crime  sakal
कोकण

गुटखा, तंबाखुच्या छुप्या विक्रीला चाप

मजगाव रोड येथे जनरल स्टोअर्सवर धाड; ६ हजाराचा माल जप्त

- राजेश शेळके

रत्नागिरी : येथील अन्न व औषध प्रशासनाने शासनाने बंदी घातलेल्या गुटखा, तंबाखु आदी पदार्थांवर छुप्या पद्धतीने विक्री करणाऱ्यांविरोधात धाडसत्र सुरू केले. पथकाने शहरातील मजगाव रोड येथील एका जनरल स्टोअर्सवर धाड टाकली. यामध्ये बंदी असलेला पानमसाला आणि सुगंधी तंबाखु असा ६ हजार ३८८ रुपयांचा साठा जप्त करून दुकान सील करण्यात आले. याबाबत शहर पोलिस ठाण्यात तक्रार सायंकाळी उशीरापर्यंत देण्यात आली.

गुटखा, पानमसाल्यावर बंदी असतानाही राजरोस त्याचा विक्री होत असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाला मिळाली होती. त्यावरून या विभागाने शहर आणि परिसरामध्ये धाडसत्र सुरू केले. सहायक आयुक्त संजय नारगुडे यांच्या नेतृत्वाखाली अन्न सुरक्षा अधिकारी प्रशांत गुंजाळ, दशरथ बावळे यांच्या पथकाने शहरातील मजगाव येथील सुनील लक्ष्मण रसाळ यांच्या साई किराणा अॅण्ड जनरल स्टोअर्स या दुकानावर धाड टाकली. यामध्ये विमल, आरओमडी, तैमुर पानमसाला व सुगंधी तंबाखुचा सुमारे ६ हजार ३८८ रुपयाचा साठा जप्त करण्यात आला.

तसेच पथकाने दुकान सील केले असून त्यांच्याविरोधात शहर पोलिस ठाण्यात तक्रार देण्याची कार्यवाही सुरू होती. अन्न व औषध प्रशासन आयुक्त परिमल सिंग यांच्या आदेशावरून यापुढेही बंदी असलेल्या पदार्थाची विक्री केल्यास कारवाई करण्यात येईल. याबाबतची काही माहिती असल्यास ८०५५४३६१८८ या नंबर माहिती द्यावी, असे आवाहन या विभागाने केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT