Tarli Bangada disappeared Sakhrinate port ratnagiri 
कोकण

साखरीनाटे बंदरातून तारली, बांगडा गायब ; शिंगाळा झाला कमी

सकाळ वृत्तसेवा

राजापूर (रत्नागिरी) : निर्यातीतून वर्षभरामध्ये लाखो रुपयांची आर्थिक उलाढाल करणारा तारली मासा तालुक्‍यातील साखरीनाटे बंदरासह रत्नागिरी बंदर परिसरातून गतवर्षीपासून गायब झाला आहे. यावर्षी बांगडा माशाची त्यात भर पडली आहे. स्थानिक खवय्यांसह राजधानी दिल्ली परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात मागणी असलेला शिंगाळाही गतवर्षीपासून कमी मिळू लागला आहे. यावर्षीही तो अल्प प्रमाणात मिळत आहे. मच्छीमारांना चांगला ‘पैका’ मिळवून देणारे हे मासे गेल्या तीन वर्षांमध्ये मिळेनासे झाल्याने मच्छीमारबांधव चिंताक्रांत झाले आहेत. 


बांगडा, तारली, शिंगाळा या माशांच्या प्रजाती सागरी किनारपट्टीवरून नेमक्‍या का गायब झाल्या आहेत, याच्या कारणमीमांसेबाबत मच्छीमारबांधवही अनभिज्ञ आहेत. तालुक्‍याच्या पश्‍चिम किनारपट्टीवरील साखरीनाटे बंदरामध्ये मासेमारीतून दरवर्षी कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते.

सातत्याने प्रतिकूल हवामान, वादळी स्थिती आदी कारणांमुळे मासेमारी मुश्‍किल झाली आहे. त्यात मच्छीमार मेटाकुटीस आले. गेल्या काही वर्षांमध्ये परदेशामध्ये निर्यात होणाऱ्या काही माशांच्या प्रजातीचे मासे वर्षभर मिळेनासे झाले आहेत. तारली मासा वर्षभरापासून मिळेनासा झाला आहे. साखरीनाटे बंदरामध्ये वर्षभरामध्ये पंधरा ते वीस लाखांची उलाढाल होणारा बांगडा यावर्षीपासून गायब झाला आहे. शिंगाळ्याचा कॅच कमी झाला आहे. रत्नागिरी भागातून हे मासे गायब झाल्याची माहिती स्थानिक मच्छीमारांकडून दिली जात आहे.

रत्नागिरीपासून खाली साखरीनाटे बंदरासह अन्य परिसरातील सागरी किनारपट्टीवर गेल्या तीन वर्षांमध्ये काही प्रजातीचे मासे मासेमारीमध्ये सापडत नाहीत. त्यामध्ये गतवर्षी तारली, तर यावर्षी बांगडा मासा सापडत नाही. सागरामध्ये होणारे विविध बदल, त्यातून निर्माण होणारी प्रतिकूल स्थिती अशा कोणत्या कारणांमुळे गेल्या तीन वर्षांमध्ये या प्रजाती कमी होऊ लागल्या, हे नेमके समजत नाही.
- अमजद बोरकर, मच्छीमार नेते

संपादन - अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Cricketer Death : भारताच्या क्रिकेटपटूचा मृत्यू! फलंदाजी करून परतत असताना जमिनीवर कोसळला, तडफडला अन्...; वाचा दुर्दैवी घटना

Nilanga News : आधार कार्डमधील विसंगतीचा विद्यार्थ्यांना फटका; निलंग्यात सात हजार ८३४ विद्यार्थी ‘अपार’ आयडीविना

ठरलं तर मग फेम अभिनेत्री गेली 17 वर्षं करतेय या आजाराचा सामना; "माझी ऐकू येण्याची क्षमता.."

BMC Budget : देशातील सर्वात श्रीमंत मुंबई महानगरपालिकेचे बजेट किती? कुठून येतो एवढा पैसा?

MAH-CET 2026 : बी.एड. आणि एलएल.बी. करिअरची दारे उघडली! सीईटी नोंदणी सुरू; 'या' तारखेपर्यंत करा अर्ज

SCROLL FOR NEXT