे वाटते. 

टस्करचा क्रमांक पहिला लागणार 
हत्ती पकड मोहीम राबवण्याचे जर निश्‍चित झाले तर केर मोर्ले खरारीब्रिज परिसरात वावर असणाऱ्या टस्कर हत्तीला पहिल्यांदा पकडण्यात येणार आहे. त्याच्याबद्दल लोकांच्या मनात अधिक भीती असल्याकारणाने वनविभागाला त्याला प्रथम जेरबंद करावे लागेल असे एका वनाधिकाऱ्याने सांगितले. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pension Department: पेन्शनधारकांना सरकारची मोठी भेट! नवीन ऑनलाइन पोर्टल केले लाँच; मिळणार 'या' सुविधा

Latest Marathi News Live Update: सलमान खान गोळीबार प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल; सीबीआय तपासाची केली मागणी

Indian Navy : अरबी समुद्रात पुन्हा भारतीय नौदलाची हवा, 20 पाकिस्तानींसाठी ठरले देवदूत

Bhushan Pradhan: 'या' अभिनेत्रीच्या प्रेमात पडलाय भूषण प्रधान? व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, "लवकर लग्न करा!"

Virat Kohli : 'खूप फसवणूक झाली मात्र आता...' विराट कसा झाला 634 कोटी रूपयाचा मालक?

SCROLL FOR NEXT