ratnagiri sakal
कोकण

घंटा वाजणार; विद्यार्थी शाळेत जाणार

चिपळूण तालुक्यात ४ ऑक्टोबरपासून शाळांना मुहूर्त; ३२ हजार जणांचा समावेश

सकाळ वृत्तसेवा

चिपळूण : राज्य सरकारने ४ ऑक्टोबरपासून पाचवी ते बारावी दरम्यानच्या शाळा सुरू करण्यास मान्यता दिली आहे. तालुक्यात पाचवी ते बारावीदरम्यान ३१ हजार ७०० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. शाळा सुरू होण्यापूर्वी इमारती सुसज्ज ठेवण्याच्या सूचना पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकाऱ्यांनी शिक्षकांना दिल्या आहेत.

तालुक्यात जिल्हा परिषदेच्या पहिली ते सातवीच्या १४८ तर पहिली ते चौथीच्या २२४ शाळा आहेत तसेच खासगी शिक्षणसंस्थांच्या पहिली ते बारावीदरम्यान १४, पाचवी ते सातवीदरम्यान ७ आणि आठवी ते दहावीदरम्यान २४ शाळा आहेत. तालुक्यात एकूण आठ कनिष्ठ महाविद्यालय आहेत. संबंधित पाचवी ते बारावी दरम्यानच्या शाळा सुरू करण्यासाठी पालकांचे संमतीपत्र घेतले जात आहे तसेच शाळांमध्ये फवारणी करण्यासाठी देखील ग्रामपंचायती व शाळांना सूचना देण्यात आल्या आहेत.

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर गेल्या काही महिन्यांपासून बंद असलेल्या जिल्हा परिषद व माध्यमिक शाळा अद्याप सुरू झालेल्या नाहीत. कोरोनाचे सावट कमी झाल्यानंतर या शाळा सुरू करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला. त्यानुसार ४ ऑक्टोबरपासून शाळा सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तालुक्यात ४७ जिल्हा परिषद शाळांच्या इमारती नादुरुस्त होत्या. गेल्या काही महिन्यांत या इमारतींचे दुरुस्तीचे कामकाज सुरू आहे. मात्र, दुरुस्तीअभावी विद्यार्थ्यांना इमारतीत बसण्याची गैरसोय होणार नाही, याची दक्षता प्रत्येक शाळेने घेतली असल्याची माहिती गटशिक्षण अधिकारी दादासाहेब ईरणाक यांनी दिली.

पाहणी करण्याचे निर्देश

शाळा सुस्थितीत आहेत की नाहीत, याची पाहणी करण्याचे निर्देश केंद्रप्रमुख तसेच विस्तार अधिकारी यांना देण्यात आले आहेत. गेल्या काही दिवसांपासून या शाळांची पाहणी झाली नसल्याची माहिती गटशिक्षणाधिकारी यांनी दिली. त्यामुळे दीर्घ कालावधीनंतर शाळेची घंटा वाजणार आहे.

जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थी संख्या

  1. पहिली ते चौथी शिक्षण घेणारे विद्यार्थीः १४ हजार

  2. पहिली ते बारावी दरम्यानः ४५ हजार ७४१

  3. पाचवी ते बारावी दरम्यानः ३१ हजार ७०७

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

समृद्धी महामार्गावर ट्रक अपघातात वाचले, रस्त्यावर थांबले असताना रुग्णवाहिकेनं उडवलं; एकाच कुटुंबातील ६ जणांचा मृत्यू

Sangli Raisin : ‘भारतीय’ नावाचा मुखवटा, आतून चीनी बेदाणा! तासगाव बाजारातील घोटाळ्याने शेतकरी संतप्त

एक सूप मी ८ दिवस प्यायचे, तुझ्यात जीव रंगला मालिकेतील वहिनीसाहेबांनी सांगितला कठीण काळ, अभिनेत्री म्हणाली...'मी रिक्षाने सुद्धा...'

Latest Marathi News Live Update : महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस

Pune Municipal Election : भाजपने तरुणांना दिली संधी; आमदार, खासदारांच्या नातेवाइकांना लावली कात्री

SCROLL FOR NEXT