the stone collapsed in guhagar more home but all family saved kokan marathi news 
कोकण

दैव बलवत्तर म्हणून वाचले प्राण नाहीतर दगडाने घेतलाच असता जीव....

सकाळ वृत्तसेवा

गुहागर (रत्नागिरी) : वेळणेश्वर येथे राहणारे लक्ष्मण मोरे यांच्या घरावर मंगळवारी (ता. ११) रात्री ११ च्या सुमारास मोठा दगड कोसळला. दरम्यान, घटनेआधी वीजप्रवाह खंडित झाल्याने घरातील मंडळी अंगणात होती. त्यामुळे मनुष्यहानी टळली. मात्र, स्वयंपाकघराची भिंत तोडून घरात शिरलेल्या दगडाने सुमारे ७७ हजाराचे नुकसान झाले आहे.

 लक्ष्मण मोरे यांचे घर वेळणेश्वर येथील मच्छीमार वस्तीत डोंगराशेजारी आहे. मंगळवारी (ता. ११) रात्री ११ च्या सुमारास मोठा दगड डोंगर उतारावरून घरंगळत आला आणि थेट मोरे यांच्या घराची भिंत फोडून स्वयंपाकघरात घुसला. यावेळी मोठा आवाज झाल्याने अंगणातील मंडळी स्वयंपाक घराकडे धावली. तेव्हा घरात आलेला दगड बघून सर्वांची वाचाच बंद झाली. 
मोरे यांच्या घरावर दगड पडल्याची माहिती पोलिसपाटील चैतन्य धोपावकर यांना समजली. त्यांनी तातडीने जिल्हा परिषद सदस्या नेत्रा ठाकूर, सरपंच नवनीत ठाकूर, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष विनायक शितप, उमेश शिंदे यांच्यासह अन्य ग्रामस्थांना माहिती दिली.

वीजपुरवठा खंडित झाला अन्‌ प्राण वाचले

तातडीने सर्व ग्रामस्थांनी मोरे यांच्या घराकडे धाव घेतली. मोरे कुटुंबीयांना कोणतीच दुखापत झालेली नाही, हे कळताच सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. जि. प. सदस्या ठाकूर यांनी सदर घटनेची माहिती तहसीलदार धोत्रेंना दिली. बुधवारी (ता. १२) लता धोत्रे यांनी तलाठी, मंडल अधिकाऱ्यांसह घटनास्थळाची पाहणी केली. तातडीने पंचनामा करण्यात आला. यामध्ये घराचे ७७ हजाराचे नुकसान झाल्याचे समोर आले आहे. गुहागरचे पोलिस उपनिरीक्षक किरणकुमार कदम व वेळणेश्वर बीट अंमलदार गणेश कादवडकर यांनीही घटनास्थळी जाऊन पाहणी केली.

अंगणात गप्पा मारण्यासाठी एकत्र
केवळ दैव बलवत्तर म्हणून मोरे कुटुंबाचे प्राण वाचले. याला महावितरणचा खंडित झालेला वीजप्रवाह कारणीभूत ठरला. लक्ष्मण मोरे यांच्या घरातील सर्वांचे जेवण रात्री १०.४५ च्या दरम्यान उरकले. जेवणानंतर मोरे यांची पत्नी स्वयंपाकघर आवरून भांडी घासण्यासाठी मागील परसदारात जाणार होती. मात्र, त्याच वेळी वीजप्रवाह खंडित झाला. त्यामुळे हातातील काम थांबवून मोरे कुटुंब घरासमोरील अंगणात गप्पा मारण्यासाठी एकत्र आले. लक्ष्मण मोरे आणि त्यांचा मुलगा झोपण्याच्या तयारीत होते. त्याचवेळी भूकंप झाल्यासारखा आवाज आला. त्यामुळे घरात काम करणारे दोघेही अंगणात पळाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बिहार हादरलं! एकाच कुटुंबातील पाच जणांना जिवंत जाळलं; १६ वर्षांच्या मुलाने डोळ्यांनी बघितलं, धक्कादायक कारण?

Latest Maharashtra News Updates : ..तर हे स्पष्ट होईल, की महाराष्ट्राविषयीचा द्वेष हाच भाजपचा खरा चेहरा आहे! - उद्धव ठाकरे

Pune Crime: आषाढी वारीत मुलीवर अत्याचारप्रकरणी मोठी अपडेट, नराधमांना अटक; आरोपी निघाले...

Murud Crime : पोलिसांच्या मारहाणीत युवकाचा मृत्यू झाल्याचा संशय; नातेवाईकांनी रस्ता अडवला

Government Recruitment 2025: राज्यात मेगाभरती! मुख्यमंत्र्यांची घोषणा; भरती प्रक्रियेचे नियम बदलणार

SCROLL FOR NEXT