tanker Reversed carrying hydrochloric acid from a chemical plant in Lotte Industrial Estate to Ichalkaranji 
कोकण

हायड्रोक्लोरिक अँसिड घेऊन निघालेला टँकर एका वळणावर पलटी झाला अन्....

सकाळ वृत्तसेवा

खेड  (रत्नागिरी) : लोटे औद्योगिक वसाहतीतील एका रासायनिक कारखान्यातून हायड्रोक्लोरिक अँसिड घेऊन इचलकरंजी येथे जाण्यासाठी निघालेला टँकर क्रमांक एम एच ०९-इ एम -५३५४ हा महामार्गावरील पीरलोटे येथे एका वळणावर पलटी झाला. दुपारी ३.३० वाजता घडलेल्या या अपघातानंतर टँकरमधील रसायन रस्त्यावर पसरल्याने परिसरात घबराट निर्माण झाली. अपघातामुळे महामार्गावरील वाहतुक सुमारे तासभर ठप्प झाली होती.

घटनास्थळावरून  मिळालेल्या माहितीनुसार

लोटे औद्योगिक वसाहतीतील रासायनिक खते तयार करणाऱ्या एका कंपनीचे बाय-प्रॉडक्ट असलेले हायड्रोक्लोरिक अँसिड घेऊन टैँकर चालक इचलकरंजी येथे जायला निघाला होता. महामार्गावरील पीरलोटे येथे हा टँकर आला असता एका अवघड वळणावर चालकाचा टँकरवरील ताबा सुटला आणि टँकर रस्त्याच्या कडेला पलटी झाला. या अपघातानंतर टँकरमधील रसायन रस्त्यावरून वाहू लागल्याने परिसरातील नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण  झाले होते. महामार्ग वाहतुकीसही बंद झाल्याने रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या. 

रस्त्यावर वाहणाऱ्या  रसायनाची तीव्रता कमी असल्याने या रसायनामुळे जीवसृष्टीला फारसा त्रास झाला नाही. अपघाताची खबर मिळताच खेड पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. लोटे औद्योगिक वसाहतीचा अग्नीशमन बंबही तात्काळ घटनास्थळी दाखल झाला. अग्निशमन दलाच्या जवानांनी रस्त्यावर पसरलेल्या रसायनावर पाणी मारून त्याची तीव्रता कमी केल्यावर महामार्गावर थांबलेली वाहतुक सुरु करण्यात आली. या अपघातात चालक जखमी झाला असून त्याला नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

EPFO Insurance: लहान फॉर्म अन् मोठा फायदा! PF खात्यातील या फॉर्मने कुटुंबाला मिळू शकतात 7 लाख रुपये

Hasan Mushrif Kolhapur ZP Political Strategy : बहुमत असूनही पेच? पण मुश्रीफांनी करून दाखवलं 'अशक्य ते शक्य'; कसं जुळवलं सत्तेचं समीकरण? वाचा सविस्तर...

Latest Marathi News Live Update : पारंपारिक पोशाखात महिला, तरुण तरुणींनी काढली महाडमध्ये शोभा यात्रा

Thane politics: राजकीय खळबळ! ‘उबाठा’चे चार नगरसेवक शिंदे गटात; मध्यरात्री ठाण्यात पक्षप्रवेश, जिल्हाप्रमुखांच्या हाती ‘धनुष्यबाण’

Crime News : बॅनरवर फोटो खाली का? नाशिकमध्ये नामांकित कॉलेजच्या विद्यार्थ्याचे अपहरण करून रात्रभर डांबले

SCROLL FOR NEXT