Start the train, let us come to Konkan ... 
कोकण

रेल्वे सुरू करा, गणपतीसाठी आम्हाला कोकणात येऊ द्या... 

तुषार सावंत

कणकवली : येत्या 22 ऑगस्टपासून गणेशोत्सव साजरा होत आहे. मुंबईसह राज्यातील विविध भागातून चाकरमान्यांना कोकणातील गावाकडे येण्यासाठी कोकण रेल्वे हाच पर्याय आहे. कोकण रेल्वे सुरू करावी, अशी मागणी प्रवासी संघटनेच्या वतीने रेल्वे मंत्र्यांकडे करण्यात आली असून मुंबईत ही मोहीम राबविली जात आहे. याबाबत रेल्वे मंत्रालयात संघटनेच्या वतीने निवेदनही देण्यात आले आहे. 

कोकणात मोठ्या प्रमाणात गणेशोत्सव साजरा केला जातो. दरवर्षी मध्य व पश्‍चिम रेल्वेकडून कोकण रेल्वेमार्गावर विविध विशेष गाड्या सोडल्या जातात. यामुळे कोकणात 15 ते 20 लाख चाकरमानी गावाकडे येत असतात. यंदा कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर अनेक समस्या उभ्या राहिल्या आहेत. 

कोकणातील बंद घरात जाऊन पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव हा सण कसा साजरा करावा? असा प्रश्‍न मुंबईकर चाकरमान्यांना पडला आहे. त्यात बहुतांशी ग्रामपंचायतींच्या मागण्या या चाकरमान्यांच्या दृष्टिकोनातून सोईच्या नाहीत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ग्रामपंचायतीने 14 दिवस क्वारंटाईन होण्याच्या अशा सूचना दिल्या आहेत; मात्र चाकरमान्यांना ते शक्‍य नाही. त्यातच एसटीची सुविधा किंवा सार्वजनिक वाहतूक सुरू नसल्याने खाजगी गाड्यांतून आर्थिक दृष्ट्‌या प्रवास करणे हा परवडणारा नाही. त्यामुळे कोकण रेल्वे हाच चाकरमान्यांसाठी उत्कृष्ट पर्याय ठरेल. 

शासनाने आपले नियम निकष निश्‍चित करून मुंबई ते सावंतवाडीपर्यंत विशेष गाड्या सोडाव्यात, अशी मागणी मुंबईच्या प्रवासी संघटनांनी केली आहे. याबाबतचे निवेदनही रेल्वे मंत्रालयाला देण्यात आले आहे. 

आमच्यावर अन्याय का? 
मुंबईत कोकण रेल्वेच्या प्रवासी संघटनेच्या वतीने प्रवाशांना रेल्वे मागणीसाठी काळे टीशर्ट त्यावर कोकणवासीयांवर झालेल्या अन्यायाचा मजकूर लिहून फोटो रेल्वे मंत्रालयास पाठवले जात आहे. परप्रांतीय मजुरांनी केला मोफत प्रवास आम्हा कोकणवासीयांवर अन्याय का ? अशा भावना यातून व्यक्त केल्या जात आहेत. 

विशेष गाड्यांची मागणी... 
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी रेल्वेने जादा गाड्या सोडाव्यात. त्याचे वेळापत्रक लवकरात लवकर जाहीर करावे, अशी मागणी मुंबईच्या प्रवासी संघटनेचे अध्यक्ष सुजित लोंढे यांनी रेल्वे मंत्रालयाकडे केली आहे. चाकरमान्यांना रेल्वे हाच योग्य पर्याय ठरेल. रेल्वेतून मुंबईकडे जाणे सोयीचे ठरेल आणि परतीचा प्रवासही रेल्वेने झाला तर कोरोना व्हायरस प्रादुर्भाव रोखण्यात यश येईल, असे मतही लोंढे यांनी व्यक्त केले आहे. 

संपादन : प्रफुल्ल सुतार
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पार्किंगपासून ते दुकानाच्या भाड्यापर्यंत...; विमानतळावर सर्व महाग होणार, टीडीएसएटीच्या मोठ्या निर्णयानं टेन्शन वाढवलं

Viral Video : प्रियकरासोबत वारंवार फरार व्हायची पत्नी; घटस्फोट होताच पतीने दुधाने आंघोळ करत जल्लोष साजरा केला अन्...

Latest Marathi News Updates: कर्जतमध्ये हालीवली येथे पैशाचा पाऊससाठी अघोरी विद्या

Pravin Gaikwad Attacked : 'माझ्या हत्येचा कट रचला गेला होता, अन् याला पूर्णपणे जबाबदार..'' ; 'संभाजी ब्रिगेड'च्या प्रवीण गायकवाडांचा मोठा दावा!

Sangli Crime : मोक्कातील सांगलीच्या गुन्हेगाराचा सपासप वार करून खून, अल्पवयीन मुलांचा समावेश; वर्चस्ववाद नडला

SCROLL FOR NEXT