terror of leopards in ratnagiri rajapur 
कोकण

रत्नागिरीतील 'या' गावात आहे दिवसाढवळ्या बिबट्याची दहशत ; डरकाळ्यांनी नागरिक भयबीत 

सकाळ वृत्तसेवा

राजापूर - शहरानजीकच्या धोपेश्‍वर येथील गुरववाडी, नाडणकरवाडी परिसरामध्ये बिबट्याच्या दिवसाढवळ्या वावरामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. दिवसाढवळ्या बिबट्याच्या घुमणार्‍या जोरदार डरकाळ्यांनी जंगल परिसरामध्ये गुरे चरायला जाण्यास गुराखी धजावत आहेत. त्यातून, शेतकर्‍यांनी बिबट्याच्या दहशतीने गुरांना जंगल परिसरामध्ये चरावयास नेण्याचेच गेल्या काही दिवसांपासून बंद केले आहे. 

शहरानजीकच्या धोपेश्‍वर येथील गुरववाडी, नाडणकरवाडी लोकवस्तीपासून काही अंतरावर जंगल परिसर भाग आहे. या वाड्यांमध्ये मोठ्याप्रमाणात लोकवस्ती असून या वाड्यांसह लगतच्या गांगो मंदीर जंगल परिसरामध्ये बिबट्याचा गेल्या काही दिवसांपासून मुक्तपणे वावर सुरू आहे. जंगल पसिररामध्ये दहशत निर्माण करणार्‍या मोठमोठ्याने डरकाळ्या फोडत फिरणारा बिबट्याचा दिवसाढवळ्या लोकवस्तीमध्येही वावर सुरू आहे. लोकवस्तीपासून काही अंतरावर वाडीतील अरविंद सूद यांचे शेतघर आहे. त्याठिकाणी असलेली त्यांची पाळीव जनावरे यापूर्वी बिबट्याने फस्त केल्याची घटनाही घडली आहे. मात्र, मधल्या काळात या परिसरातील बिबट्याचा वावर आणि उपद्रवही थांबला होता. त्यामुळे शेतकर्‍यांनी सुटकेचा निःश्‍वास सोडला होता. मात्र, गेल्या आठ-दहा दिवसांपासून पुन्हा एकदा बिबट्याचा पूर्वीप्रमाणे उपद्रव सुरू झाला आहे. 

त्यातून, जंगल परिसरासह श्री. सूद यांच्या घरालगत बिबट्याचा दिवसाढवळ्या संचार सुरू झाला आहे. दोन दिवसांपूर्वी रात्रीच्या वेळी श्री. सूद यांच्या शेतघराकडे जाणार्‍या पायवाटेवर बिबट्याचे काही लोकांना दर्शनही झाले होते. त्यामुळे श्री. सूद यांच्या घरातील लोकांना घरातून बाहेर पडणे धोक्याचे बनले आहे. 

दिवसाढवळ्या लोकवस्तीमधून फिरणारा बिबट्या सायंकाळनंतर जंगल परिसर मोठमोठ्या डरकाळ्यांनी दणाणून सोडत आहे. त्यामुळे या भागामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

धोपेश्‍वर गुरववाडी, नाडणकरवाडीतील शेतकरी गांगोमंदीर परिसरातील जंगल भागामध्ये गुरे चरण्यासाठी घेऊन जातात. मात्र, गेल्या काही दिवसांपासूनच्या दणाणून सोडणार्‍या भितीयुक्त बिबट्याच्या डरकाळ्या ऐकून गुरे जंगलामध्ये चरावयास जाण्यास धजावत आहेत. त्यातूनही गुरे चरावयास गेल्यास बिबट्याच्या डरकाळ्या ऐकून रानामध्ये चरायला थांबण्याऐवजी घरी धूम ठोकत आहेत. त्यामुळे आता जंगलात गुरे चरायला नेणेही लोकांनी बंद केले आहे.

 बिबट्याच्या या दहशतीमुळे भयभीत झालेल्या या वाड्यांमधील लोकांनी बिबट्याचा वनविभागाने तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी केली जात आहे. 

संपादन - धनाजी सुर्वे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI 1st ODI Live: विराट कोहली, शुभमन गिलचे शतक, टीम इंडियाचा पहिल्या वन डेत दणदणीत विजय; मालिकेत आघाडी

Praniti Shinde: दुष्काळ जाहीर केला, पण आर्थिक मदत कुठे?’; मंगळवेढ्यात खासदार प्रणिती शिंदेंचा सरकारवर निशाणा

Nagpur Crime: साक्ष दिल्याचा बदला घेण्यासाठी पाठलाग; हद्दपार आरोपीने तेलमालिश करणाऱ्यावर चाकूने केले तीन वार

Latest Marathi News Live Update : गडचिरोलीत वाघाचे अवयव आणि २ खवले मांजर जप्त

IND vs WI 1st ODI Live: विराट कोहलीची Century! सचिन तेंडुलकरचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडला; ७४ चेंडूंत इतिहास भूगोल बदलला...

SCROLL FOR NEXT