कोकण

Tauktae Cyclone Update : देवगडात वादळी वार्‍यासह जोरदार पाऊस

समुद्राच्या लाटांचे किनार्‍यावर तांडव सुरू होते

संतोष कुळकर्णी

देवगड : तालुक्याच्या किनारपट्टी (sea area devgad) भागाला वादळी वार्‍यासह पावसाने जोराचा तडाखा दिला. सकाळी साडेअकरा वाजल्यापासून येथे वादळाला सुरूवात झाली. जोराच्या वार्‍यामुळे अनेकांची दाणादाण उडाली. किनारपट्टी भागाला पावसाने चांगलेच (heavy rain) झोडपले. वादळामुळे झाडांच्या फांद्या तुटून पडणे, पत्रे उडून जाण्याचे प्रकार घडले.

गेल्या दोन दिवसापासून किनारपट्टीवर वादळाचे संकेत मिळत होते. कालपासून येथे वार्‍यासह पावसाला सुरूवात झाली. आज दिवसभरात वादळ किनारपट्टीवर धडकणार असल्याचा इशारा देण्यात आला होता. त्यामुळे सर्वच पातळीवर खबरदारी घेतली जात आहे. काल सायंकाळपासून अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत होत्या. त्यातच आज सकाळी साडेअकराच्या सुमारास वादळाला प्रारंभ झाला. जोराच्या वादळी वार्‍यामुळे किनारपट्टी अक्षरशः गलीतगात्र झाली होती. रस्ते निर्मुनुष्य झाले होते. वार्‍याचा वेग प्रचंड वाढला होता. वार्‍यामुळे झाडे, माड पिळवटून जात होते. थांबून थांबून वार्‍याचा तीव्र तडाखा किनारपट्टीला जाणवत होता. वार्‍याबरोबरच पावसाच्या सरी बरसत होत्या. दुपारपर्यंत वार्‍याचे तांडव सुरूच होते. यंत्रणा वादळाच्या पार्श्‍वभूमीवर सतर्क झाली होती. ग्रामीण भागात (villege area) पावसाचा जोर होता. किनारपट्टीवरील नागरिक भयभीत झाल्याचे चित्र होते. समुद्राच्या लाटांचे किनार्‍यावर तांडव सुरू होते. मच्छीमारी पूर्णपणे थंडावली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अग्रलेख : सत्तेची ‘नशा’ उतरवली

Panchang 28 February 2026: आजच्या दिवशी हनुमान चालीसा स्तोत्राचे पठण आणि ‘शं शनैश्चराय नमः’ या मंत्राचा जप करावा

T20 WC, Semi Final Fixture : इंग्लंड उपांत्य फेरीत पोहोचला, पण कोणाला भिडणार? वानखेडे स्टेडियमवर कल्ला होणार... जाणून घ्या समीकरण

Weekly Rashi Bhavishya Horoscope News in Marathi : कसा असेल तुमचा आठवडा..? ग्रहमान : २८ फेब्रुवारी २०२६ ते ६ मार्च २०२६ - मराठी राशी भविष्य

PAKISTAN SEMIS SCENARIOS : न्यूझीलंड हरला, म्हणून पाकड्यांनी जास्त फडफडू नये! उपांत्य फेरीचं समीकरण पाहताच येईल चक्कर...

SCROLL FOR NEXT