कोकण

आंबोली घाटामध्ये दरड कोसळली! तब्बल 10 तास वाहतूक खोळंबली

सकाऴ वृत्तसेवा

सदरची दरड हटवण्याचे काम हाती घेण्यात आले असून रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.

सावंतवाडी (सिंधुदुर्ग): आंबोली परिसरामध्ये गुरुवारी दिवसभर कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे रात्री दोन वाजण्याच्या सुमारास घाटामध्ये दरड कोसळली. तर आज सकाळी पूर्वीचा वस या ठिकाणी दरडीचा काही भाग रस्त्यावर आला. त्यामुळे तब्बल दहा तासाहून अधिक काळ घाट रस्त्यावरील वाहतूक खोळंबली होती. सदरची दरड हटवण्याचे काम हाती घेण्यात आले असून रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.

आंबोली परिसरामध्ये गुरुवारी दिवसभर तसेच रात्री असे चोवीस तासांमध्ये तब्बल 17 इंचापेक्षा जास्त पाऊस कोसळला याचा परिणाम म्हणून आंबोली घाट रस्त्यामध्ये धबधब्याच्या पुढे एक किलोमीटर अंतरावर रात्री ठीक दोन वाजता दरडीचा भाग रस्त्यावर आला. यामध्ये मातीसह मोठे दगड रस्त्यावर आल्याने वाहतूक खोळंबली तर शुक्रवारी सकाळी सात वाजता पूर्वीचा वस या ठिकाणी दरडीचा भाग रस्त्यावर आला. एकूणच या प्रकारामुळे या मार्गावरून होणारी वाहतूक पूर्णतः ठप्प झाली आहे.

पावसाळ्यात होणाऱ्या आपत्कालीन घटना लक्षात घेता बांधकाम विभागाची यंत्रणा मात्र या परिस्थितीत या ठिकाणी हजर नसल्याचे दिसून आले. सावंतवाडी चे पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर यांनी आपल्या टीमसह घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती पहिली. दरड मोठी नसली तरी जेसीपी अभावी ते हटवणे कठीण आहे. मात्र सकाळी दरड हटवण्यासाठी आंबोली घाटात निघालेला जेसीपी माडखोल येथे तेरेखोल नदीला आलेला पुरामुळे अडकला आहे, त्यामुळे दुपारी बारा वाजेपर्यंत दरड हटविण्यात आली नव्हती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ज्येष्ठ अभिनेते असरानी यांचं निधन, ८४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Gold Rate Hike : चांदीला सोन्याचा भाव; गुंतवणूकदारांची ‘चांदी’, ११ ते २० ऑक्टोबरदरम्यान तब्बल १७ हजार रुपयांची चढ-उतार

Theur Accidents : पुन्हा दोन अपघात, दोन मृत्यू! थेऊर परिसरात थरार; एका मोटारचालकावर गुन्हा, दुसऱ्या अज्ञात वाहनाचा शोध सुरू

मुख्यमंत्र्यांसमोर शरण गेलेला भूपती गद्दार, त्याला धडा शिकवणार! माओवाद्यांनी जारी केलं पत्रक, नेमकं काय म्हटलं?

सोलापूरच्या ६७ वर्षीय 'सीए'ला २.२८ कोटींचा गंडा! सायबर गुन्हेगारांनी शेअर मार्केटचे आमिष दाखविले, एक लाखास २५ हजाराचा परतावा लगेच दिला, नंतर...

SCROLL FOR NEXT