success story of farmer in gavtale ratnagiri watermelon farming 
कोकण

Sucess Story : फक्त दहा मिनिट पाणी देऊन, दोनच महिन्यात पिकवली सात किलो वजनाची कंलिगड

सकाळ वृत्तसेवा

गावतळे (रत्नागिरी) : रासायनिक शेतीमुळे उत्पन्न वाढले, पण त्यामुळे जमीन नापिक होते. रासायनिक शेतीमुळे होणारे दुष्परिणाम जग भोगत आहे. त्यामुळेच काही शेतकरी सेंद्रिय शेतीकडे वळले आहेत. जालगाव (दापोली) येथील सतत काहीतरी वेगळे करण्याचा ध्यास घेतलेले शेतकरी रमाकांत शिगवण यांनी दोन गुंठ्यांत सेंद्रिय खते वापरून कलिंगडाची यशस्वी शेती केली. डिसेंबरअखेर ही कलिंगडे बाजारपेठेत आणली. 

प्राथमिक शिक्षक पदापासून शिक्षण विस्ताराधिकारी पदापर्यंत उत्कृष्ट कार्य करणारे, दीर्घकाल ज्ञानदानाची सेवा करून स्वेच्छानिवृत्ती घेतलेले शिक्षक रमाकांत शिगवण हे उदयोन्मुख शेतकऱ्यांसाठी एक प्रेरणादायी शेतकरी आहेत. सेंद्रिय खतांवर तयार झालेली कलिंगडाची चवही गोड, त्यामुळे भावही चांगला मिळाला आणि लोकांना सेंद्रिय फळ दिलं यांचं समाधान शिगवण यांना आहे. मातीत माती मिसळली की, मोती पिकवता येतात, हेच रमाकांत शिगवण यांनी दाखवून दिले. यापूर्वीही त्यांनी काजू, केळी, रताळी, भोपळे आदी पिके भरघोस प्रमाणात घेतली तीही विषमुक्त.

शेती पाहून आनंद व्यक्त

रमाकांत शिगवण यांच्या या शेतीतील वेगळ्या प्रयोगाची माहिती मिळताच बळीराजा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष गणेश देवघरात यांनी शिगवण यांनी पिकवलेली कलिंगडची शेती पाहून आनंद व्यक्त केला. यावेळी ते म्हणाले, तरुणांनी नोकरीच्या मागे न लागता शिगवण गुरुजींचा आदर्श घेऊन कृषी क्षेत्रात यशस्वी कामगिरी करावी. रासायनिक शेतीने आपण अनेक रोग निर्माण केले म्हणून विषमुक्त शेतीची आणि शिगवण गुरुजींसारख्या शेतकऱ्यांची आज गरज आहे.

उंच माळरानावर लागवड

जालगाव आणि वळणेदरम्यान उंच माळरानावर दोन गुंठे जागेत शिगवण यांनी अगस्ता वाणाच्या कलिंगडची ऑक्‍टोबर २० मध्ये लागवड केली. यासाठी गाईचं शेण, लेंडी, कोंबडीची विष्ठा आदींचा वापर करून रोज फक्त दहा मिनिटे पाणी देऊन डिसेंबरअखेर त्यांनी सुमारे २८० कलिंगडे बाजारात आणली. तीही सात-सात किलो वजनाची.

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India-China News: भारत अन् चीनमधील ‘LAC’वरील मोठा वाद मिटणार!

Maharashtra Hospitals : पाच हजार रुग्णालयांना ‘कारणे दाखवा’ नोटीस; तीस दिवसांनंतर परवाना होणार निलंबित

Pune Flood : पुणे शहरात पुरामुळे पंधराशे नागरिकांना हलविले; मुळामुठा नदीत ८५ हजार क्यूसेस पाणी सोडले

Indian Railways Special Trains: मोठी बातमी! दिवाळी-छठ दरम्यान रेल्वे तब्बल १२ हजारांहून अधिक विशेष गाड्या चालवणार

ICC ODI Rankings: केशव महाराज झाला नंबर वन बॉलर! पण बुमराहचं नाव झालं गायब? चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT