Suspension Of Kaka Kudalkar Gets Back By Congress  
कोकण

काँग्रेसकडून काका कुडाळकर यांचे निलंबन मागे 

सकाळवृत्तसेवा

सावंतवाडी ( सिंधुदुर्ग ) - विधानसभा निवडणुकीच्या काळात कॉंग्रेस पक्षातून निलंबित केलेल्या हेमंत ऊर्फ काका कुडाळकर यांच्यावरील कारवाई मागे घेत पुन्हा एकदा त्यांना पक्षात समाविष्ट केले आहे. याबाबतची माहीती जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष विकास सावंत यांनी दिली. 

विधानसभा निवडणुकीत कुडाळ विधानसभा मतदार संघातून आघाडीच्या वतीने कॉंग्रेसने काका कुडाळकर यांना उमेदवारी जाहीर केली होती; मात्र श्री. कुडाळकर यांनी उमेदवारी दाखल करताना ऐनवेळी माघार घेतली होती. एकूणच कुडाळकर यांच्या भूमिकेने कॉंग्रेस पक्षासमोर पेच निर्माण झाला होता. त्यामुळे पक्षाने त्यांच्यावर कारवाई करताना त्यांना निलंबित केले होते. 

पक्षाचे जिल्हाध्यक्ष सावंत यांनी आज दिलेल्या प्रसिद्धी पत्रकामध्ये श्री. कुडाळकर यांच्यावरील निलंबनाची कारवाई मागे घेण्यात आल्याचे म्हटले आहे. त्यामध्ये कुडाळकर यांच्याबाबत विधानसभा निवडणुकीमध्ये पक्षातून काढून टाकण्याची कारवाई करण्यात आली होती; मात्र श्री. कुडाळकर यांनी महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीच्या पदाधिकाऱ्यांची व जिल्हाध्यक्ष या नात्याने आपली भेट घेऊन पक्षाने दिलेली उमेदवारी नाकारताना पक्षाला अडचण होईल अथवा पक्षाचा कमीपणा होईल अशी भूमिका कधीच घेतलेली नव्हती व त्याबाबत कोणताही समजत अथवा गैरसमज असेल तर मी पक्षाकडे दिलगिरी व्यक्त करतो, मला पक्षामध्ये पुन्हा एकदा पक्ष संघटना बांधण्याचे कार्य करण्यासाठी समाविष्ट करून माझ्यावरील कारवाई मागे घेण्यात यावी अशी विनंती केली. श्री. कुडाळकर यांनी केलेला खुलासा मान्य करून पक्षसंघटनेत त्यांना पुन्हा एकदा समाविष्ट करून घेण्यात आले आहे, असे म्हटले आहे. 

याबाबत श्री. सावंत यांच्याशी संपर्क साधला असता श्री. कुडाळकर यांच्यावरील कारवाई मागे घेण्यात आली असून ते आता पक्षात पुन्हा पूर्वीसारखे सक्रिय सहभाग घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.  

 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kedgaon Crime : केडगावातील गर्भलिंग निदान रॅकेटची व्याप्ती मोठी; दोघेजण अद्याप फरार, आणखी काहींचा सहभाग असण्याची शक्यता

Abdul Sattar: अब्दुल सत्तारांची नाराजी दूर, मुलाचा उमेदवारी अर्ज उद्या माघारी घेणार

Donald Trump: मोज्तबा खामेनेई यांची भेट घेण्याची डोनाल्ड ट्रम्प यांची इच्छा; नेतन्याहू यांच्याशी वादावादीनंतर ट्रम्प यांचा भलताच प्लॅन

Pune Toxic Liquor Case: विषारी दारूसाठी रसायन पुरविणाऱ्या पिता-पुत्राला नवी मुंबईतून अटक; तपासासाठी दहा पथके

Lowest Price Electric Scooter : 50 हजारपेक्षा कमी किंमतीत इलेक्ट्रिक स्कूटर; सगळ्यात स्वस्त आहेत 'या' 3 गाड्या, दमदार रेंज

SCROLL FOR NEXT