मँगो कार्गोसेवा
मँगो कार्गोसेवा sakal
कोकण

चिपीतून ‘मँगो कार्गोसेवा’ सुरू करावी

सकाळ वृत्तसेवा

देवगड ः जिल्हावासियांना प्रतिक्षेची ठरलेली चिपी विमानसेवा येत्या काही दिवसात सुरू होईल. जिल्ह्यातील आंबा, काजू तसेच शेतमाल उत्पादकांसाठी आठवड्यातून दोनवेळा चिपी येथून ‘मँगो कार्गोसेवा’ सुरू करण्यात यावी, अशी मागणी सदस्य सदाशिव ओगले यांनी आज येथील पंचायत समितीच्या मासिक सभेत केली. यासाठी केंद्रीय नागरीहवाई उड्डाणमंत्र्याकडे मागणी नोंदवण्यची सुचनाही त्यांनी केली.

येथील पंचायत समितीची मासिक सभा छत्रपती संभाजी महाराज सभागृहात सभापती लक्ष्मण पाळेकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. मंचावर उपसभापती रवींद्र तिर्लोटकर, प्रभारी गटविकास अधिकारी अरूण चव्हाण तसेच पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे उपस्थित होते. येत्या काही दिवसात चिपी विमानतळाचे उद्घाटन होऊन प्रवाशी वाहतुक सुरू होईल. याचबरोबरच जिल्ह्यातील आंबा, काजू वाहतुकीसाठी मँगो कार्गोसेवा सुरू करण्याची मागणी श्री. ओगले यांनी केली. यासाठी केंद्रीयमंत्री नारायण राणे, खासदार सुरेश प्रभू, खासदार विनायक राऊत यांना पाठपुराव्यासाठी पत्रव्यवहार करण्याची सुचनाही त्यांनी केली.

खारबंधारा कार्यालय कक्षेतील कामे पूर्ण न करताच सुमारे दोन कोटींचा निधी खर्ची झाल्याची बाब समोर येत आहे. यामध्ये काही तथ्य असल्यास याची सखोल चौकशी करण्याची मागणी श्री. ओगले यांनी केली. तालुक्यातील बी.एस.एन.एल. सेवा समाधानकारक नसल्याकडे सदस्यांनी लक्ष वेधून यामध्ये सुधारणा होण्याची मागणी केली. तालुक्याच्या विविध भागातील रस्त्यांची मोठी दुरवस्था झाली आहे. रस्त्यातील खड्डे तातडीने बुजवले जावेत अशी मागणी करण्यात आली. तसेच रस्त्याकडेला वाढलेले गवत कापण्यासाठी ग्रासकटरचा वापर करण्याऐवजी जेसीबीयंत्राचा वापर केला जात असल्याकडे सदस्य अजित कांबळे यांनी लक्ष वेधले. पुरळ -गोवळ मार्गावरील खड्डे बुजवण्याचे काम समाधानकारक होईपर्यंत संबधित ठेकेदाराच्या कामाचे बील काढू नये असेही सदस्यांनी सांगितले. सर्वच रस्त्यांच्या दुरूस्ती कामांची अंदाजपत्रके करण्याचे सुचवण्यात आले.

सध्या शेतकर्‍यांना माकडांचा उपद्रव सहन करावा लागत आहे. त्यामुळे शेती संरक्षणासाठी असलेल्या परवानाधारक बंदुकीसाठीचा नाहरकत दाखला देण्यात अडचणी असू नयेत असे सदस्य ओगले यांनी सुचवले. ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात असलेल्या महावितरणच्या मालमत्तेपोटी संबधित ग्रामपंचायतीना भाडे दिले जावे अशी मागणी श्री. ओगले यांनी केली. ठाकूरवाडी नळयोजनेची टाकी नादुरूस्त झाली असल्याकडे सदस्या शुभा कदम यांनी लक्ष वेधले. पावसामुळे तालुक्यातील सुमारे 25 टक्के भातशेतीचे नुकसान झाल्याचे ओगले यांनी सांगुन याच्या सर्वेक्षणाची मागणी केली.

बनावट दारूला आळा घाला

तालुक्यात बोकाळलेल्या अवैध गोवा बनावटीच्या दारूमुळे तरूणपिढीबरोबरच शाळकरी मुलेही व्यसनाधिनतेकडे वळण्याची लक्षणे आहेत. त्यामुळे गोवा बनावटीच्या दारू विक्रीला लगाम घालण्याची मागणी सदस्य सदाशिव ओगले यांनी केली. यावेळी पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांनी याबाबतची कारवाई सुरूच असून नऊ ठिकाणी कारवाई केल्याचे सांगितले. मात्र कारवाई होऊनही व्यवसाय पुन्हा सुरूच असल्याकडे सदस्य अजित कांबळे यांनी लक्ष वेधले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NCERT Syllabus: शालेय पाठ्यपुस्तकांमध्ये दंगलीबद्दल का शिकवायचे? ; 'बाबरी मशीद'चे नाव हटवल्यानंतर NCERT संचालकांचा सवाल

MHT CET 2024 Results: एमएचटी सीईटी निकाल जाहीर, थेट लिंकवरून असा पाहा निकाल

Latest Marathi News Live Update : लोकसभा अधिवेशनापूर्वी भाजपची खलबतं

" 'Maharashtra 104'चा धुमाकूळ," वाचा नेमकी काय आहे भानगड

Smriti Mandhana: स्मृतीचं द. आफ्रिकेविरुद्ध खणखणीत शतक! 'हा' पराक्रम करणारी दुसरीच भारतीय महिला क्रिकेटर

SCROLL FOR NEXT