ST buses are start from today with full capacity of passengers in ratnagiri
ST buses are start from today with full capacity of passengers in ratnagiri 
कोकण

कोकणात प्रवाशांच्या प्रतिसादात एसटी पूर्ण क्षमतेने लागली धावू

मकरंद पटवर्धन

रत्नागिरी : राज्य परिवहन महामंडळाच्या परित्रकानुसार आता रत्नागिरी एसटी विभागातून 100 टक्के प्रवासी क्षमतेने वाहतूक सुरू करण्यात आली आहे. 320 गाड्या वाहतुकीसाठी उपलब्ध करून दिल्या आहेत. यातून एकूण 1500 फेर्‍या दिवसभरात सोडण्यात आल्या. पुरेशी काळजी घेऊन ही वाहतूक सुरू करण्यात आली आहे.

कोरोना, लॉकडाऊनमुळे एसटी महामंडळाची वाहतूक पूर्ण ठप्प होती. मध्यंतरी स्थलांतरित मजुरांची वाहतूक एसटीने केली. तर 20 जूनपासून वाहतूक थोड्या प्रमाणात सुरू झाली. यामध्ये एका वेळी फक्त 22 प्रवाशांना प्रवास करता येत होता. पण आता अन्य काही राज्यांमध्ये 100 टक्के क्षमतेने वाहतूक सुरू झाल्याने शासनाच्या आदेशानुसार रा. प. महामंडळाने आजपासून वाहतूक सुरू करण्याचे निर्देश दिले. बसमधून प्रवास करताना प्रवाशांनी मास्क, सॅनिटायझरचा वापर करणे बंधनकारक आहे. 

वाहतूक करण्यासाठी वापरण्यात येणार्‍या बसेस निर्जंतुक करूनच मार्गस्थ केल्या जात आहेत. लांब आणि मध्यम लांब पल्ल्याच्या बसेससाठी एका आसनावर एक प्रवाशी अशा तिरप्या पद्धतीने आरक्षण उपलब्ध करून दिले जात होते. तथापि आता सर्व आसने पूर्ववतप्रमाणे आरक्षणासाठी उपलब्ध करून देण्यात येत आहेत. यानुसार रत्नागिरी एसटी विभागाने नियोजन केले असून भारमान पाहून व प्रवाशांच्या मागणीनुसार विविध ठिकाणी फेर्‍या सोडण्यात येणार आहेत.

163 कर्मचार्‍यांना कोरोना 

रत्नागिरी एसटी विभागात आजपर्यंत 63 अधिकारी, कर्मचार्‍यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. यात आगारातील कर्मचार्‍यांसह, विभागीय प्रमुख अधिकारी, चालक, वाहक, विभागीय कार्यशाळेतील कारागीर, टीआरपी येथील कामगारांचा समावेश आहे. रत्नागिरी एसटी विभाग, रत्नागिरी आगारात सर्वाधिक रुग्ण आढळले. अन्य तालुक्यांमध्ये 2 ते 8 कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह झाल्याने संबंधित विभागात काळजी घेतली जात आहे.

संपादक - स्नेहल कदम 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : राज्यातील मतदारसंघांत कुठे रांगा, तर कुठे निरुत्साह

Loksabha Election 2024 : कासवगतीने कासावीस! मतदार चार तास रांगेत

Monsoon : पावसाचा जोर, केरळ ‘अलर्ट मोड’वर

BSP Party : बसपची अस्तित्वाची लढाई; मायावतींचा दबदबा झपाट्याने कमी होऊ लागला

Uddhav Thackeray : मतदान केंद्रात मतदारांकडे दोन ते तीन वेळा ओळखपत्र विचारून ‘जाणीवपूर्वक विलंब’

SCROLL FOR NEXT