कोकण

आता शिवसेना गप बसणार नाही; उपजिल्हाप्रमुखांचा इशारा

दिपेश परब

वेंगुर्ले (सिंधुदु्र्ग) : येथील नगरपरिषद मच्छिमार्केटची जुनी इमारत पाडताना त्यामध्ये असलेल्या गाळेधारकांना पुन्हा त्याच ठिकाणी गाळे देण्याचे ठरले होते. तसा ठरावही करण्यात आला होता; मात्र आज या ठरावाची पायमल्ली करण्यात येत आहे. जुन्या गाळेधारकांच्या पोटावर पाय आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. स्थानिक व्यापाऱ्यांना डावलून धनदांडग्यांना गाळे देण्याचा प्रयत्न केला गेल्यास शिवसेना गप बसणार नाही, असा इशारा शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख सुनिल डुबळे यांनी दिला आहे. डुबळे यांनी येथील तालुका संपर्क कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते बोलत होते.

ते म्हणाले, ज्या नगरसेवक व नगराध्यक्ष यांना लोकांनी निवडून दिले, त्या लोकप्रतिनिधींनी आपले अधिकार मुख्याधिकाऱ्यांना दिले. मुख्याधिकाऱ्यांनी कायद्याचा बडगा दाखवून व खोट्या भूलथापा देवून गाळे काढून घेतले. त्यानंतर गाळेधारकांना जी पर्यायी जागा दिली ती नादुरुस्त व गळकी होती. आज त्यांना लिलाव प्रक्रियेत भाग घेण्यासाठी तात्पुरते देण्यात आलेले गाळे खाली करण्याची अट घालण्यात आली आहे.

व्यापाऱ्यांचे शिष्टमंडळ ज्यावेळी आमदार दिपक केसरकर, खासदार विनायक राऊत, पालकमंत्री उदय सामंत यांना भेटले त्यावेळी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठक घेऊन गाळेधारकांना राईट टू रिफ्यजलचा हक्क मिळवून दिला. यापूर्वी २००७ मध्ये आयडीएसएमटी मार्केट बांधतेवेळी व्यापाऱ्यांना असेच आश्वासन देण्यात आले होते; मात्र त्यांना हक्काचे गाळे आजपर्यंत देण्यात आले नाहीत. या संदर्भात एकनाथ शिंदे यांनी हा प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले आहेत. या पत्रकार परिषदेला तालुका प्रमुख यशवंत उर्फ बाळू परब, शहरप्रमुख अजित राऊळ, शहर समन्वयक विवेक आरोलकर, डॅलिन डिसोजा, जिल्हा कार्यकारीणी सदस्य सचिन वालावलकर, शैलेश परुळकर, हेमंत मलबारी आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dombivli Crime : डोंबिवलीत अल्पवयीन मुलीचा विनयभंग, रामनगर पोलीस ठाण्यात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल; 37 वर्षीय व्यक्तीला पोलिसांनी केली अटक

तो फार कमी कार्यक्रमांना यायचा... अदिती द्रविडने सांगितला काका राहुल द्रविडसोबतचा बालपणीचा अनुभव

Latest Marathi News Live Update: ॲग्रीस्टॅकमुळे कापूस खरेदी नोंदणी जलद होणार - जयकुमार रावल

अखेर मृण्मयी देशपांडेच्या ‘मना’चे श्लोक' चित्रपटाचं नाव बदललं; आता 'या' नावाने येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Crop Insurance Scam : विमा कंपनीचा शेतकऱ्यांवर अन्याय; 15 हजार 200 रुपयांच्या हप्त्याला फक्त 5994 रुपये भरपाई

SCROLL FOR NEXT