ST Service Stats In Tilari Ghat Region Sindhudurg Marathi News  
कोकण

तीन राज्यांना जोडणाऱ्या 'या' घाटातून एसटी वाहतूक अखेर सुरू 

सकाळ वृत्तसेवा

साटेली भेडशी ( सिंधुदुर्ग ) - तब्बल सहा महिन्यानंतर तिलारी घाटातील एसटी वाहतूक आजपासून पुन्हा सुरु झाली .गोवा महाराष्ट्र आणि कर्नाटक जोडणारा आंतरराज्य मार्ग तिलारी घाट कोसळल्याने बंद होता. तो आजपासून पूर्ववत सुरु झाला. 
शिवसेनेचे उप जिल्हा संघटक गोपाळ गवस, संदीप कोरगावकर, हेमंत आणि सर्वेश कर्पे, दौलत राणे, दत्ताराम देसाई आदींनी चंदगड बांधकाम विभागाचे उप अभियंता विजय सासणे, कनिष्ठ अभियंता जे. मुल्ला यांचे अभिनंदन तर चालक वाहकाचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. 

4 जुलै 2019 ला मुसळधार पावसामुळे तिलारी घाटात अनेक ठिकाणी दरडी कोसळल्याने आणि रस्ता बाजूपट्टीसह वाहून गेल्याने घाट वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला होता. या घाटाचे दुरुस्तीचे काम पूर्ण होताच कालपासून हा घाट मार्ग वाहतुकीस पूर्णपणे मोकळा करण्यात आला. त्यामुळे दोडामार्ग तालुक्‍याबरोबर सिंधुदुर्ग, गोवा राज्यातील प्रवाशांची गैरसोय आता दूर झाली आहे. 

अतिवृष्टीचा तिलारी घाटाला तडाखा

या वर्षी अतिवृष्टी झाली चंदगड तालुक्‍यातील कोदाळी धामणे धरण दोडामार्ग तालुक्‍यातील तिलारी मुख्य धरण, तेरवण मेढे उन्नेयी बंधारा यातील पाण्याने धोक्‍याची पातळी ओलांडली होती. त्यामुळे या तिन्ही धरणाचे सर्व दरवाजे उघडले गेल्याने तिलारी नदीच्या पाण्याच्या पातळीत झपाट्याने वाढ झाली होती. गेल्या चाळीस वर्षांनंतर तिलारी नदीला महापूर आल्याने बऱ्याच गावांना तडाखा बसला होता. या अतिवृष्टीचा तिलारी घाटालाही मोठा तडाखा बसला. जुलैमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे घाटात अनेक ठिकाणी दरडी कोसळल्याने या घाट मार्गावरील दोडामार्ग, सिंधुदुर्ग, गोवा राज्य ते चंदगड, बेळगाव, कोल्हापूर वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली होती. मुसळधार पाऊस पडत असल्याने तत्काळ या घाटाची दुरुस्ती करणे शक्‍य झाले नाही.

प्रतिक्षा संपली

दरम्यान गणेशचतुर्थी, दिवाळी सण आले. या सणापूर्वी तरी हा घाट मार्ग दुरुस्ती करण्यात यावा अशी नागरिक, प्रवाशी आणि व्यापाऱ्यांची मागणी होती; मात्र त्या दरम्यान हा घाट रस्ता वेळीच दुरुस्ती केला नाही. त्यामुळे प्रवाशी आणि व्यापारीवर्गावर मोठा परिणाम झाला. अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. घाट मार्ग कधी सुरु होतो याकडे प्रवासी व व्यापाऱ्यांचे लक्ष होते.ती प्रतीक्षा आज संपली. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Playoff Scenario: चेन्नई सुपर किंग्सचे अंतिम ४ मध्ये पोहोचणे अवघड! लखनौ सुपर जायंट्सने स्वतःसह त्यांची पण वाट लावली...

महाराष्ट्रात मालमत्ता वादांवर लगाम लागणार! मोजणीशिवाय आता होणार नाही म्युटेशन; फ्लॅटधारकांनाही प्रॉपर्टी कार्ड मिळणार

Police Officer Transfers : राज्यातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या! संजय दराडे पुण्याचे सह पोलिस आयुक्त तर गुन्हे शाखेच्या अतिरिक्त आयुक्तपदी तेजस्वी सातपुते

LSG vs CSK Live: चेन्नई सुपर किंग्स एका फटक्यात तीन संघांचा कार्यक्रम करणार; एक गणित ज्याने भल्याभल्यांची झोप उडणार

Mumbai News : गुगल बरोबर ॲपललाही नोटीस; बाईक टॅक्सी सेवेला झटका, राज्य सायबर विभागाची मोठी कारवाई

SCROLL FOR NEXT