suspect attacked the local crime branch police arrest the suspect in the bike theft case ratnagiri marathi news
suspect attacked the local crime branch police arrest the suspect in the bike theft case ratnagiri marathi news 
कोकण

पोलिसांचा घेतला चावा अन् ठोकली धुम; दोन पोलिस जखमी 

सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी : दुचाकी चोरीप्रकरणी संशयितास पकडण्यासाठी गेलेल्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांवर संशयित आरोपीने हल्ला केला. दोन्ही पोलिस कर्मचाऱ्यांच्या हाताचा चावा घेऊन तो पळाला. आज सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास उद्यमनगर येथे ही घटना घडली. या प्रकरणी संशयिताविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. हेमंत पाडुरंग देसाई (वय 29, रा. कांदिवली) असे हल्ला करून फरार झालेल्या संशयिताचे नाव आहे. 

दुचाकी चोरीप्रकरणात संशयित हेमंतवर यापूर्वी विविध पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. एका गुन्ह्यात तो जामिनावर सुटला होता. त्यानंतर त्याने गुन्हे केल्याने तो पोलिसांना हवा आहे. हेमतला शोधण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेसह शहर आणि ग्रामीण पोलिसांची पथके विविध ठिकाणी रवाना करण्यात आली होती. त्याच्या विरोधात शहर पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात दुचाकी चोरीचे गुन्हे दाखल झाले आहेत. रत्नागिरी शहर आणि परिसरातही अशा गुन्ह्यांची नोंद आहे. त्यासाठी पोलिस हे संशयित हेमंतच्या मागावर आहेत. 

 
असा घडला थरार... 
आज हेमंत उद्यमनगर येथे आल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस प्रवीण खांबे, दत्तात्रेय कांबळे यांना मिळाली. ते दोघेही हेमंतला पकडण्यासाठी गेले. पोलिस झडप घालून पकडणार एवढ्यात हेमंतने पोलिसांना पाहिले आणि पळून जाऊ लागला. तरीही पोलिसांनी चपळाईने फिल्मिस्टाईल पाठलाग करून हेमंतला पकडलेच. त्याचवेळी हेमंतने दोन्ही पोलिसांच्या हाताला चावा, घेऊन तेथून निसटण्यात यश मिळवले. 

संपादन - अर्चना बनगे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT