हापूसची पहिली पेटी मालवणातून रवाना sakal
कोकण

सिंधुदुर्ग : हापूसची पहिली पेटी मालवणातून रवाना

यंदा पुण्यात विक्री; पेटीला १८ हजारांचा दर

सकाळ वृत्तसेवा

मालवण, (सिंधुदुर्ग) : मुसळधार पावसात मोहोर आणि फळांच्या उत्तम व्यवस्थापनातून संरक्षण करीत मालवण कुंभारमाठ येथील आंबा बागायतदार उत्तम सूर्यकांत फोंडेकर यांनी या हंगामातील पहिली देवगड हापूसची पेटी पुण्याला पाठविली आहे. पाच-पाच डझनच्या दोन पेट्यांची त्यांनी थेट विक्री प्रतिपेटी १८ हजार रुपयांना केली आहे. पहिली पेटी पाठविण्याचा मान त्यानी तिसऱ्यांदा मिळविला आहे.

आंब्याचा हंगाम सुरू होण्यासाठी अजूनही तीन ते चार महिन्यांचा कालावधी आहे; परंतु असे असले तरी यावर्षीच्या हंगामातील पहिली पेटी मालवण कुंभारमाठ येथून पुण्याला पाठविण्यात आली. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी २० ते २५ दिवस अगोदरच पहिली पेटी बाजारपेठेत आली आहे.

जूनच्या अखेरीस आणि जुलैच्या पहिल्या आठवड्यात फोंडेकर यांच्या सहा ते सात झाडांना मोहोर आला होता. जुलैमध्ये जिल्ह्यात अतिवृष्टी होती. तरी देखील उत्तम व्यवस्थापनाच्या जोरावर त्यांनी मोहोर आणि फळांचे संरक्षण केले. गरजेनुसार विविध कीटकनाशक, बुरशीनाशकाच्या फवारण्या त्यांनी केल्या. ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यानंतर आंबा परिपक्व होण्यास सुरुवात झाली. आज सकाळी साडेनऊला सहा झाडांवरील फळाची काढणी करण्यात आली. हा आंबा दोन पेट्यांमध्ये बंद करून पुणे येथील ग्राहकाला पाठविण्यात आला.

जूनच्या अखेरीस आणि जुलैच्या पहिल्या आठवड्यात काही झाडांना मोहोर आला होता. या मोहोराचे संरक्षण करण्यात आले. परिपक्व झालेल्या आंब्याची आज काढणी करून त्याची थेट विक्री करण्यात आली.आंबा व्यवस्थापनात फळसंशोधन केंद्र वेंगुर्ले आणि कृषी विभाग मालवणच्या अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले.

- उत्तम फोंडेकर, आंबा बागायतदार, मालवण कुंभारमाठ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET UG Paper Leak: ज्याला मानलं जात होतं पेपरफुटीचा 'मुख्य सूत्रधार', त्यालाच CBI ची क्लीन चिट; चार्जशीटमध्ये नेमकं काय?

Education Ministry latest news : मोठी घडामोड! विनीत जोशींची उच्च शिक्षण विभागाच्या सचिवपदावरून हकालपट्टी

Latest Marathi News Live Update : 'तावडे हॉटेल' अतिक्रमणाची सुनावणी पुन्हा लांबणीवर; पुढील सुनावणी २७ ऑगस्टला होणार

Nagpur High Court: महिनाभरात सर्व प्रकरणांची उत्तरे देऊ; उच्च न्यायालयात नगरविकास विभागाची ग्वाही

Nagpur Farmers Protest: संतापलेल्या शेतकऱ्यांकडून रस्त्यावरच धान रोवणी ; ग्रामपंचायत, जिल्हा परिषदेच्या भोंगळ कारभाराचा नोंदवला निषेध

SCROLL FOR NEXT