सिंधुदुर्गची रिक्त पदे भरणार : कामगार आयुक्तांची ग्वाही sakal
कोकण

सिंधुदुर्गची रिक्त पदे भरणार : कामगार आयुक्तांची ग्वाही

खासदार राऊंत यांच्या उपस्थितीत मुंबईत विविध प्रश्नांवर चर्चा

सकाळ वृत्तसेवा

कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जी पदे रिक्त आहेत ती लवकरात लवकर भरू, अशी ग्वाही राज्याचे कामगार आयुक्त सुरेश जाधव यांनी स्वयंप्रेरीत इमारत व इतर बांधकाम मजूर संस्था, सिंधुदुर्गच्या शिष्टमंडळाला दिली. ऑनलाईन कंपनीचा सॉफ्टवेअर योग्यरितीने काम करत नसल्याबाबतही लक्ष वेधण्यात आले.

लोकसभा शिवसेना गटनेते खासदार विनायक राऊत व कामगार आयुक्त जाधव व त्यांचे सचिव श्रीरंगम यांच्या उपस्थितीत बांधकाम कामगारांच्या विविध प्रश्नांसाठी महत्त्वाची बैठक कामगार आयुक्त मुंबई यांच्या दालनात झाली. या चर्चेमध्ये कामगारांच्या विविध योजनेविषयी चर्चा करण्यात आली. ज्या कामगारांचे २०१८ मध्ये कामगार प्रशिक्षण झालेले आहे व त्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा झाले नाहीत, अशा कामगारांनी आपले डॉक्युमेंट परत द्यावयाचे आहेत. प्रशिक्षण सर्टिफिकेट झेरॉक्स, कामगारांचे आधारकार्ड, बँक पासबुकची २०१८ पासून ते आतापर्यंतची नोंद, पुस्तक क्रमांक ३, ७ ही कागदपत्रे ऑफिसमध्ये जमा करावयाची आहेत तसेच सध्या कार्यालयामधील सबइन्स्पेकटरची तीन पदे रिक्त आहेत. त्याबाबत चर्चा करण्यात यावी, असे यावेळी सांगण्यात आले.

सुजित जाधव हे वारंवार बांधकाम कामगारांना योग्य तो न्याय मिळवून देण्यासाठी मदत करत असतात, असे स्वयंप्रेरीत इमारत व इतर बांधकाम मजूर संस्था-सिंधुदुर्गचे सचिव अशोक बावलेकर यांनी सांगितले. बैठकीला श्रीमती लोखंडे तसेच स्वयंप्रेरीत इमारत व इतर बांधकाम मजुर संस्थेचे पदाधिकारी अध्यक्ष संतोष झारापकर, सचिव अशोक बावलेकर, उपाध्यक्ष काशिराम वाईरकर व सल्लागार प्रकाश चव्हाण उपस्थित होते.

सॉफ्टवेअर सुरळीत करण्याची ग्वाही

आयुक्त जाधव म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जी पदे रिक्त आहेत, ती तत्काळ भरुन देऊ. दरम्यान, कंपनीचे सॉफ्टवेअर योग्यरितीने काम करत नसल्याने त्याबाबत सचिव श्रीरंगम व कंपनीचे प्रतिक यांच्या सोबत चर्चा करण्यात आली. त्यावेळी सचिव श्रीरंगम यांनी सॉफ्टवेअरचे काम सुरळीत करण्याची ग्वाही दिली. उन्नती मंडळ सिंधुदुर्गचे जिल्ह्याध्यक्ष सुजित जाधव यांच्या मार्गदर्शनामुळे ही संयुक्त मिटिंग झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Kolhapur visit cancelled : अमित शहांचा कोल्हापूर दौरा रद्द; प्रकृती अस्वस्थ असल्याने हुबळीतून दिल्लीकडे रवाना

Asian Games 2026: श्रेयस अय्यरच्या संघाला जपानला जाण्यापूर्वी धक्का; BCCI, IOA ची पळापळ, नेमकं काय घडलं?

धावती लोकल पकडायला गेला, अचानक तोल जाऊन ट्रेनखाली येणार इतक्यात...; RPF जवानांनी तरुणाला दिले जीवनदान, Video Viral

Latest Marathi News Update : गोकुळ निवडणुकीमध्ये भाजप सर्व 25 जागांवर उमेदवारी अर्ज भरणार

Western Ghats Biodiversity : सह्याद्रीच्या कुशीत दडलाय अमूल्य खजिना! आजरा परिसरात सापडल्या शेकडो दुर्मीळ औषधी वनस्पती; टाटा संस्थेकडून सर्वेक्षण

SCROLL FOR NEXT