Sindhudurg has the highest result of 96.57 percent in the state 
कोकण

मुलींचीच बाजी : राज्यात सिंधुदुर्गचा सर्वाधिक निकाल...

राजेश सरकारे

कणकवली (सिंधुदुर्ग) : बारावी परीक्षेत कोकण बोर्ड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याने सलग नवव्या वर्षी राज्यात अव्वल स्थान कायम राखले आहे. सिंधुदुर्गचा निकाल 96.57 टक्के एवढा सर्वाधिक लागला. कोकण विभागाचा निकाल 95.89 टक्के तर रत्नागिरीचा 95.52 टक्के  लागला आहे.

सिंधुदुर्गचा गतवर्षीचा निकाल 94.26 टक्के होता. या तुलनेत यंदा निकालात वाढ झाली आहे. यंदा देखील उत्तीर्णतेमध्ये जिल्ह्यातील मुलींनी यंदाही आघाडी घेतली आहे. मुलींची टक्केवारी 98.12 टक्के तर मुलांची 95.13 टक्के आहे. जिल्ह्यातील 30 कनिष्ठ महाविद्यालयांचा निकाल 100 टक्के लागला आहे.

सलग नवव्या वर्षी अव्वलस्थानी
 सिंधुदुर्ग जिल्ह्यात 91 महाविद्यालयांसाठी 23 केंद्रांवर परीक्षा घेण्यात आली. यात विज्ञान शाखेचा निकाल 99.53 टक्के, कला शाखा 89.70 टक्के, वाणिज्य शाखा 98.89 टक्के व व्यावसायिक विषयांचा निकाल 94.83 टक्के लागला.. यंदा लॉकडाऊन असल्याने विद्यार्थ्यांनी मोबाईल आणि संगणकाच्या माध्यमातून आपला निकाल पाहिला. यंदा कोरोना प्रादुर्भामुळे पेपर तपासणीस उशिर झाला. त्यामुळे मे ऐवजी जुलै पर्यंत विद्यार्थ्यांना तसेच पालकांना निकालाची वाट पाहावी लागली.

 गतवर्षी पेक्षा टक्केवारीत वाढ
 ऑनलाईन निकालानंतर उद्या पासून गुणांची पडताळणी आणि उत्तरपत्रिकांच्या छायाप्रत, पूर्नमुल्यांकन आणि स्थलांतर प्रमाणपत्रासाठी विभागीय मंडळाकडे ऑनलाईन अर्ज करता येणार आहेत. हे अर्ज मंडळाच्या http://verifacation.mh-hsc.ac.in या स्थळावरून विद्यार्थ्यांना स्वतः किंवा शाळा, महाविद्यालया मार्फत करता येईल. गुणपडताळणीसाठी 17 ते 27 जुलै पर्यंत, तर छायाप्रतीसाठी 17 जुलै ते 5 ऑगस्टपर्यंत अर्ज भरता येणार आहे. त्यासाठी ऑनलाईन शुल्क भरावे लागणार आहे. पुर्नमुल्यांकनासाठी उत्तरपत्रिकेची छायाप्रत अनिवार्य असून ही प्रत मिळाल्याच्या दिवसापासून कार्यालयीन कामाकजाच्या पाच दिवसांत विहित शुल्क भरून ऑनलाईन अर्ज करता येणार आहे.


सिंधुदुर्ग दृष्टिक्षेप
विद्यार्थी नोंदणी : 10556
प्रत्यक्ष बसले :10536
उत्तीर्ण : 10175
विशेष प्रावीण्य श्रेणी : 926
प्रथम श्रेणीत 4721
द्वितीय श्रेणीत 4318
पास श्रेणीत 210

उत्तीर्णता संख्या
मुले - 5 हजार 174
मुली - 5 हजार 1

टक्केवारी मुलींचीच बाजी
मुले - 95.13 टक्के
मुली - 98.12 टक्के

सिंधुदुर्ग शाखानिहाय निकाल :
सायन्स - 99.53 टक्के
आर्टस - 89.70 टक्के
कॉमर्स - 98.89 टक्के
व्यावसायिक अभ्यासक्रम - 94.83 टक्के
 

 तालुकानिहाय टक्केवारी

वैभववाडी 98.69 टक्के
दोडामार्ग 97.90 टक्के
कुडाळ 96.83 टक्के
कणकवली 96.88 टक्के
सावंतवाडी 96.74 टक्के
मालवण 96.36 टक्के
वेगुर्ले 96.01 टक्के
देवगड 94.67 टक्के

100 टक्के निकाल : 30 कनिष्ठ महाविद्यालये
 

संपादन - अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel Price: पेट्रोल-डिझेल महागणार नाही; भारत सरकारचा मोठा निर्णय, तेल कंपन्यांची नवी रणनीती काय?

Iran Attack: आखाती देशांवर इराणचे हल्ले; अमेरिका, इस्राईलकडून इराणच्या शिराझ शहरावर ड्रोनचा मारा, नेतान्याहू यांना मारण्याची शपथ!

Dhangar Reservation: धनगर आरक्षणासाठी आझाद मैदानावर उद्यापासून उपोषण; सकाळी दहापासून उपाेषण, आंदोलक मुंबईकडे रवाना!

बीड अल्पवयीन विवाहितेच्या अत्याचार प्रकरणाला वेगळं वळण, पोलीस पाटील अन् ग्रामसेवकावर गुन्हा दाखल होणार

Prakash Abitkar: ‘रेबीज’विरोधी लशींचा पुरेसा साठा: आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर; सरकारी, महापालिका रुग्णालयांमध्ये पुरवठा नियमित!

SCROLL FOR NEXT