Six month baby recovers from covid 19 report Came negative kokan marathi news 
कोकण

दिलासादायक - सहा महिन्याच्या बाळाचा अहवाल निगेटिव्ह ; रत्नागिरी कोरोना मुक्तीच्या उंबरठ्यावर...

सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी : तालुक्यात सर्वाधिक रुग्ण असलेल्या साखरतर येथील अवघ्या सहा महिन्यांच्या बाळाचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला आहे. यामुळे जिल्हा कोरोना मुक्तीच्या उंबरठ्यावर आहे. 
 रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाचे सहा रुग्ण सापडले. यापैकी एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर 1 जण घरी तर 1 जण  रुग्णालयातुन क्वारंटाईन करण्यात आला आहे. 


सर्वाधिक रुग्ण सापडलेल्या साखरतर येथील रुग्णांच्या अहवालावर संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष होते. साखरतर येथील 2 महिला आणि एका सहा महिन्यांच्या बच्चूला कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर आरोग्य यंत्रणा हादरली होती. त्या बाळावर उपचारासाठी स्वतंत्र पथक नेमण्यात आले होते. त्यात दोन बालरोग तज्ज्ञ सहभागी होते. विशेष लक्ष ठेवल्यामुळे त्या बाळाची प्रकृती स्थिर होती.

उपचारानंतर काल त्या बाळाचे नमुने तपासणीसाठी मिरजला पाठवले होते. ते निगेटिव्ह आल्यामुळे प्रशासनाने निःश्वास सोडला आहे. तत्पूर्वी साखरतर येथील  2 महिलांचे अहवाल निगेटिव्ह आले होते. यामुळे रत्नागिरी जिल्ह्यावरचे कोरोनाचे संकट कमी झाले आहे. काल जिल्हा प्रशासनाने पाठवलेल्या 16 अहवाल निगेटिव्ह आले आहेत.दरम्यान, जिल्हा कोरोना मुक्तीच्या दिशेने असला तरी नागरिकांनी खबरदारी घेणे गरजेचे असल्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT