Tailbaila Cone Sakal
कोकण

उंच व अवघड तैलबैला सुळक्‍याच्या चारही बाजूंवर मॅकविलाच्या टीमची थरारक चढाई

सुधागड तालुक्यातील धोंडेस गावापासून काही अंतरावर व सुधागड किल्ल्याच्या समोर आणि मुळशी तालुक्‍यात 230 फूट उंचीचा तैलबैला हा सुळका आहे.

अमित गवळे

सुधागड तालुक्यातील धोंडेस गावापासून काही अंतरावर व सुधागड किल्ल्याच्या समोर आणि मुळशी तालुक्‍यात 230 फूट उंचीचा तैलबैला हा सुळका आहे.

पाली - सुधागड तालुक्यातील धोंडेस गावापासून काही अंतरावर व सुधागड किल्ल्याच्या (Sudhagad Fort) समोर आणि मुळशी तालुक्‍यात 230 फूट उंचीचा तैलबैला हा सुळका (Tailbaila Cone) आहे. बुधवारी (ता.29) व गुरुवारी (ता.30) या अवघड सुळक्‍याच्या चारही बाजूंवर "मॅकविला द जंगल यार्ड" च्या टीम ने दोन दिवस थरारक यशस्वी चढाई केली आहे. यामध्ये एका महिला गिर्यारोहकाचा (Trekkers) समावेश होता.

सुधागड तालुक्यातील पोटलज खुर्द गावचे सुपूत्र व "मॅकविला द जंगल यार्ड" चे संस्थापक मॅकमोहन हुले यांनी रविवारी (ता.2) सकाळला सांगितले की या सुळक्‍याचा 90 अंशांतील कातळकडा आणि अंतिम टप्प्यातील अवघड चढाईमुळे गिर्यारोहकांचा पूर्णपणे कस लागला.

तैलबैला हा किल्लेवजा सुळका असून तो प्रस्तरारोनासाठी अतिशय कठीण श्रेणीमध्ये ओळखला जातो. या नैसर्गिक भिंतीवर चारही बाजूंनी आरोहण करता येते. अनुभवी प्रस्तरारोहक मॅकमोहन यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम फत्ते करण्यात आली.

अनुभवी गिर्यारोहक आपल्या तंत्रशुद्ध अभ्यासासहित तेलबैला सरावासाठी मोहिमा आखतात असे देखील मॅकमोहन यांनी सांगितले. या मोहिमेत मॅकमोहन हुले, सागर मेस्त्री, आयुष सिंग व शोभा मोहपात्रा हे प्रस्तरारोहक सहभागी झाले होते.

थंडीच्या दिवशी सुळक्याच्या भोवती खूप सोसाट्याचा वारा असतो. थंडीमुळे अंगावरील कपडे हे संपूर्ण शरीर झाकेल असे उबदार असावेत. पाठीवरील बॅग मध्ये दोन लिटर पाणी व पौष्टीक आहार असावेत. प्रस्तरारोहण करतांना ऊर्जा मिळते.

- मॅकमोहन हुले, प्रस्तरारोहक

पहिली प्रस्तरारोहण चढाई

मॅकमोहन हुले यांनी सांगितले की तैलबैलाची उजवीकडील बाजू सर्वात कठीण आणि चौथ्या श्रेणीत गणली जाते. सर्वप्रथम सागर मेस्त्री या अनुभवी गिर्यारोहकाने प्रस्तरारोहण चढाईला सुरुवात केली. ते ८० फुटावरील पहिल्या स्टेशनला पोहोचले. त्यांना सुरक्षा दोर आयुष सिंग यांनी दिले. सागर यांच्यापाठोपाठ आयुष सिंग हे सुद्धा पहिला स्टेशनला पोचले. मॅकमोहन हे सर्व दोर सोडवत पहिल्या स्टेशनवर पोहोचले. आयुष सिंग यांना पुढचा टप्पा अवघड जाणार म्हणून त्यांनी रॅपलडाऊन केले. पुढील चढाई मॅकमोहन यांनी लीड केली व दुसरे स्टेशन तसेच तिसरे स्टेशन करत अंतिम टप्प्यात पोहोचले. मागोमाग सागर मेस्त्री यांनी झूमररिंग करत अंतिम टप्प्यात माथा गाठला.

दुसरी प्रस्तरारोहण चढाई

तेलबैलाच्या मध्यस्थानी मंदिराकडील डाव्या बाजूची प्रस्तरारोहण चढाई ही प्रथम श्रेणीतील आहे. गिर्यारोहक आयुष सिंग यांनी लीड क्लायम्बिंग करून पहिले स्टेशन गाठले, त्यांना सुरक्षा दोर मॅकमोहन यांनी दिले. शोभा यांनी त्यांच्या मागोमाग चढाई केली. अशाप्रकारे दुसरे स्टेशन तसेच तिसरे स्टेशन करत अंतिम टप्प्यात माथा गाठला.

तिसरी प्रस्तरारोहण चढाई

सुधागड किल्ल्याकडे बाजू अवघड असून, ही तिसऱ्या श्रेणीत गणली जाते. सर्वप्रथम चढाई करण्यासाठी मॅकमोहन यानी तयारी केली. त्यांना सागर मेस्त्री यांनी सुरक्षा दोर दिला. प्रथम 50 फुटांचा कातळकडा चढून मॅकमोहन प्रस्तराच्या कंगोऱ्यावर पोहचले. त्यापाठोपाठ झुमरिंग करत सागर मेस्त्री तेथे दाखल झाले. पुढील 90 अंशातील कातळकडा चढताना मॅकमोहन यांचा कस लागला. तिरक्‍या रेषेत चढाई करत त्यानी 80 फुटांवर दुसरा टप्पा घेतला. त्यानंतर पुढील 30 फूट आणि 50 फुटांवर मॅकमोहन पोचला. 50 फुटांची अंतिम चढाई पूर्णपणे दगड, मातीमिश्रित ठिसूळ संरचनेची (स्क्री) आहे. त्यामुळे या मार्गात अत्यंत सावध राहत आणि दगड ढासळणार नाहीत याची काळजी घेत मॅकमोहन सुळक्‍याच्या माथ्यावर पोचले. त्याच्यापाठोपाठ सागर मेस्त्री हे गिर्यारोहक माथ्यावर दाखल झाले.

चौथी प्रस्तरारोहण चढाई

तेलबैलाच्या मध्यस्थानी मंदिराकडील उजव्या बाजूची प्रस्तरारोहण चढाई ही दुसऱ्या श्रेणीत गणली जाते. मॅकमोहन यांनी प्रथम प्रस्तरारोहण चढाईला सुरुवात केली. त्यांना सुरक्षा दोर सागर मेस्त्री यांनी दिले. अंतिम टप्प्यापर्यंत दोघांनी सुरक्षित आरोहण केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prithviraj Chavan statement: 'ऑपरेशन सिंदूर'च्या पहिल्याच दिवशी झाला होता भारताचा पराभव - पृथ्वीराज चव्हाणांचं विधान!

IPL 2026 All Teams: ग्रीन सर्वात महागडा खेळाडू, तर अनकॅप्ड खेळाडूंही मलामाल; लिलावानंतर पाहा सर्व संघांतील खेळाडूंची यादी

IPL 2026 Auction Live: जाता जाता Prithvi Shawला दिलासा! एका फ्रँचायझीला आली दया... घेतलं एकदाचं संघात, बघा कोणाकडून खेळणार

PL 2026 Auction : पप्पू यादव यांचा मुलगा आयपीएलमध्ये खेळणार; लिलावात मोजली तगडी रक्कम, जाणून घ्या कोणत्या संघाची झाली कृपा

मोठी बातमी! सिडनीतील दहशतवादी हल्ल्याचं भारतीय कनेक्शन उघड; तेलंगणा पोलिसांनी केली पुष्टी...

SCROLL FOR NEXT