State of Chiplun bus stand Permanent eclipse of work No funding Contractor neglect sakal
कोकण

चिपळूण बसस्थानकाची अवस्था : भाषा हायटेक, प्राण्यांना निवारा फुकट

कामाला कायमचे ग्रहण; निधी नाही, ठेकेदाराचे दुर्लक्ष

सकाळ वृत्तसेवा

चिपळूण : राज्यातील हायटेक बसस्थानक म्हणून चिपळूण बसस्थानकाला ओळख मिळेल, असे जाहीर करीत तत्कालीन मंत्र्यांनी बसस्थानक इमारतीचे भूमिपूजन केले. मात्र, चार वर्षे झाली तरी हायटेक बसस्थानक पाहण्याचा योग काही चिपळूणकरांच्या नशिबी नाही. प्रशासनाची उदासिनता, लोकप्रतिनिधींचे अक्षम्य दुर्लक्ष याला कारणीभूत ठरत असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया जनमानसातून उमटत आहेत. प्रवाशांच्या सेवेसाठी उभे राहणारे हे बसस्थानक सध्या मोकाट जनावरे, भटकी कुत्री यांच्यासह सर्प, उंदीर आणि घुशींसारख्या प्राण्यांसाठी निवाराच बनला आहे.

रडतरखडत दोन वेळा सुरू झालेले या बसस्थानकाचे काम पुन्हा दीर्घ कालावधीसाठी ठप्प झाले आहे. पाया सुद्धा पूर्णत्वास गेलेला नाही. संपूर्ण साहित्य गंजले आहे तर परिसरात गवत उगवले असून झाडाझुडपांनी पुरत कवेत घेतले आहे. रत्नागिरी बस स्थानकाच्या कामासाठी दहा कोटींचा बूस्टर डोस देऊन उर्जितावस्था देणाऱ्या परिवहन मंत्री परब यांनी चिपळूणच्या बसस्थानकाच्या कामाकडेही नजर टाकावी, अशी मागणी प्रवाशांमधून केली जात आहे.

असे दाखवले होते स्वप्न

५ कोटी खर्च करून उभारण्यात येत असलेल्या या बसस्थानकाला तब्बल २३ प्लॅटफॉर्म, आरक्षण, हिरकणी कक्ष, सीसीटीव्ही, वायफाय व्यवस्था, स्वतंत्र पार्किंग, अद्ययावत विद्युत व्यवस्था,

याबरोबरच चालक- वाहकांसाठी स्वतंत्र विश्रांतीगृहे, काँक्रिट पेव्हमेनचा वाहनतळ आदी व्यवस्था करण्यात येणार आहेत. तळमजल्यावर शिवनेरी, शिवशाहीसह होल्वो बसेसच्या सुमारे ५०० प्रवासी क्षमतेचे वातानुकूलित वेटिंग रूम, दिव्यांगासाठी शौचालये, २५० प्रवासी क्षमतेचे कँटिनचा समावेश करण्यात आला आहे.

कामात सातत्याचा अभाव

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळामार्फत चिपळूण मध्यवर्ती बसस्थानकाच्या पुनबांधणीचे काम हाती घेण्यात आले होते. जुन्या बसस्थानकाच्या जागी हायटेक बसस्थानक उभे करण्याच्या हालचाली सुरू झाल्या. त्यानुसार २३ फेब्रुवारी २०१८ ला तत्कालीन पालकमंत्री रवींद्र वायकर यांच्या हस्ते व लोकप्रतिनिधी, वरिष्ठ, स्थानिक अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या कामाचे भूमिपूजन झाले होते. जुन्या बस स्थानकाची जीर्ण इमारत तोडून त्यावर सुसज्ज हायटेक बसस्थानक उभारण्यासाठी बांधकाम सुरू करण्यात आले. सुरवातीपासूनच या बसस्थानकाच्या बांधकामाला ग्रहण लागले. निधी नाही, ठेकेदाराचे दुर्लक्ष अशा कारणाने या कामात सातत्य राहिले नाही.

पालकमंत्र्यांचे दुर्लक्ष

शिवसेनेचे तत्कालीन पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी भूमिपूजन करून चार वर्षापूर्वी चिपळूणकरांना हायटेक बसस्थानकाचे स्वप्न दाखविले. त्यासाठी निधीही मंजूर केला. आता सुदैवाने परिवहन मंत्री व रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल परबही शिवसेनेचेच आहेत. तरीही या प्रकल्पाचा साधा पायाही पूर्णत्वास गेलेला नाही. पालकमंत्री चिपळुणात येऊन राज्याच्या ऑनलाईन बैठकीला हजर राहतात. टेरवमधील विकास कामांचे भूमिपूजन करतात. पण महामार्गापासून अवघ्या हाकेच्या अंतरावर असणाऱ्या चिपळूण बस स्थानकाच्या रखडलेल्या कामाची साधी पाहणी करण्यासाठीही येत नाहीत, याबाबत आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे.

होणाऱ्या या ठळक सुविधा...

  • बसस्थानकाला प्लॅटफॉर्म तब्बल २३

  • वातानुकूलित वेटिंग रूम प्रवासी क्षमता ५००

  • कँटिन प्रवासी क्षमतेचे २५०

"चिपळूण बसस्थानकाच्या नवीन इमारतीचा विषय वरिष्ठ कार्यालयाच्या अखत्यारित आहे. याबाबतचे निर्णय तेथूनच घेतले जातात. हायटेक बसस्थानकाचे काम सुरू व्हावे. यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत."

- रणजित राजेशिर्के, आगार व्यवस्थापक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

Latest Maharashtra News Updates: दिवसभरातील ताज्या बातम्या वाचा एका क्लिकवर

Mumbai University: मुंबई विद्यापीठात इतर भाषिकांना मिळणार मराठीचे ऑनलाइन धडे

Mughal Treasury Found: बापरे! मुगल काळातील खजिना सापडला, मनरेगा कामगारांना उत्खननादरम्यान असं काही सापडलं की प्रशासनही हादरलं

Success Story: १४ तास अभ्यास, परीक्षेच्या २० दिवस आधी घरातील सदस्य गमावला, अडचणीवर मात करून तरुण सीए बनला

SCROLL FOR NEXT