कोकण

सहकारच राजकारण तापणार; जिल्हा बँकेची निवडणूक ऑक्टोबर महिन्यात?

विनोद दळवी

१३ सप्टेंबरपर्यंत आक्षेप नोंदवण्यासाठी मुदत देण्यात आली असून २२ ला यावर निर्णय दिला जाणार आहे.

ओरोस : सिंधुदुर्ग जिल्हा (sindhudurg district) मध्यवर्ती सहकारी बँकेच्या २०२१ ते २०२६ करीता व्यवस्थापकीय समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या प्रारूप मतदार यादी अंतिम करण्याचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. ३ सप्टेंबरला प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. (district bank election 2021) १३ सप्टेंबरपर्यंत आक्षेप नोंदवण्यासाठी मुदत देण्यात आली असून २२ ला यावर निर्णय दिला जाणार आहे. २७ सप्टेंबरला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. (konkan News)

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम ७३ कब अन्वये सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी बँक लिमिटेड सिंधुदुर्ग या बँकेच्या २०२१ ते २०२६ या कालावधीत संचालक मंडळ सदस्यांचे निवडणुक संदर्भात राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण महाराष्ट्र राज्य पुणे यांनी २ जानेवारी २०१५ च्या आदेशाने विभागिय सहनिबंधक सहकारी संस्था कोकण विभाग नवी मुंबई यांची जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.

कोकण विभागीय सहनिबंधक तथा सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी आप्पाराव घोलकर यांनी प्रारूप मतदार यादी कार्यक्रम जाहीर केला आहे. ३ सप्टेंबर रोजी जिल्हा बँकेची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. कोकण विभागीय सहनिबंधक कार्यालय, सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक प्रधान कार्यालय, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था कार्यालय व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व तालुका उपनिबंधक, सहाययक निबंधक आणि सहकारी अधिकारी श्रेणी १ कार्यालय येथे ही यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.

याबाबत आक्षेप नोंदवण्यासाठी ३ ते १३ सप्टेंबर हा कालावधी ठेवण्यात आला आहे. हा आक्षेप कोकण विभागीय सहनिबंधक सहकारी कार्यालयात नोंदवायचा आहे. २२ सप्टेंबरला या आक्षेपावर निर्णय देण्यात आला आहे. त्यानंतर याची अंतिम यादी २७ सप्टेंबर रोजी कोकण विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था कार्यालय, सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक प्रधान कार्यालय, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था कार्यालय व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व तालुका उपनिबंधक, सहाययक निबंधक आणि सहकारी अधिकारी श्रेणी १ कार्यालय येथे ही यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.

ऑक्टोबरमध्ये रंगणार निवडणूक

२३ सप्टेंबर रोजी अंतिम यादी प्रसिद्ध होणार असल्याने सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणूक ऑक्टोबर महिन्यात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सहकार राजकारण आता तापायला सुरुवात होणार असून ऑक्टोबरमध्ये रंगत येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Raut vs Sanjay Nirupam: 'संजय राऊतांमुळे महाराष्ट्रात अशांतता गुन्हा दाखल करून तुरुंगात टाका'; संजय निरुपम यांची मुंबई पोलिसांकडे मागणी

Patna: धक्कादायक घटना! ३० वर्षीय युतवतीवर सामूहिक अत्याचार... गुप्तांगात आढळला काडतूस व लाकडाचा तुकडा, अरोपी मोकाट

IND VS AFG 3RD ODI: हर्षित राणा IN, 2 खेळाडू OUT! भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल, प्रशिक्षकाने दिले अपडेट्स; रोहितचा ओपनिंग पार्टनर कोण?

Latest Marathi Live Updates: सीमा प्रश्नावरून महाराष्ट्र एकीकरण समितीला कर्नाटकात अडवले, ठिय्या आंदोलन

Hormuz Strait : होर्मुझ सामुद्रधुनीत जहाजांची प्रचंड रांग; इराणने कडक नियम जाहीर केले, ४८ तास आधी अर्ज अनिवार्य

SCROLL FOR NEXT