sindhudurg post office work
sindhudurg post office work  
कोकण

लाॅकडाउनमध्ये पोस्टच ठरले आर्थिक आधार 

विनोद दळवी

ओरोस (सिंधुदुर्ग) - गेल्या मार्चपासून कोरोनामुळे सर्वांची आर्थिक परिस्थिती कोलमडली होती. अनेकांचे आर्थिक हाल झाले. रोजगार हिरावले गेले. आर्थिक स्त्रोत निर्माण कसा करावा हा प्रश्‍न सर्वांसमोर होता; मात्र कोरोना काळात जिल्हावासीयांना पोस्टाने मोठा आर्थिक आधार दिला. 25 मार्च ते डिसेंबर 2020 या लॉकडाऊन काळात तब्बल 26 हजार 913 नागरिकांना 7 कोटी 73 लाख 59 हजार 105 रुपये एवढी रक्कम घरपोच करीत कोरोना काळात आर्थिक साथ देण्याचे काम भारतीय डाक विभागाने सिंधुदुर्ग जिल्ह्यात केले. 

कोरोना काळात देश लॉकडाउन असताना पोस्ट खात्यामार्फत गरजू लोकांना "ऐप्स' प्रणालीद्वारे बॅंकेतील रक्कम सहज मिळविणे शक्‍य झाले आहे. लॉकडाउनमुळे घरात अडकून पडलेल्या लोकांना पैशाची गरज होती; मात्र बॅंकेत जाणे सहज शक्‍य नव्हते. अशा लोकांच्या सोयीसाठी घरपोच बॅंकिंग सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पोस्ट खात्याची इंडिया पोस्ट पेमेंट बॅंक पुढे सरसावली होती. या प्रणालीद्वारे आता घरबसल्या कुठल्याही बॅंक खात्यातून पोस्टमन मार्फत पैसे काढण्याची सुविधा पोस्ट खात्यामार्फत सुरू करून दिली आहे. या व्यवहारासाठी ग्राहकांना केवळ बॅंक खात्याशी संलग्न असलेल्या आधार नंबरची आवश्‍यकता आहे. कुठल्याही कागदपत्रांशिवाय व केवळ अंगठ्याच्या ठशाद्वारे हे व्यवहार करण्यास पोस्ट विभागाने परवानगी दिली आहे. 

पैशांव्यतिरिक्त पोस्ट खात्याने आंबा बागायतदार व औषधे सुद्धा परजिल्ह्यात पोच केली आहेत. लॉकडाउनच्या काळात ऐन आंबा हंगामात हापूस आंबा मार्केटमध्ये पाठवण्याची व्यवस्था नव्हती. जिल्ह्याबाहेरील वाहतूक व्यवस्था बंद होती. या काळात पोस्टाने 51 टन आंबा व नारळ मुंबईकडे वाहतूक केला. हे साहित्य घरपोच केले. त्यात 5 डझनचे 2 हजार 384 बॉक्‍स व 88 नारळ गोण्यांचा समावेश होता. या दरम्यान मेडिसिन व डायग्नोस्टिकची व्यवस्था घरपोच केली होती. 

416 पोस्टमनने बजावली सेवा 
कोरोना सारख्या जागतिक महामारी काळात माणसे एकत्र येत नव्हती. अनोळखी व्यक्ती दिसली, की लांब पळत होती. जवळ जायचे झालेच तर सोशल डिस्टन्स राखला जात होता. अशा स्थितीत कोरोनाची दहशत झुगारुन जिल्ह्यातील पोस्टमननी माणुसकी दाखवत ही सेवा बजावली. जिल्ह्यातील तब्बल 416 पोस्टमननी ही सेवा दिली आहे. 

1094 शिष्यवृत्तीधारकांची खाती 
पैशांव्यतिरिक्त पोस्ट खात्याने आंबा बागायतदार व औषधे सुद्धा परजिल्ह्यात पोच केली आहेत. त्याच बरोबर जिल्ह्यातील शिष्यवृत्ती धारक विद्यार्थ्यांची खाती सुद्धा पोस्ट विभागाने उघडली आहेत. आहेत. तब्बल 1 हजार 94 खाती उघडल्याने शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांना आर्थिक आधार मिळाला. 

इंडिया पोस्ट पेमेंट बॅंकेच्या माध्यमातून जनतेला चांगल्या सेवा उपलब्ध करून दिल्या आहेत. मोबाईल बॅंकिंग सुविधाही उपलब्ध करून दिली आहे. डिजिटल बॅंकिंग निःशुल्क आहे. दर मंगळवारी एप्सचे जास्त व्यवहार करण्याची विशेष मोहीम सुरू आहे. 
- के. एन. बावनकुळे, अधीक्षक डाकघर, सिंधुदुर्ग. 

संपादन - राहुल पाटील

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RTE Admission : आरटीईनुसार २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशाचे अर्ज भरण्याची प्रक्रिया तात्पुरती बंद

SRH vs LSG Live Score : संथ खेळपट्टीवर लखनौ सुस्तावली; अर्धशतकासाठी उजाडलं 9 वं षटक

Sakal Vidya : स्पर्धा परीक्षा व करिअर अभ्यासक्रमाबाबत चिंचवडमध्ये येत्या रविवारी तज्ज्ञांचे मार्गदर्शन

BG Kolse Patil : ‘पंतप्रधानांना ३०० कोटींचा हिशोब द्यावा लागेल’; माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांची टीका

Country Cricket : भांडण बीसीसीआय अन् पीसीबीचं; तिकडं इंग्लंड क्रिकेट बोर्डाचे ह्रदयाचे ठोके का वाढले?

SCROLL FOR NEXT