Sindhudurg School News
Sindhudurg School News sakal
कोकण

सिंधुदुर्ग : तोंडवळी-खालची शाळा पुन्हा गजबजली

सकाळ वृत्तसेवा

आचरा : शिक्षक मिळवण्यासाठी तोंडवळी-खालची ग्रामस्थांनी १७ जूनपासून मुलांना शाळेत न पाठविण्याचा घेतलेला निर्णय शिक्षण विभागाने शाळेला कामगिरी शिक्षक उपलब्ध करून दिल्याने तात्पुरता स्थगित करण्यात आला. मुलांना शाळेत पाठविल्याने तोंडवळी-खालची शाळा पुन्हा गजबजली; मात्र बदली प्रक्रियेत कायम स्वरूपी शिक्षक न मिळाल्यास पुन्हा मुलांना शाळेत न पाठविण्याचा इशारा लेखी निवेदनाद्वारे येथील पालकांनी शिक्षण विभागास दिला आहे.

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, तोंडवळी-खालची या शाळेला आवश्यक शिक्षक तातडीने न मिळाल्यास मुलांना शाळेत न पाठविण्याचा निर्णय तोंडवळी-तळाशिल ग्रामस्थांनी १७ जूनपासून घेतला होता. दरम्यान, गटशिक्षणाधिकारी कार्यालय, मालवण यांच्याकडून शाळेला कामगिरी शिक्षक उपलब्ध करून दिल्याचे शाळेला पत्र प्राप्त झाल्यावर येथील पालकांनी आपल्या मुलांना पुन्हा शाळेत पाठविण्याचा निर्णय घेतला; मात्र आता सुरू असलेल्या बदली प्रक्रियेत शाळेला कायमस्वरूपी शिक्षक मिळाला नाही तर पुन्हा मुलांना शाळेत पाठविणार नसल्याचा लेखी इशारा शाळेच्या मुख्याध्यापिका प्रज्ञा खडपकर यांना दिला आहे.

यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष जितेंद्र चोडणेकर, नंदकुमार कोचरेकर, स्नेहा कांदळगावकर, जान्हवी पराडकर, पल्लवी कोचरेकर, पुंडलिक मालंडकर, दिक्षा कोचरेकर, पुंडलिक मालंडकर, गुरुनाथ धुरी, सुरेंद्र मालंडकर आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Hatkanangale: निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या राजू शेट्टींना चित्रपटात काम करावसं का वाटलं? जाणून घ्या

Gulabrao Patil: भाजपवाल्यांनी काम केलं नाही तर आम्ही... गुलाबराव पाटलांच्या वक्तव्यामुळे BJP कार्यकर्त्यांमधे संभ्रम

Bajrang Punia Suspended : बजरंग पुनियाचे स्वप्न भंगले... डोपिंग टेस्ट न केल्याने निलंबित

Summer Fashion Tips : उन्हाळ्यात कूल आणि स्टायलिश दिसायचंय? मग, अशा प्रकारच्या कलर पॅटर्न्सची करा निवड

Raju Shetti in Hatkanangale: 'राजकारणात यायचं म्हणजे गेंड्याची कातडी लागते'; राजकारण की चळवळ, राजू शेट्टींची कशाला पसंती?

SCROLL FOR NEXT