Sindhudurg receives first installment of compensation: Samant 
कोकण

भरपाईचा पहिला हप्ता सिंधुदुर्गला प्राप्त ः सामंत

विनोद दळवी

ओरोस (सिंधुदुर्ग) - अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात 23 हजार हेक्‍टर शेतीचे नुकसान झाले आहे. या नुकसानभरपाईसाठीचे पहिल्या टप्प्यातील साडेपाच कोटी रुपये जिल्ह्याला प्राप्त झाले असल्याची माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली. मालवण तालुक्‍यातील तळगाव तलाठी सजाचे उद्‌घाटन आज श्री. सामंत यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. 

यावेळी खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, प्रांताधिकारी वंदना खरमाळे, तहसीलदार आमोल पाठक, निवासी तहसीलदार आनंद मालनकर, सरपंच अनघा वेंगुर्लेकर, उपसरपंच अनंत चव्हाण, जिल्हा परिषद सदस्य नगेंद्र परब, संग्राम प्रभुगावकर, संजय पडते, मुंबईचे माजी महापौर दत्ताजी दळवी आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. झाराप येथे वैद्यकीय

महाविद्यालयासाठी शिक्षण विभगाची जागा देण्यास 48 तासांत मान्यता दिल्याचे सांगून पालकमंत्री उदय सामंत म्हणले, ""शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळविता यावे, यासाठी जिल्ह्यात जानेवारीत स्पर्धा परीक्षा केंद्र सुरू करण्यात येणार आहे. सर्वांशी संवाद साधता यावा व नागरिकांचे प्रश्‍न तातडीने मार्गी लावता यावेत यासाठी जनता दरबार सुरू केला आहे. हे जनता दरबार तालुका स्तरावरही घेण्यात येणार आहेत. तळ्गाव ग्रामपंचायतीच्या इमारतीचे काम तातडीने पूर्ण करण्यात येईल. या तलाठी सजाचे उद्‌घाटन करताना मला मनापासून आनंद होत आहे. दर सोमवारी आणि गुरुवारी तलाठी या कार्यालयात थांबून लोकांची कामे करतील. तलाठी यानी लोकांचा विश्‍वास संपादन करून चांगले काम करावे.'' 

आदर्श खासदार कसे आसवेत, हे पाहण्यासाठी रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात यावे, असे सांगून पालकमंत्री म्हणाले, ""या जिल्ह्याला बॅरिस्टर नाथ पै, मधू दंडवते यांचा वारसा लाभला आहे. तो वारसा खासदार विनायक राऊत चालवत आहेत. आमदार वैभव नाईक यांचे कामही आदर्श आहे. कुडाळ-मालवण मतदारसंघात सर्वात जास्त तलाठी सजा आहेत. या मतदारसंघात सर्वात जास्त निधी आणण्याचे कामही आमदार श्री. नाईक यांनी केले आहे.''  तळगावच्या सरपंच अनघा वेंगुर्लेकर यांनी मान्यवरांचे स्वागत केले. यावेळी खासदार राऊत, आमदार नाईक यांचीही भाषणे झाली. 

संपादन - राहुल पाटील

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

AAP BMC Election : ‘आम आदमी पार्टी’चा मुंबई महापालिकेसाठी स्वबळाचाच नारा ; सर्व जागांवर उभा करणार उमेदवार!

Maharashtrta News : राज्याचा साखर उतारा वाढला; दीड महिन्यात ३० लाख टन साखरनिर्मिती!

Liver, Kidney, Gut Detox: फक्त १४ दिवसांत करा सगळं शरीर स्वच्छ! आयुर्वेदिक डॉक्टरांनी सांगितलं सर्वात सोपं डिटॉक्स ड्रिंक

Mumbai Local: प्रवाशांना दिलासा! ठाणे–मुलुंड दरम्यान नवीन उपनगरीय रेल्वे स्थानक पूर्ण होणार; रेल्वेमंत्र्यांचे आश्वासन

U19 Asia Cup: पुन्हा भारत - पाकिस्तान फायनल! कधी आणि कुठे पाहाणार लाईव्ह सामना? जाणून घ्या एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT