Sindhudurg ZP Adarsh Gramsevak Award Announced  
कोकण

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदचे आदर्श ग्रामसेवक पुरस्कार जाहीर 

सकाळवृत्तसेवा

सिंधुदुर्गनगरी - जिल्हा परिषद प्रशासनाच्यावतीने दरवर्षी देण्यात येणारे आदर्श ग्रामसेवक पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. 2018-19 मध्ये केलेल्या कामांचे मूल्यांकन करून या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. आज त्यांची नावे जिल्हा परिषद अध्यक्षा समिधा नाईक यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केली. 

आदर्श ग्रामसवक पुरस्कार जाहीर करण्यासंदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत जिल्हा परिषद अध्यक्ष नाईक बोलत होत्या. यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर, शिक्षण व आरोग्य समिती सभापती सावी लोके, महिला व बाल विकास समिति सभापती माधुरी बांदेकर, ग्रापंचायतच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी दिपाली पाटील आदी उपस्थित होते. 

ग्रामीण भागात शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी यशस्वीपणे करून ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनतेचे रहाणीमान उंचावल्यास मदत करणाऱ्या आणि अडचणी सोडविण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करणाऱ्या ग्रामसेवकांना दरवर्षी आदर्श ग्रामसेवक पुरस्कार दिले जातात. त्यानुसार जिल्हा परिषद प्रशासनाच्यावतीने 2018-19 या आर्थिक वर्षासाठीच्या आदर्श ग्रामसेवक पुरस्कारासाठी जिल्ह्यातून प्रस्ताव मागविण्यात आले होते. यासाठी जिल्ह्यातून ग्रामसेवकांचे प्रस्ताव जिल्हा परिषद प्रशासनाकडे प्राप्त झाले होते.

एका गटातून एक याप्रमाणे आठ तालुक्‍यातून प्रत्येकी एकप्रमाणे आठ प्रस्तावांचे गुणांक करण्यात आले. त्यानुसार सर्वात जास्त गुण प्राप्त करणाऱ्या ग्रामसेवकांची निवड समितीने आदर्श ग्रामसेवक पुरस्कारासाठी केली असल्याची माहिती जिल्हा परिषद अध्यक्षा नाईक यांनी दिली. 

यात दोडामार्ग तालुक्‍यातील लक्ष्मण पवार (ग्रामसेवक विर्डी), देवगड-शिवराज राठोड (ग्रामसेवक बापार्डे), कणकवली-वर्षा जाधव (ग्रामसेवक करंजे), मालवण-अशोक पाटील (ग्रामसेवक चौके), कुडाळ-अनंत गावकर (ग्रामविकास अधिकारी), वेंगुर्ला-मंगेश नाईक (ग्रामसेवक भोगवे/चिपी), वैभववाडी-उमेश राठोड (ग्रामसेवक मांगवली-एडगाव) तर सावंतवाडी बापूसाहेब फुंदे (ग्रामसेवक तळवणे) या ग्रामसेवकांना आदर्श ग्रामसेवक पुरस्कार जाहीर झाले आहेत. लवकरच एका कार्यक्रमात त्यांना सन्मान पूर्वक या पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार असल्याचेही जिल्हा परिषद अध्यक्षा नाईक यांनी स्पष्ट केले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP removes spokesperson Vijeta Dahiya : कॉकरोच जनता पार्टीत फूट? प्रवक्ता विजेता दहियांचे संस्थापक अभिजीत दिपकेंवर गंभीर आरोप, 'मलाच बळीचा बकरा बनवलं'

Kidney Donation Case : बॉसला किडनी दिली तरीही कंपनीने नोकरीवरुन काढले, महिलेला माणुसकी जपणे पडले महागात; नेमकं काय घडलं?

Latest Marathi Update : उद्धव ठाकरेंची मोठी घोषणा! शिवाजी पार्कवरून मोर्चा काढणार

रवी शास्त्रींनी निवडला भारत-इंग्लंडचा All Time XI संघ; धोनी कर्णधार, तर गांगुलीला मात्र...

Anganwadi Nutrition: अंगणवाडीत नोव्हेंबरपासून मिळणार ‘व्हेज पुलाव’; कुपोषणाविरुद्ध पाऊल, पोषण आहार झाला अधिक रुचकर

SCROLL FOR NEXT