कोकण

कोकणवासीयांसाठी गुड न्यूज: आता मुंबईला धावणार एसटी

सकाळ वृत्तसेवा

दाभोळ(रत्नागिरी): (Dabhol)राज्यात कोरोनाचा (Covid 19) प्रादुर्भाव वाढल्याने दापोली आगारातून सुटणाऱ्या एसटी बसेस (ST buses)बंद करण्यात आल्या होत्या. मात्र आजपासून तालुकांतर्गत बसेसची सेवा सुरू करण्यात आली असून मंगळवारपासून (ता. २५) मुंबई (Mumbai)मार्गावरील बसेस सुरू करण्यात येणार असल्याची माहिती दापोलीच्या आगार व्यवस्थापक रेश्‍मा मधाळे यांनी दिली. (ST-bus-start-from-Dapoli-to-Mumbai-information-by-Depot-Manager-Dapoli-Reshma-Madhale)

दापोली बसस्थानकातून सकाळी ७.३० व ९.१५ वाजता दापोली बरोंडी मार्गे कोळथरे व परत, सकाळी ८ वाजता दापोली दाभोळ, ९.१५ वाजता दाभोळ दापोली, १२.३० वाजता दापोली दाभोळ उंबर्लेमार्गे सुटणार आहे. दुपारी १.४५ वाजता दापोली-दाभोळ-कोळथरे-बुरोडीमार्गे परत येईल. दुपारी १२.३० वाजता दापोली बुरोंडी कोळथरेमार्गे दाभोळ ही बस दुपारी २.१५ वाजता दाभोळ-उंबर्लेमार्गे परत दापोलीला येईल. सकाळी ७.००, ९.००, दुपारी ३.३० वाजता दापोली-पाजपंढरी, तर दुपारी १ वाजता दापोली-हर्णै बस सुटणार आहे. सकाळी ८.३० व दुपारी ३.३० वाजता दापोली-पालगडमार्गे मंडणगड, सकाळी ८.३० वाजता दापोली-रत्नागिरी बस सुटेल. हीच बस दुपारी २ वाजता रत्नागिरी येथून दापोलीसाठी सुटणार आहे.

२५ मे पासून मुंबई मार्गावर शिवशाही बसेस सोडण्यात येणार असून सकाळी ९.३० वाजता दापोली-नालासोपारा सुटेल, तर नालासोपारा येथून सकाळी ८.३० वाजता दापोलीसाठी सुटेल. रात्री १० वाजता दापोली-बोरिवली हीच बस बोरिवली येथून दुसऱ्या दिवशी रात्री ११ वाजता दापोलीसाठी सुटेल. सकाळी ७.४५ वाजता दापोली-पुणे चिंचवड ही बस सुटेल. परतीच्या प्रवासासाठी दुसऱ्या दिवशी सकाळी ७ वाजता ती चिंचवड येथून दापोलीसाठी सुटणार असल्याची माहिती आगार व्यवस्थापक मधाळे यांनी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Delhi Pollution Master Plan : दिल्लीत ५० टक्के कर्मचाऱ्यांना 'WFH' अनिवार्य, पार्किंग शुल्कातही दुप्पट वाढ; प्रदूषण नियंत्रणासाठी नवे धोरण लागू

Pune Highway Upgrade: घोडेगाव–मंचर–बेल्हे महामार्ग विकासाला ४७० कोटींचा मुबलक निधी; भीमाशंकर प्रवास २० किमीने कमी, भाविकांना मोठा दिलासा

Parbhani News: घरी परतताना काळाचा घाला! जिंतूरमध्ये पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या शेतकरी महिलेचा दुसऱ्या दिवशी मृतदेह सापडला

Nanded Accident: परभणीच्या कुटुंबावर काळाचा घाला! नांदेडमध्ये अपघातात कुटुंबप्रमुखाचा मृत्यू, पत्नी व दोन मुले गंभीर

SCROLL FOR NEXT