Hetawane Dam sakal
कोकण

Raigad Rain update : हेटवणे धरणातून विसर्ग; सहा दरवाजे उघडले

हेटवणे धरण ९० टक्‍के भरले; शहापाडा धरणही ओसंडून वाहत आहे.

सकाळ डिजिटल टीम

पेण - तालुक्यात पावसाने थैमान घातले अनेक घरांसह भातशेती, दुकानांमध्ये पाणी शिरले आहे. हेटवणे धरण ९० टक्‍के भरले आहे. धरणाचे सहा दरवाजे दोन फुटांवर उघडण्यात आले आहेत. शहापाडा धरणही ओसंडून वाहत आहे.

कळवे येथील सागर पाटील यांचे घर गुरुवारी सकाळी कोसळले. त्यांच्या अर्पित कला केंद्रातील मातीच्या दोनशेहून अधिक तर पीओपीच्या दीडशेहून अधिक गणेशमूर्तींचे नुकसान झाले आहे. याबाबत माहिती मिळताच पेण तहसीलदार स्वप्नाली डोईफोडे यांनी त्वरित तलाठी, सर्कल यांना जागेवर पाठवून पंचनामे करण्याचे आदेश दिले.

पावसामुळे घरासह गणेशमूर्तींचे नुकसान झाल्‍याने पाटील हवालदिल झाले आहेत. पावसामुळे हेटवणे धरणाचे सहा दरवाजे उघडण्यात आले आहे. त्यामुळे खाडी किनारी असणाऱ्या नागरिकांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.

पावसाचा जोर वाढल्‍याने अंतोरे येथील खाडी किनारी असणाऱ्या नागरीकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे. अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचल्याने नागरिकांची तसेच वाहनचालकांची मार्ग काढताना कसरत करावी लागते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर ! 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट, जाणून घ्या आज तुमच्या भागात कसे असेल हवामान?

ढिंग टांग : ‘हम्म्मऽऽ’...चा हुंकार!

मानसवेध : तमसो मा ज्योतिर्गमय

विशेष : कृत्रिम बुद्धिमत्ता आणि भविष्यातील निर्णय

Poha-Rava-Curd Pancake: पोहे नेहमीच बनवता? एकदा करून पाहा पोहे-रवा दही पॅनकेक; चवीला कुरकुरीत, आतून मऊ!

SCROLL FOR NEXT