Bank election Esakal
कोकण

जिल्हा बँक निवडणुकीचे बिगुल? आता निवडणुकीची धामधूम

याचिका फेटाळली; उद्यापासून आचारसंहिता शक्य

सकाळ वृत्तसेवा

ओरोस : जिल्हा बँकेच्या (Bank Election 2021) मतदार यादीतून नाव डावलल्याबाबत उच्च न्यायालयात दाखल याचिका फेटाळण्यात आली. त्यामुळे लांबणीवर टाकलेली जिल्हा बँकेची निवडणूक प्रक्रिया सोमवारपासून सुरू होण्याची शक्यता आहे. राज्य सहकार निवडणूक प्राधिकरणने जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाची निवडणूक घेण्याचे आदेश जिल्हा सहकार विभागाला दिले आहेत. या विभागाने निवडणूक कार्यक्रम तयार करून कोकण विभागीय सहकार आयुक्त यांच्याकडे पाठविला आहे. त्याला मान्यता मिळून सोमवारपासून जिल्हा बँक निवडणूक आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे.

राज्य सहकार निवडणूक प्राधिकरणने जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाची निवडणूक घेण्याचे आदेश जिल्हा सहकार विभागाला दिले आहेत.

मे २०२० मध्ये मुदत संपलेली असताना कोरोनामुळे दीड वर्ष लांबलेल्या जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी ऑक्टोबरमध्ये अंतिम मतदार यादी जाहीर करण्यात आली होती. त्यामध्ये ९८२ मतदार निश्चित केले होते. अंतिम मतदार यादीनंतर निवडणूक कार्यक्रमाकडे सर्वांचेच लक्ष होते. निवडणूक कार्यक्रम जाहीर होणार असतानाच मतदार यादीत नाव डावलले गेल्याने काही संस्थांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. परिणामी निवडणूक पुढे ढकलली गेली.

सहावेळा मिळाली होती स्थगिती

जिल्हा बँक निवडणुकीसाठी कुडाळच्या प्रांत वंदना खरमाळे यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्ती झाली असून निवडणूक कार्यक्रम राज्य सहकार प्राधिकरणकडून मंजूर होऊन येताच प्रांत जिल्हा बँकेचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करणार आहेत. त्यामुळे तब्बल सहा वेळा स्थगित झालेली जिल्हा बँकेचे निवडणूक बिगुल अखेर आता वाजणार आहे.

जिल्ह्यात आता निवडणुकीची धामधूम

जिल्ह्यात यापूर्वी कधीच नगरपालिका, ग्रामपंचायत, सहकारी संस्था व जिल्हा बँक यांच्या निवडणुका एकाचवेळी झाल्या नव्हत्या. मात्र, यावेळी त्या होत आहेत. ४ नगरपालिका, १३० ग्रामपंचायत पोटणीवडणुका, २१५ सहकारी विकास संस्था आणि जिल्हा बँक या संस्थांसाठी एकाचवेळी निवडणूक होत असल्याने जिल्ह्यात निवडणूक धामधूम मोठ्या प्रमाणात सुरू झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Alternative India : एलपीजीला नवा स्वस्त पर्याय! महागड्या सिलिंडरपासून सुटका, इथेनॉलवर बनणार स्वयंपाक; सरकारची योजना ठरणार गेमचेंजर

मुलाने लग्नाचा निर्णय सांगितल्यावर प्रसाद-मंजिरीने दिलेली अशी प्रतिक्रिया; "तो खूप इमोशनल झाला"

Mumbai Water Cut: मुंबईकरांसाठी मोठी खबरदारीची बातमी! पाणीपुरवठ्यात आठवडाभर कपात, कोणत्या परिसरात आणि कधी? जाणून घ्या...

प्रभुकुंज ते दुबईचे रेस्टॉरंट! आशा ताईंच्या निधनानंतर त्यांच्या अफाट मालमत्तेचा मालक कोण? त्यांच्या मृत्युपत्रानुसार...

Match Fixing: भारताने जिंकलेल्या T20 World Cup 2026 स्पर्धेत फिक्सिंग? न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यावरच संशय, ICC ने सुरू केलाय तपास

SCROLL FOR NEXT