sindhudurg district 45 non teach servant kokan marathi news 
कोकण

'त्या' कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर टांगती तलवार.....

सकाळ वृत्तसेवा

ओरोस  (सिंधुदुर्ग) : माध्यमिक शिक्षकांनंतर आता शासनाने माध्यमिक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना अतिरिक्त ठरविले आहे. अतिरिक्त ठरलेल्यांवर समायोजनाचे गंडातर आणले आहे. जिल्ह्यात अशाप्रकारे 45 जण अतिरिक्त ठरले असून अद्याप त्यांच्या समायोजनाचा आदेश न दिल्याने हे सर्व कार्यरत शिक्षण संस्थेत कार्यरत आहेत.

 शासन आदेशानुसार माध्यमिक शिक्षण विभागाने 2018-19 या शैक्षणिक वर्षासाठीची शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची संचमान्यता निश्चित केली आहे. नव्या संचमान्यतेनुसार जिल्हय़ात 45 शिक्षकेतर कर्मचारी अतिरिक्त ठरले आहेत. 2011 च्या पट पडताळणीनंतर शासनाने मे 2012 पासून शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या भरतीला बंदी घातली होती. दरम्यान शिक्षक भरतीवरील निर्बंध काहिसे शिथील करण्यात आले होते. तसेच दरवर्षी नव्याने संचमान्यता करण्याचे आदेश देण्यात आले होते.

त्यानुसार गतवर्षी पर्यंतची संचमान्यता पूर्ण करुन माध्यमिक शिक्षण विभागाने काही शिक्षकांना अतिरिक्त ठरविले होते. त्यापैकी काहींना माध्यमिक शाळामधून तर अनेकांना प्राथमिक शाळामध्ये समायोजित करण्यात आले होते. 2018-19 च्या शिक्षक संचमान्यतेला मात्र शासनाने स्थगिती दिली होती. त्यामुळे यावर्षी शिक्षकांची संचमान्यता करण्यात आलेली नाही. दरम्यान शिक्षक संचमान्यतेला स्थगिती दिली असली तरी 2012-13 नंतर आकृती बंधाच्या प्रक्रियेत खोळंबलेली शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची संचमान्यता करण्याचे आदेश शासनाने दिले होते. याबाबतचा नवीन आकृतीबंध शासनाने निश्चित करुन दिला आहे. 

नवीन आकृती बंधानुसार शासनाने माध्यमिक शाळातील शिपाई पदाला कात्री लावली आहे. त्यामुळे शिपाई पदावर कायमचे गंडातर आले आहे.कनिष्ठ लिपिक, वरीष्ठ लिपिक, ग्रंथपाल आणि प्रयोगशाळा सहाय्यक हि चारच पदे नवीन आकृती बंधात समाविष्ट केली आहेत. या नवीन आकृती बंधानुसार करण्यात आलेल्या संच मान्यतेत शिक्षकेत्तर तब्बल 45 पदे अतिरिक्त ठरली आहेत. अतिरिक्त ठरलेल्या या पदाच्या समायोजनाबाबत शासनाकडून अद्याप कोणतेहि आदेश नाहित. ते प्राप्त होताच मार्गदर्शक प्रणालीनुसार संबंधिताचे समायोजन करण्यात येणार आहे. 

जिल्ह्यात कनिष्ठ लिपिकची 204 पदे मंजूर असून 144 कार्यरत आहेत. 60 पदे रिक्त असून एकही अतिरिक्त नाही. वरिष्ठ लिपिकची 28 पदे मंजूर असून 35 कार्यरत आहेत.9 पदे रिक्त असून 16 अतिरिक्त आहेत. ग्रंथपालची 7 पदे मंजूर असून 23 कार्यरत आहेत. एक रिक्त असून 17 अतिरिक्त आहेत. प्रयोगशाळा सहाय्यकची 26 पदे मंजूर असून 31 पदे कार्यरत आहेत. 7 पदे रिक्त असून 12 पदे अतिरिक्त आहेत. जिल्ह्यात कनिष्ठ लिपिक, वरिष्ठ लिपिक, ग्रंथपाल व प्रयोगशाळा सहाय्यक मिळून 265 मंजूर असून त्यातील 233 पदे कार्यरत आहेत. 77 पदे रिक्त असून एकूण 45 अतिरिक्त आहेत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Madhuri Elephant Nandani : अखेर माधुरी हत्तीण दोन दिवसात कोल्हापुरात येणार! वनतारातून नांदणीकडे प्रस्थान; राजू शेट्टीनी सोशल मीडियावर दिली माहिती

India T20I Squad : हर्षित राणाला नवी दुखापत, अफगाणिस्तान मालिका अन् Asian Games ला मुकणार! विदर्भाच्या खेळाडूला टीम इंडियात संधी

मुंबई गोवा हायवेच्या उद्घाटनाला येणार नाही, लाज वाटते; गडकरींचे विधान, म्हणाले, आता वेगळा वर्ल्ड रेकॉर्ड करायचाय

Maratha Reservation: मनाेज जरांगेंना ज्योती मेटेंचा थेट सवाल; ‘१२ मागण्या मान्य झाल्या, मग मुंबईला जाण्याचा हट्ट कशासाठी?’

Marathi News Live Updates : जरांगेंच्या समर्थनार्थ मराठा तरुणांचा आक्रमक एल्गार, पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन

SCROLL FOR NEXT