Teachers' union in Sindhudurg is aggressive due to cancellation of award
Teachers' union in Sindhudurg is aggressive due to cancellation of award 
कोकण

पुरस्कार रद्दमुळे सिंधुदुर्गात शिक्षक संघटना आक्रमक 

विनोद दळवी

ओरोस (सिंधुदुर्ग) - पुरस्कारासाठी प्राप्त झालेले प्रस्ताव पात्र नसल्याचे सांगून जिल्ह्यातील शिक्षकांचा जिल्हा परिषद अध्यक्षा समिधा नाईक यांनी अवमान केला आहे.त्यामुळे जिल्ह्यातील शिक्षक संघटना आक्रमक झाल्या आहेत. सर्व शिक्षक संघटना याविरोधात एकवटल्या असून सौ. नाईक यांनी केलेले हे खेदजनक विधान मागे न घेतल्यास यापुढे एकही शिक्षक पुरस्कारासाठी प्रस्ताव करणार नाही, असा इशारा देण्यात आला आहे.

आतापर्यंत वितरित केलेले पुरस्कार परत केले जातील. 1 ऑक्‍टोबरला जिल्हा परिषद समोर आत्मक्‍लेश आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. अध्यक्षा समिधा नाईक यांनी काल (ता.21) यावर्षी आदर्श शिक्षक पुरस्कार दिले जाणार नाहीत. प्राप्त प्रस्ताव पुरेसे नसून ते पात्र नाहीत, असे विधान केले होते. त्यामुळे आज जिल्ह्यातील सर्व शिक्षक संघटना एकवटल्या आहेत.

यात अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती, राज्य पदवीधर प्राथमिक शिक्षक व केंद्र प्रमुख सभा, राज्य प्राथमिक शिक्षक भारती, बहुजन शिक्षक कर्मचारी महासंघ, राज्य उर्दू शिक्षक संघटना, कास्ट्राईब शिक्षक संघटना, जुनी पेंशन हक्क संघटन, राज्य प्राथमिक शिक्षक संघ, महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक समिती संघटना, प्रहार दिव्यांग कर्मचारी संघटना, महाराष्ट्र प्रदेश जिल्हा परिषद केंद्र प्रमुख संघ या संघटनांचा समावेश आहे. 

याबाबत अध्यक्षा नाईक व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हेमंत वसेकर यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांमधून दरवर्षी प्रत्येक तालुक्‍यातून एक व जिल्ह्यातून कला विषयक एक विशेष, असे नऊ पुरस्कार जाहीर होतात. शालेय शिक्षण विभाग व ग्रामविकास विभागाच्या परिपत्रकान्वये ही कार्यवाही होते. या अनुषंगाने प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी 19 जूनला परिपत्रकाद्वारे प्रस्ताव मागितले.

या परिपत्रकात प्रत्येक तालुक्‍यातून दोन प्रस्ताव तालुका निवड समितीने शिफारशीसह जिल्हा निवड समितीकडे पाठवावेत असे नमूद केले. 42 मुद्यांनुसार 430 गुणांचे निकषही ठरवून दिले. पुरस्कार 5 सप्टेंबर शिक्षक दिनानिमित्त जाहीर करणे आवश्‍यक आहे, असेही नमूद केले आहे. 

पुरस्कार परत करण्याचा इशारा 
प्रत्येक तालुक्‍यातून परिपत्रकानुसार तालुक्‍यातील सभापती, गटविकास अधिकारी, गट शिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी व केंद्रप्रमुखांच्या शिफारशी व स्वाक्षरीसह जिल्हा निवड समितीकडे आलेले सर्व प्रस्ताव नाकारणे हे अनाकलनीय आहे. अध्यक्षांनी केलेले विधान मागे न घेतल्यास पुरस्कार प्रक्रियेत यापुढे शिक्षक प्रस्ताव सादर करणार नाहीत. यापूर्वी दिलेले सर्व पुरस्कार परत होतील, असा इशारा दिला आहे. 

संपादन - राहुल पाटील

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi Viral Video: "मला माहीत आहे 'डिक्टेटर' यासाठी अटक करणार नाही," ट्रोल होऊनही पंतप्रधानांचे भन्नाट उत्तर

काँग्रेसच्या प्रयत्नांवर वडेट्टीवारांनी पाणी फेरले, निवडणूक संपेपर्यंत शांत बसण्याचे निर्देश

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात.. कित्येक दिग्गजांचं भवितव्य आज ईव्हीएममध्ये होणार कैद

Loksabha Election 2024 : मतदानाचा आज तिसरा टप्पा; राज्यातील ११ मतदारसंघांमध्ये तयारी पूर्ण

Sakal Podcast : मावळ लोकसभा मतदारसंघात कोण बाजी मारणार? ते सुनीता विल्यम्सची पुन्हा अवकाश भरारी

SCROLL FOR NEXT