राष्ट्रवादी काँग्रेसकडून खड्ड्यात मेणबत्या लावून अनोख्या प्रकारचे आंदोलन  sakal
कोकण

सिंधुदुर्ग : राष्ट्रवादी काँग्रेसकडून खड्ड्यात मेणबत्या लावून अनोखे आंदोलन

शिरोडा नाका परिसरात खड्डे बुजवण्याचे सुरू असलेले काम रोखत प्रथम रहदारीच्या ठिकाणचे रस्ते सुशिस्थित करा, अशी मागणी करण्यात आली.

सकाळ वृत्तसेवा

सावंतवाडी (सिंधुदुर्ग ) : ऐन दिवाळीच्या सणात खासगी केबलसाठी ठेकेदाराने रस्त्यात खोदाई करून अपघाताला आमंत्रण देण्याचे काम केले आहे. याकडे पालिका सत्ताधाऱ्यांचा पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याने याकडे सत्ताधाऱ्यांचे लक्ष वेधण्यासाठी सालईवाडा येथे खड्ड्यात मेणबत्या लावून अनोख्या प्रकारचे आंदोलन राष्ट्रवादी काँग्रेसकडून आज करण्यात आले. शिरोडा नाका परिसरात खड्डे बुजवण्याचे सुरू असलेले काम रोखत प्रथम रहदारीच्या ठिकाणचे रस्ते सुशिस्थित करा, अशी मागणी करण्यात आली.

हे आंदोलन राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. यावेळी हिदायतुल्ला खान, इफ्तिकार राजगुरू, युवती जिल्हाध्यक्ष सावली पाटकर, संतोष जोईल, देवा टेमकर, बावतीस फर्नांडिस, असलम खतीब, दर्शना बाबर-देसाई, नझीर शेख, जहिरा ख्वाजा आदी उपस्थित होते.

यावेळी दळवी म्हणाले, "दिवाळीच्या सणातच जिओ लाईन टाकण्यासाठी शहरात सुस्थितीत असलेल्या रस्त्यांची खोदाई करण्यात आली. हे चर भरत असताना योग्य भराव न घातल्याने रस्त्यात खड्डे पडले असून हे खड्डे अपघाताला आमंत्रण देत आहेत. अनेक गाड्या या खड्यात अडकून अपघात झाले असून सर्वसमान्यांच्या गाड्यांचे नुकसान झाले आहे; मात्र याकडे लक्ष वेधूनही वारंवार पालिका प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे." हे पालिका सत्ताधारी मोठा अनर्थ होण्याची वाट बघत आहेत काय? सत्ताधारी लोकांच्या भावनेशी खेळत असून राष्ट्रवादीकडून निषेध करण्यात आला तर सत्ताधारी आपल्याच मस्तीत असून ही मस्ती जीरावण्याचे काम नागरिकांनी योग्य वेळी करावे, असे आवाहनही दळवी यांनी केले. यानंतर शिरोडा नाका परिसरात खचलेला भराव दगड भरून सुस्थितीत करण्याचे सुरू असलेले काम रोखून प्रथम ज्या भागात जास्त रहदारी आहे, त्या भागातील काम प्रथम हाती घ्या, अशी मागणी करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Census: महाराष्ट्रात जनगणना कधी सुरू होणार? हा कार्यक्रम किती काळ चालणार? तारखा आल्या समोर...

Video : स्वानंदी समरच्या प्रेमकथेला सुरुवात ! समरला मिळालं रोमँटिक सरप्राईज; प्रोमो पाहून प्रेक्षक खुश

LPG Cylinder: सिलेंडरसाठी वाट पाहणं संपलं! इंडेनचा ‘छोटू’ LPG सिलेंडर बाजारात; किराणा दुकानातही सहज मिळणार

माईक हिसकावला आणि स्टेजवरुन हकललं, प्रसिद्ध कॉमेडीयन सुनील पालचा भर कार्यक्रमात अपमान, Viral Video

Central Railway: मध्य रेल्वेवर गोंधळाची परिस्थिती, रुळावर पडून प्रवाशाचा मृत्यू, लोकल सेवा खोळंबली

SCROLL FOR NEXT