In Sindhudurg, there is no new corona positive in 48 hours 
कोकण

दिलासा : सिंधुदुर्गात 48 तासात नवा कोरोनाबाधित नाही

सकाळ वृत्तसेवा

ओरोस : सिंधुदुर्गात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण मिळण्याचे प्रमाण गेले दोन दिवस खाली आले आहे. प्रत्येक दिवशी किमान एकतरी नवीन कोरोना बाधित रुग्ण आढळत होता. त्यामुळे जिल्ह्यातील रुग्ण संख्या झपाट्याने वाढत होती; मात्र गुरूवार (ता. 11) रात्रीनंतर शुक्रवारी दिवसभरात व शनिवारी सायंकाळपर्यंत जिल्ह्यात नव्याने एकही कोरोना बाधित आढळलेला नाही. या कालावधीत 30 नमूने अहवाल प्राप्त झाले असतानाही एकही रुग्ण न मिळाल्याने प्रशासनाने सुटकेचा निश्‍वास सोडला आहे. 

शनिवारी नव्याने 12 रुग्ण कोरोनावर मात करीत घरी परतले आहेत. दोन दिवसात एकही नवीन रुग्ण न मिळाल्याने बाधित रुग्णांची संख्या 149 वर स्थिरावली आहे. आतापर्यंत 68 रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने सक्रिय रुग्णांची संख्या 77 एवढी आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय चाकूरकर यांनी दिली. दरम्यान, प्रलंबित 119 अहवाल पैकी 30 अहवाल शुक्रवारी आले; मात्र त्यात एकही रुग्ण पॉझिटिव्ह आढळलेला नाही. हा जिल्ह्यासाठी मोठा दिलासा मानावा लागेल. दरम्यान, शनिवारी नव्याने 60 कोरोना तपासणी नमूने कोल्हापूर येथे पाठविण्यात आले. त्यामुळे प्रलंबित अहवालांची संख्या 149 झाली आहे. 

 हे पण वाचा -मद्यविक्रीला बसला फटका : दीड कोटीची झाली घट.....

आणखी एक ट्रुनॅट मशिन दाखल

जिल्ह्यात कोवीड - 19 च्या तपासणीसाठी कार्यान्वित ट्रुनॅट मशीनद्वारे आतापर्यंत 190 व्यक्तींची तपासणी करण्यात आली आहे. या मशीनद्वारे नऊ जूनपासून जिल्ह्यात कोरोनाची तपासणी करण्यात येत आहे. सध्या जिल्ह्यात दोन ट्रुनॅट मशीन आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातून एक ट्रुनॅट मशीन प्राप्त झाल्यामुळे तपासणीचा वेग वाढला आहे. तासाला दोन स्वॅबची एका मशीनद्वारे तपासणी करण्यात येत आहे. अजुन एक मशीन आल्याने आता तासाला चार स्वॅबची तपासणी होत आहे. तपासणीमध्ये निगेटिव्ह आलेला रिपोर्ट कन्फॉम असतो. पॉझिटिव्ह आलेला अहवाल पुन्हा खात्री करण्यासाठी कोल्हापूर येथे पाठविण्यात येतो. तेथील अहवालही पॉझिटिव्ह आला तर ती व्यक्ती कोरोनाबाधित असल्याचे जाहीर करण्यात येते. 

चाकरमान्यांचे येणे सुरूच 
आतापर्यंत पाठविलेल्या दोन हजार 957 कोरोना तपासणी अहवालातील दोन हजार 794 अहवाल आले. केवळ 149 अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यातील 68 व्यक्ती कोरोनामुक्त होवून घरी परतल्या आहेत. तीन व्यक्तींचे निधन झाले असून एक मुंबई येथे उपचारासाठी गेले आहेत. परिणामी जिल्ह्यातील सक्रिय रुग्ण 77 राहिले आहेत. कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढत असल्याचा दिलासा मिळत असलातरी मुंबई, पुणे सारख्या हॉटस्पॉट भागातून दाखल होणाऱ्या नागरिकांची संख्या कमी होताना दिसत नाही. जिल्ह्यात 12 जूनला एक हजार 999 नागरिक नव्याने दाखल झाले. दोन मेपासून आतापर्यंत 90 हजार 768 नागरिक जिल्ह्यात आले आहेत. सध्या आयसोलेशनमध्ये 112 रुग्ण उपचार घेत असून कालच्या संख्येत नऊने घट झाली आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पंढरपूर तालुक्यात खळबळ! 'दहा लाखांची खंडणी घेताना कामगार नेता रंगेहाथ जाळ्‍यात'; बदनामी थांबविण्यासाठी पैशाची मागणी

India US Trade: करार अंतिम करण्यासाठी प्रयत्न; भारत-अमेरिका व्यापार कराराबाबत सचिव राजेश अग्रवाल यांची माहिती

PMPML Bus : ‘पीएमपी’ उत्पन्नात दरवाढीनंतर वाढ; उत्पन्न अडीच कोटींच्या उंबरठ्यावर

बीडमध्ये चाललंय काय? जमिनीच्या वादातून माजी सरपंचाची दहशत; रक्तबंबाळ होईपर्यंत तरुणाला बेदम मारहाण, पोलिसांवर राजकीय दबाव?

Latest Marathi News Updates : नाशिक जिल्हा परिषद लैंगिक छळ प्रकरणाची चौकशी पूर्ण, राज्य महिला आयोगाला पाठवणार अहवाल

SCROLL FOR NEXT