कोकण

उदय सामंत ‘फिल्ड’ वर;आपदग्रस्तांना मदतीचे प्रशासनाला आदेश

- राजेश शेळके

रत्नागिरी : तौत्के चक्रीवादळाच्या (Tauktar cyclone) पार्श्वभूमीवर आज उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत(Higher and Technical Education Minister Uday Samant) रत्नागिरी विधानसभा (Ratnagiri Assembly)मतदारसंघात सकाळी 7 पासून ‘फिल्ड’वर आहेत. नाणीज येथून नुकसान ग्रस्त भागाच्या पाहणी दौरा सुरू केला. आपदग्रस्त कुटुंबीयांना आधार देत तत्काळ मदत करण्याचे आदेश त्यांनी प्रशासनाला दिले. रात्री उशिरापर्यंत पाहणी दौर्‍यावर असून आपदग्रस्तांना हात देण्याच्या त्यांच्या या वृत्तीचे आणि समाज कार्याचे कौतुक होत आहे.

Tauktar cyclone impact ratnagiri visit on uday samant kokan news

तौत्के वादळाने जिल्ह्याच्या किनारपट्टीला चांगलाच तडाखा दिला. यामध्ये दापोली, गुहागर, मंडणगड, राजापूर, रत्नागिरी या पाच तालुक्यांच्या किनारपट्टी भागात मोठे नुकसान झाले आहे.प्रशासन आपदग्रस्तांना दिलासा देण्यापासून मदतकार्य करत आहे. मात्र अनेकांना मोठा फटका बसला आहे. रत्नागिरी तालुक्याचे मोठे नुससान असल्याने निसर्ग चक्रीवादळात दापोली तालुक्यात सर्व यंत्रणा ठाण मांडुन होती. तशी यंत्रणा रत्नागिरी तालुक्यात मंत्री उदय सामंत यांनी उभारली आहे. मात्र ही यंत्रणा जिल्ह्यासाठी काम करणार आहे.

रत्नागिरी तालुक्यात काल दुपारपर्यंत 200 घरांचे नुकसान झाले होते. आंबा, काजू, केळी, आदी बागांसह मच्छीमारंचे नुकसान झाले आहे. मात्र उदय सामंत यांच्याकडे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी असली तरी रत्नागिरी हे त्यांचे होमपिच असल्याने तेथेही ते कोरोना आणि आता तौत्के वादळाच्या संकटातून नागरिकांना दिला देण्यासाठी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत.

नैसर्गिक आपत्तीतून जनतेला दिलासा आणि हातभार लावण्यासाठी आज सकाळी 7 पासून ते रात्री 10 वाजेपर्यंत तालुक्याच्या दौर्‍यावर आहे. प्रशासकीय यंत्रणाही त्यांच्याबरोबर असून बाधितांना तत्काळ मदत देण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. तसेच नुकसानग्रस्त भागांना शिवसेनेतर्फे मदत पोहचवणार असल्याचे जाहीर केले.

Tauktar cyclone impact ratnagiri visit on uday samant kokan news

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

SCROLL FOR NEXT