strawberry cultivation by homeopathy doctor in konkan ratnagiri 
कोकण

कोकणात होमिओपॅथी डॉक्‍टरांनी पिकवली स्ट्रॉबेरी शेती! ; एक हजार किलो उत्पादनाचा अंदाज

मकरंद पटवर्धन

रत्नागिरी : थंड हवेच्या ठिकाणाप्रमाणे कोकणातही स्ट्रॉबेरीची लागवड करण्यास शेतकरी पुढे येऊ लागले आहेत. विविध गावांमध्ये प्रयोगशील शेतकरी स्ट्रॉबेरीच्या लागवडीचे प्रयोग करू लागले असून कोतवडे-खरवते येथे श्‍वेता वडगावकर-कारखानीस यांनीही दोन गुंठे जागेत स्ट्रॉबेरीची यशस्वी लागवड केली आहे. साठ दिवसांत होणाऱ्या या पिकाकडे शेतकऱ्यांनी लक्ष दिले पाहिजे, असे त्यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.

होमिओपॅथी डॉक्‍टर असणाऱ्या कारखानीस यांच्या घराण्यात शेतीची पार्श्‍वभूमी आहे. कोरोना लॉकडाउनच्या काळात शेतीमध्ये काही नवीन करावे, या हेतूने त्यांनी स्ट्रॉबेरीची लागवड केली. नोव्हेंबरमध्ये याची लागवड केली असती तर तीनवेळा पीक मिळाले असते. परंतु त्यांनी ही जानेवारीत लागवड केली आहे. कारखानीस यांना त्यांचे काका डॉ. धनंजय औरंगाबादकर यांनी प्रोत्साहन दिले आणि आपल्या शेतात लागवड करण्यास सांगितले. 

काही प्रजाती इथल्या वातावरणाला अनुकूल

त्या म्हणाल्या, भात लागवड व त्यानंतर आंबा, काजू फळधारणा होईपर्यंत मधल्या कालावधीत शेतकऱ्यांना फायदेशीर ठरणारे हे कॅश क्रॉप आहे. कोकणात न होणारे एखादे नवीन कमी कालावधीतले पीक घेता येईल का, याचा विचार करताना स्ट्रॉबेरीचा विचार मनात आला. त्याचे प्रशिक्षण व माहिती घेतल्यावर माझ्या लक्षात आले की, स्ट्रॉबेरीच्या ७ ते ८ प्रजाती आहेत. त्यापैकी काही प्रजाती कोकणच्या वातावरणाला अनुकूल आहेत.

एक हजार रोपे

सुमारे २ गुंठे जागेत वाफे तयार करून १ हजार रोपे लावली आहेत. ठिबक सिंचनाची सोय केली आहे. या पिकाला पाणीही जास्त लागत नाही. दिवसाला फक्त ४० मिनिटे ठिबक चालू ठेवावे लागते. एक रोप साधारण १.५ ते २ किलो स्ट्रॉबेरी देते. त्याचा बाजारभाव २०० ते २४० प्रति किलो असा आहे. एकूण १ हजार किलो उत्पन्न मिळू शकेल, असा अंदाज कारखानीस यांनी व्यक्त केला. या स्ट्रॉबेरीचा आकार, वजन आणि चव दर्जेदार आहे.
 

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NCP Shiv Sena Merger In BJP : राष्ट्रवादी अन् शिवसेना भाजपमध्ये विलीन होणार, उद्धव ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ

'25 व्या वर्षी मला मोठा दिसतो म्हणून मालिकेतून काढलं' करिअरबद्दल बोलताना सुबोध भावे म्हणाला...'मी खूप रडलो आणि...'

Ladki Bahin Yojana : 71 लाख लाडक्या बहिणी अपात्र, आतापर्यंत 21 हजार 300 कोटी रुपये खर्च! सरकार पैसे वसूल करणार?

Hanuman Jayanti: अयोध्येत प्रभूरामाचे दर्शन घेण्याआधी या हनुमानाचे घ्यावे लागते दर्शन ; काय आहे पहाटेच्या 'गुप्त' पूजेचे गुपित?

Gold Rate Today: ट्रम्प इफेक्टमुळे सहा दिवसांनी सोनं स्वस्त! चांदीचा भावही घसरला; पाहा आजचा ताजा भाव

SCROLL FOR NEXT