sindudurg Traditional instrument khalu baja In dubai kokan marathi news 
कोकण

कोकणातील खालू बाजा घुमला दुबईत ...

सकाळ वृत्तसेवा

 चिपळूण (रत्नागिरी) : शहरालगतच्या खेर्डी  येथील खालूचा बाजा प्रसिद्ध आहे. सातासमुद्रापार असलेल्या दुबईत त्यांचा आवाज घुमला आहे. दुबईत भरवण्यात येणाऱ्या कोकण मेळाव्यात खेर्डीतील खालू बाजाला खास निमंत्रित केले होते. खालू बाजा वाजविण्यात तरबेज असलेले खेर्डीतील इम्तियाज चौगुले व सहकाऱ्यांनी दुबईवारी करीत रसिकांना आपल्या कलेने मंत्रमुग्ध केले . 

दुबईत अस्सल कोकणी पदार्थांची मेजवाणी
कोकणातील लोककला व खाद्य पदार्थाना बाजारपेठे मिळावी. यासाठी दुबईत दरवर्षी कोकण मेळाव्याचे आयोजन केले जाते. दुबईत असलेले भारतीय विशेष करून कोकणी या मेळाव्यास हजेरी लावतात. विविध प्रकारचे खाद्य पदार्थ, अस्सल कोकणी पदार्थांची या महोत्सवात मेजवानी असते. त्याचबराबेर सांस्कृतिक कार्यक्रमांचाही रेलचेल असते. या महोत्सवात चिपळूण शहरालगतच्या खेर्डी येथील खालू बाजा आणि लेझीम हा वाद्य-नृत्य प्रकार रंगत आणली. गेल्या तिन वर्षापासून त्यांच्या या वाद्याला दुबईत खास निमंत्रण असते.

इम्तियाजने आणला  महाराष्ट्रात खालूचा बाज

इम्तियाज चौगुले यांनी संपुर्ण महाराष्ट्रात खालूचा बाजामध्ये नाव कमावले आहे. राज्यातील विविध भागात हिंदू-मुस्लिमांच्या लग्न सोहळा, तसेच राजकीय पुढाऱ्यांच्या प्रचार सभा, मेळावे व अन्य शुभकार्यात खेर्डीतील खालू बाजाला बोलावले जाते. सनईचे स्वर, ढोल, व टिमकी वाजवून उपस्थितांना मंत्रमुग्ध करण्यात येते. या खालू बाजाच्या तालावर लेझीम खेळणे सर्वांचेच आकर्षण असते. त्यामुळे या खालू बाजास सलग तिसऱ्यांदा दुबईत निमंत्रण मिळाले. या संचामध्ये यासीन गफर चौगुले, मयनुद्दीन चौगुले, आजित चौगुले, हे सनई वादक कलाकार आहेत. 

दुबईत ​खालू बाजाला खास निमंत्रण

ढोल-ताशा, बॅंजो व डिजेच्या कर्कश आवाजाने कानावर मोठा ताण पडतो. मात्र सनई हे सुमधूर वाद्य ऐकायलाही बरे वाटते. त्याचा नाद, लय वेगळा असतो. वाद्याच्या तालावर पाय आपोआप थिरकतात. खालू बाजाला खास निमंत्रण मिळते.
यासीन चौगुले, सनईवादक खेर्डी, ता. चिपळूण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Andhra Pradesh Kurnool Bus Fire: आंध्र प्रदेशमध्ये धावत्या बसने अचानक कसा घेतला पेट? पहाटे ३ च्या सुमारास नेमकं काय घडलं? वाचा...

राजकीय हाराकिरी

भाऊबीजेच्या दिवशी दुर्दैवी घटना! मुलाच्या मृत्यूचं दुःख सहन न झाल्याने आईला हृदयविकाराचा झटका; बहिणीनं भावाचं औक्षण करत दिला निरोप

Prakash Mahajan: मुंडे कुटुंबाचा वारस जाहीर करण्याचा अधिकार भुजबळांना नाही : प्रकाश महाजन

Stock Market Opening: शेअर बाजाराची लाल रंगात सुरुवात; सेन्सेक्स-निफ्टी घसरले, कोणते शेअर्स वाढले?

SCROLL FOR NEXT